Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

व
विवेकपटाईत
Mon, 07/02/2018 - 06:10
💬 6 प्रतिसाद
सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच. आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते. माझी बिल्ली आणि मलाच म्याऊ". येउ दे तुझ्या पपाला, आईची धमकी देते, बघून घेईल तुझा बा, तुम्हा माय लेकीना. हा!, हा!,हा! 'व्हाट अ जोक,व्हाट अ जोक' आबा तुमचा जावई, सॅारी माझे पपा, आईने थोडे डोळे वटारले कि शेळी होते त्याची. एक विचारू आबा, तू पण आजीला घाबरत होता का? म्हणत सोनुटलीने तेथून धूम ठोकली. आबाचे लक्ष समोर हार घातलेल्या त्यांच्या बायकोच्या फोटो कडे गेले. च्यायला फोटोत हि मोठे-मोठे डोळे करून टक लावून पहात आहे. आबा दचकले, सॅारी, नाही बोलणार पुन्हा सोनाला म्हणत आबानी कानाला हात लावले आणि मनातच पुटपुटले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2740 views

💬 प्रतिसाद (6)
व
विवेकपटाईत Mon, 07/02/2018 - 06:20 नवीन
१०-१२ दिवस आधीची गोष्ट आमची २ वर्षाची नात, का माहित का नाराज झाली आणि दिवसभर थोड्या थोड्या वेळाने आपल्या बोबड्या भाषेत -मंडीयाली, हिंदी, मराठी व आंग्ल भाषेतील no-no - फाईरिंग करत राहिली. अर्थात तिची भाषा समजणे अवघडच. तिचा अवतार पाहून, तिची माय आणि आमची सौ. सर्वांनी या प्रकरणात मलाच दोषी ठरविले. त्या वरून सुचलेली कहाणी.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 07/02/2018 - 07:45 नवीन
कथा आवडली. छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 07/02/2018 - 09:48 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 15:51 नवीन
शॉर्ट & स्वीट.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Mon, 07/02/2018 - 18:30 नवीन
मला वाटते शीर्षक चुकले की काय ? पराधीन आहे " पुत्र " मानवाचा , ह्या ऐवजी ' पराधीन आहे जगती, पती बायकोचा " असे असावे. कारण शेवटच्या परिच्छेदात कथेचे तात्पर्य याच निष्कर्षाप्रत आले आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/04/2018 - 09:30 नवीन
पुत्र हा नवरा पण होणार. बायको आल्यावर त्याला हि हे भोग भोगावे लागतील.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा