Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५

ट
टर्मीनेटर
Sun, 07/01/2018 - 15:22
💬 35

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५

 भाग – १

भाग – १

भाग – २

भाग – २

भाग - ३

भाग – ३

भाग – ४

भाग – ४

भाग – ५

भाग – ५

भाग – ५

भाग – ६

भाग – ७

भाग – ७

भाग – ८

भाग – ८

भाग – ९

भाग – ९

भाग – १०

भाग–१०

भाग – ११

भाग–११

भाग–१२

भाग–१२.


पहाटे सहाला वाजणाऱ्या घंटेच्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष करून, डोक्यावरून रजई पांघरून, सकाळी चांगली साडेआठ वाजे पर्यंत झोप काढली. मग कॉमन रूम मध्ये बसून मानल ने आणून दिलेला नाश्ता आणि चहा झाल्यावर पुन्हा रुममध्ये आलो आणि तयारी करून दहा वाजता समोरच्या ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयमला जाण्यासाठी खाली उतरलो. पर्यटकांच्या गर्दीने म्युझीयमचे आवार फुलून गेले होते. पाच दहा मिनिटे रांगेत उभा राहून २४० पाउंडस चे तिकीट घेतले आणि मग पुढे सिक्युरिटी चेकच्या रांगेत जाऊन उभा राहिलो..

भव्य घुमटाकार छत असलेल्या दुमजली ईमारतीत, १५००० चौ.मी. क्षेत्रफळावर अनेक दालनांमध्ये सुमारे १,२०,००० वस्तूंचा संग्रह असलेले हे म्युझीयम हजारो वर्षांपूर्वीच्या ‘तुत-अंख-अमुन’ आणि ईतर काही फॅरोहच्या दैनंदिन वापरातील वस्तू, भांडी, खेळणी, दागिने, पुतळे, १२ फॅरोहच्या ममीज, मुखवटे, शवपेट्या, पपायरस वरील साहित्य व चित्रे, नाणी अशा हस्तनिर्मित वस्तूंसाठी जगप्रसिध्द आहे.

२०११ च्या क्रांती दरम्यान हिंसक जमावाकडून ह्या संग्रहालयाची तोडफोड झाली होती, त्यात अनेक प्राचीन वस्तूंची नासधूस व लुटालूट झाली. ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी मानवी साखळी करून संग्रहालयाला वेढा घातला होता. चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी काही परत मिळवून आणि नासधूस झालेल्या वस्तूंची डागडुजी करून त्या २०१३ मध्ये पुन्हा प्रदर्शनात ठेवल्या आहेत.

मराठीत संग्रहालय वा वस्तूसंग्रहालय असा अर्थ असणाऱ्या ‘म्युझीयम’ ह्या इंग्रजी शब्दाचा उगम ग्रीक पुराणातल्या म्युझेस (Muses) शब्दातून झाला आहे. ग्रीक-रोमन पुराणानुसार म्युझेस म्हणजे ९ कलांच्या प्रेरणा देणाऱ्या ९ देवता आहेत. कलेच्या देवतांचे मंदिर, कलामंदिर किंवा कलेला समर्पित अशा अर्थांनी हा शब्द वापरला जात होता. ईजिप्तच्या इतिहासातल्या पहिल्या (म्युझीयम हि संकल्पना युरोपात उदयास आली असा जरी मतप्रवाह असला तरी काही ईतिहास संशोधकांच्या मते जगातील पहिल्या) संग्रहालयाची मुहूर्तमेढ ई.स.पु. तिसऱ्या शतकात ग्रीक राजवटीतील पहिला टॉलेमि ‘सॉटर’ (Soter) ह्याने अलेक्झांड्रीया मधील आपल्या राजवाड्यात ‘अलेक्झांडर द ग्रेट’ चा ग्रंथसंग्रह ठेवून केली.

ईजिप्तला संग्रहालयाची प्राचीन परंपरा असली तरी कैरो मधील ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयमचा ईतिहास थोडा विचित्र आहे.

• १७८० ते १८३० अशा पन्नास वर्षांच्या काळात ईजिप्त मधील बऱ्याच पुरातन वस्तू पॅरिस व लंडन मधील म्युझियम्स मध्ये पाठवल्या गेल्यावर, १८३५ साली उशिरा का होईना पण ह्या अनमोल ठेव्याचे महत्व लक्षात येऊन तत्कालीन (ऑटोमन साम्राज्याचे मांडलिक असलेल्या) ईजिप्त सरकारने काही शिल्लक वस्तूंची जमवाजमव करून कैरोच्या अझबेकेया जिल्ह्यात एका राजमहालात हे संग्रहालय स्थापन केले.

• त्यानंतर लुक्झर मध्ये नवीन गोष्टी सापडण्यास सुरुवात झाल्यावर, १८४२ साली हा संग्रह कैरोच्या किल्ल्यात हलवण्यात आला.

• १८४८ ते १८५४ ह्या काळात कैरोचा राज्यपाल असलेल्या अब्बास I ह्याने संग्रहाचा बराचसा भाग ऑटोमन साम्राज्याचा सुलतान मेहमूद II ह्याचा पुत्र अब्दुल अझीझ ह्याला भेट म्हणून दिला तर १८५५ मध्ये त्याचा उत्तराधिकारी सैद ह्याने उरलेला संग्रह ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रान्सिस जोसेफ I चा धाकटा भाऊ मॅक्सिमिलियन I (हा पुढे नेपोलियन III च्या आग्रहावरून मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव अल्पकालीन सम्राट झाला) ह्याला भेट म्हणून देऊन टाकला, जो आता व्हिएन्ना मधील कुन्सथिस्टोरीशेस म्युझियम (Kunsthistorisches Museum, Vienna) मध्ये आहे.

• उत्खननात नवीन वस्तू सापडतच होत्या. मग पुन्हा १८५८ साली, फ्रेंच पुराणवस्तू संशोधक ऑगस्टे मेरीएट च्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ईजिप्शियन पुरातत्व विभागाने कैरोच्या बुलाक जिल्ह्यातील एका गोदामात नवीन संग्रहालय तयार केले. हि जागा नाईल नदीच्या किनाऱ्याला लागून होती त्यामुळे १८७८ च्या नाईलला आलेल्या पुरात ह्या संग्रहालयाचे प्रचंड नुकसान झाले.

• १८९१ साली परत सगळा संग्रह गिझा मधल्या एका जुन्या राजवाड्यात हलवण्यात आला.

• सातत्याने नवनवीन गोष्टींची भर पडून वाढत चाललेला हा संग्रह अखेर १९०२ मध्ये (ब्रिटीश अंमल असताना) तेहरीर चौकात खास संग्रहालयासाठी म्हणून बांधलेल्या प्रशस्त इमारतीत स्थिरस्थावर झाला.
१९०२ ते आजतागायत ११६ वर्षे याठिकाणी असलेल्या ह्या म्युझियम मधील संग्रहाचे चे २०१८ वर्ष अखेर पर्यंत गिझा येथे पिरॅमिडस पासून २ कि.मी अंतरावर नवीन बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीत स्थलांतर होणार आहे. अर्थात जुने म्युझियम देखील अस्तित्वात राहिलच पण इथे किती वस्तूंचा संग्रह राहिलं हे अजून स्पष्ट नाहीये.

४,८०,००० चौ.मी. क्षेत्रफळ असलेले, २०१२ साली बांधकामास सुरवात होऊन २०१८ वर्ष अखेर पर्यंत उद्घाटन झाल्यावर, जगातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालाय ठरणाऱ्या ह्या ‘ग्रँड ईजिप्शियन म्युझियम (GEM)’ मध्ये ‘तुत-अंख-अमुन’ च्या टॉम्ब मध्ये सापडलेल्या सर्व (५००० हून अधिक) वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत, सध्या केवळ ह्यातल्या १/३ वस्तूच प्रदर्शित केल्या आहेत. ‘ग्रँड ईजिप्शियन म्युझियम’ संकुलातील पिरॅमिड सारखी त्रिकोणी आकाराची मुख्य इमारत हि ‘ग्रेट पिरॅमिड’ च्या उंचीची असून तिच्या गच्चीवरून सर्व पिरॅमिडस बघण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझियम मधील काही निवडक छायाचित्रे:

ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझियम

.

.

फॅरोह कामोस ची लाकडी शवपेटिका.(१७ वा राजवंश ई.स.पूर्व. १६४५-१५५०)

.

फॅरोह अमेनहोटेप I ची लाकडी शवपेटिका.(१८ वा राजवंश ई.स.पूर्व. १५५०-१२९२)

.

तुत-अंख-अमुन ची पणजी 'थूया' ची शवपेटिका.(१८ वा राजवंश ई.स.पूर्व. १४ वे शतक)

.

.

.

.
.

.

.

.

.

.

.

.

ममीफिकेशन साठी वापरली जाणारी औजारे.

.
पपायरस वरील चित्रे व लेखन:

.

.

.

.

.

.

.

.
मातीची भांडी आणि दगडांवरील लेखन:

.

.

.

.
ईतर काही फोटो:

.

.

.

.

रॉयल ममी हॉल मधील काही ममींचे फोटो.

सेल्फी विथ द ममी Happy

.

रॅमसेस II ची ममी. जगात मृत व्यक्तीला पासपोर्ट इश्यू केला गेल्याची एकमेव घटना रॅमसेस II च्या, पर्यायाने ह्या ममीच्या बाबतीत घडली आहे.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

तुत-अंख-अमुनचा ११ किलो सोन्याचा ममी मास्क.

.

ममीफिकेशनची प्रक्रिया.

.

.

.

.

.

.

तुत-अंख-अमुनचा अर्ध पुतळा.

.

.

.

.

.

.

.

.

म्युझियम बघण्यासाठीची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असली तरी तिथले कर्मचारी ४:३० पासूनच पर्यटकांना बाहेर पडण्याच्या सूचना द्यायला सुरवात करतात, अर्थात ह्या गोष्टीवरून कर्मचारी आणि विशेषतः युरोपियन प्रवाशांमध्ये वादविवाद होतात पण ४:४५ ला दिवे बंद केल्यावर नाईलाजाने तेथून बाहेर पडावे लागते.

इतरांप्रमाणेच मी देखील ४:५० ला तेथून बाहेर पडलो आणि रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका उपहारगृहात स्पॅनिश ऑम्लेट आणि खुबुस खाऊन पोटातली भूक शांत झाल्यावर ७:०० वाजता एअरपोर्टला जायला निघायचे असल्याने त्याआधी सामानाची बांधाबांध करण्यासाठी सरळ हॉटेल गाठले.

तासाभरात सगळी तयारी करून सामानासहित ६:३० ला कॉमनरूम मध्ये येऊन बसलो. अहमदने आत्ता कैरो एअरपोर्टला जाण्यासाठी आणि अस्वानला पोचल्यावर तिथल्या हॉटेल ट्रान्स्फरसाठी कार बुक करून ठेवल्या होत्या. अस्वानला मला घ्यायला येणाऱ्या हसन नावाच्या ड्रायव्हरचा फोन नंबर त्याने मला दिला. सातला पाच मिनिटे कमी असताना मला पिक-अप करायला आलेल्या मेहमूद नावाच्या ड्रायव्हरने तो खाली उभा असल्याचे रिसेप्शनवर फोन करून कळवले. अहमद स्वतः मला गाडीपर्यंत सोडायला आला आणि अप्पर ईजिप्त मध्ये मनोसोक्त भटकंती करून ११ तारखेला परत या आम्ही तुमची वाट बघत आहोत असे सांगून सुरक्षित व मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रचंड ट्राफिकमुळे एअरपोर्टला पोचायला आम्हाला साडेआठ वाजले. सगळ्या औपचारिकता पूर्ण करून बोर्डिंग गेटपाशी येऊन बसलो. रात्री १०:१५ ला ठरलेल्या वेळी विमानाने टेक-ऑफ घेतला व ७००-७५० कि.मी. चा हवाई प्रवास पूर्ण करून नियोजित वेळी ११:४० ला अस्वानला पोचले.

अस्वान एअरपोर्टवर एक नवीनच प्रकार बघायला मिळाला. इथे येणाऱ्या प्रवाशांना रिसीव्ह करायला आलेले त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, कॅब किंवा टॅक्सी वाले एअरपोर्टच्या बाहेर ताटकळत न थांबता, थेट बॅगेज कलेक्शन हॉल पर्यंत आत येऊ शकतात. अशाच तिथे आलेल्या लोकांमध्ये माझ्या नावाची पाटी घेऊन उभा असलेला हसन मला दिसल्याने त्याला फोन करायची गरजच पडली नाही. सव्वा बाराला तिथून निघून ‘ऑर्किडा सेंट जॉर्ज’ हॉटेल पर्यंत १८ कि.मी. चे अंतर अर्ध्यातासात पार करून १२:४५ ला मुक्कामी पोचलो.

रात्रपाळीला असलेल्या मिना नावाच्या (पुरुष) रिसेपशनीस्टने फार वेळ न लावता तिसऱ्या मजल्यावरच्या रूमचा ताबा दिला. दिवसभर उभ्या उभ्या म्युझियम बघत फिरल्याने पाय थोडे दुखायला लागले होते. दुसऱ्या दिवशीचा पूर्वनियोजित कार्यक्रम काहीच नसल्याने सकाळी लवकर वगैरे उठण्याचीही घाई नव्हती. अस्वानला सुखरूप पोचल्याचा संदेश घरच्यांना पाठवून मस्तपैकी ताणून दिली.

क्रमश:

संजय भावे


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28291 views

💬 प्रतिसाद
ट
टर्मीनेटर Sun, 07/01/2018 - 16:48 नवीन
हा भाग लिहिताना एक प्रयोग केला आहे , काही ब्राउझर किंवा फोन वर फोटो बघताना काही समस्या येत असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात हि विनंती,
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Sun, 07/01/2018 - 18:01 नवीन
प्रयोग आवडला. डेस्कटॉप वर सगळे फोटो दिसत आहेत. लई भारी !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 07/01/2018 - 18:05 नवीन
धन्यवाद @ हरवलेला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/02/2018 - 05:08 नवीन
प्रयोग आवडला. मात्र छायाचित्रांमधे कॅप्शन्स टाकता आले तर अवश्य बघा. ममीज् च्या काही छायाचित्रांमध्ये ती ममी कोणाची हे कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:26 नवीन
हो कॅप्शन्स टाकायचा विचार आहे. हे नीट दिसेल कि नाही ह्याबद्दल थोडा साशंक होतो म्हणून आधी टाकली नाहीत.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 07/01/2018 - 17:26 नवीन
सुंदर वर्णन. खूपच माहितीप्रद. जेवढी वाचनीय त्याहून अधिक प्रेक्षणीय. मला desktop वर सर्व फोटोज अतिशय व्यवस्थित दिसले.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 07/01/2018 - 17:31 नवीन
धन्यवाद नितीनजी. काही फोन्स वर समस्या येण्याची शक्यता वाटत आहे. Android वर व्यवस्थित दिसतंय पण iphone वर कधी पुढच्या इमेज दिसतायत तर कधी नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 07/02/2018 - 05:03 नवीन
उत्तम प्रयोग संजय जी, सगळे फोटो अँड्रॉइड, पीसी दोन्हीवर उत्तम दिसतायत. भटकंती तर लाजवाबच! ह्या भागात खादाडी प्रकार थोडा कमी वाटला, अर्थात ते आमचे खादाडपण होय, बाकी झक्कासच!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:41 नवीन
धन्यवाद जेम्स वांड जी.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/02/2018 - 05:07 नवीन
अतिशय आवडला हा भाग. हे संग्रहालय न चुकवण्याजोगेच. तुतनखामेनच्या ममीच्या शोधाची रंजक कहाणीही लेखात सारांशाने यायला हवी होती. ही व्हॅली ऑफ किन्ग्स अपघातानेच सापडली होती. बहुधा तुमच्या आगामी भागांमधे हे येईलही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:43 नवीन
धन्यवाद प्रचेतसजी. हो... तुत अंख अमुन बद्दल माहिती व्हॅली ऑफ किंग्स - लुक्झर संबंधित लेखात येईल.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 07/02/2018 - 08:11 नवीन
@ टर्मीनेटर, चित्रांचा नवीन प्रयोग आवडला. कसा केला त्याबद्दल तंत्रविभागात लिहावे असा आग्रह. पु भा प्र, अनिंद्य
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:32 नवीन
धन्यवाद अनिंद्यजी. कितपत explain करता येईल ह्याची खात्री नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही :)
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 07/02/2018 - 08:18 नवीन
ऑस्सम. सांगोपांग माहिती. २०११ च्या क्रांती दरम्यान हिंसक जमावाकडून ह्या संग्रहालयाची तोडफोड झाली होती, त्यात अनेक प्राचीन वस्तूंची नासधूस व लुटालूट झाली.... - सगळ्या सो कॉल्ड 'क्रांतींमध्ये' कलाकृती आणि म्युझिअम का टार्गेट असतात कोण जाणे. २०१८ वर्ष अखेर पर्यंत गिझा येथे पिरॅमिडस पासून २ कि.मी अंतरावर नवीन बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीत स्थलांतर ..... - फारच रोचक डिझाईन आहे हे. नुकताच माझ्या एका जपानी मित्राने त्याचा 'कंसेप्ट व्हिडू' दाखिवला. त्यात ८०० मीटर लांबीची एक सलग पारदर्शी भिंत बांधण्यात येत आहे, काही ठिकाणी ही भिंत ४० मीटर उंच आहे ! (without visible supports ) त्यायोगे आतील वस्तू / वास्तू दर्शकांना बऱ्याच लांबूनही व्यवस्थित दिसू शकतील. एकूण खर्चाची मोठी रक्कम जपान सरकार देत आहे त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल असा होरा आहे. Can't wait to visit once its ready ! अनिंद्य
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:36 नवीन
खरं आहे. ग्रेट ईजिप्शियन म्युझिअम हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 07/02/2018 - 09:09 नवीन
अरे वा! नवीन प्रयोग आवडला.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:37 नवीन
धन्यवाद एस.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 07/02/2018 - 10:09 नवीन
ममीफिकेशनची माहिती खूपच रोचक आहे. छान चालू आहे लेखमाला
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 10:39 नवीन
धन्यवाद श्वेताजी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/02/2018 - 13:02 नवीन
छान आहे सर्व. याच भागाची वाट पाहात होतो. फोटो स्लाइड देण्याचा नवीन प्रयोग आवडला. मोबाइलमधून धागा लगेच उघडतो आणि सर्व फोटो पटकन सरकून पाहाता येतात. चांगली कल्पना! फोटोंच्या नवीन प्रयोगाबद्दल - १) हा प्रयोग अजून कोणी केला नव्हता, त्याबद्दल धन्यवाद. २) तुम्ही जो mittali dotcom/blog वापरला आहे तिथे जाऊन वाचला लेख परंतू mittali dot com त्याचे होमपेज सापडले नाही. ३) स्लाइडशोसाठी W3 container , <image class="mySlyde1/2/3" इत्यादी घेतलेले फीचर HTMLमध्ये आहे असं दिसतय. याचे एकदा template करून टाकतो. ४) फोटोची साइज 150 KB अथवा कमी आहे म्हणून फार झूम केल्यास विरळ होतात. ५)फोन मेमरीमधले मूळ फोटोंची साइज २ एमबीपेक्षा अधिक असल्यास गुगल फोटोवर अपलोड केल्यावर 700-800 KB साइज मिळायला हवी.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 14:21 नवीन
२) तो माझ्या प्रस्तावित वैयक्तिक ब्लॉग चा पत्ता आहे त्यामुळे होमपेज नाही सापडणार. ३) template मध्ये w3.css आणि HTML , जावा स्क्रिप्ट चा वापर केला असून, ते मिपावर दर्शवण्यासाठी iframe चा वापर केला आहे. ५) मूळ फोटोंची साईझ सरासरी ४ एमबी असूनही गुगल फोटोवर अपलोड केल्यावर ती फारच कमी झाली आहे. (कोणतीही सेटिंग न बदलता.)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/02/2018 - 14:43 नवीन
"**५) मूळ फोटोंची साईझ सरासरी ४ एमबी असूनही गुगल फोटोवर अपलोड केल्यावर ती फारच कमी झाली आहे. (कोणतीही सेटिंग न बदलता****" काही डिवाइसमधून "गुगल फोटो" या क्लाउड स्टोरिजवर बॅकअप/अपलोड केले जात असताना ते भयानक कम्प्रेस केले जातात ( असा काही कोड असावा.) त्यास पर्याय म्हणजे >> photo dot google dot com साइट उघडणे,>>albums + केल्यावर >> मेमरीतला तो फोटो निवडून अपलोडचे बटण दाबल्यावर>>> दोन पर्याय दिसतील - अ)हाइ क्वॅालटी क्विक अपलोड रेडिओ बटण इथेच ओन असते ब) फुल रेझलुशन अपलोड this will reduce your available free 15GB storage. तर काही विशेष फोटोंसाठी पर्याय (ब) घ्या आणि पाहा काय फरक पडतो. हे होताना MB used दिसेलच. यानंतर या फोटोची शेअर लिंक घ्या. तुतखामेनच्या मुखवट्यांचे ट्राइअल करून पाहा. फ्री स्टोरिजची मर्यादा प्रत्येक डिसाइसला देतात का/ प्रत्येक गुगल मेल अकाउंटला मिळते ते जाणकार सांगतीलच. मेल अकाउंटला असल्यास चिंता नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 15:01 नवीन
प्रत्येक फोटो सिलेक्ट करून अपलोड केला आहे... तुत अंख अमुन च्या मुखवट्याचा मूळ फोटोच चांगला नाही आलाय, त्याचा आणि ममीज चे फोटो काढायला मनाई आहे त्यामुळे ते फोकस सेट न करता Randamly काढले आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/02/2018 - 14:50 नवीन
>>>३) template मध्ये w3.css आणि HTML , जावा स्क्रिप्ट चा वापर केला असून, ते मिपावर दर्शवण्यासाठी iframe चा वापर केला आहे.>>>> हो, तो कोड मिळाला iframe सह.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Tue, 07/03/2018 - 15:17 नवीन
झकास चालू आहे ट्रीप! प्रयोग पण आवडला.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 07/04/2018 - 10:27 नवीन
धन्यवाद रंगीला रतनजी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/03/2018 - 20:38 नवीन
हा भागही मस्तं आहे. नवीन प्रयोग आवडला !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 07/04/2018 - 10:28 नवीन
धन्यवाद डॉक्टर.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/05/2018 - 17:38 नवीन
छान! आवडला हाही भाग.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 07/05/2018 - 19:07 नवीन
धन्यवाद यशोधराजी.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 07/06/2018 - 07:10 नवीन
मस्तच झालाय हा भाग. बरीच नवीन माहिती समजते आहे. धन्यवाद. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 07/06/2018 - 10:06 नवीन
धन्यवाद दुर्गविहारीजी.
  • Log in or register to post comments
A
adya82 गुरुवार, 09/19/2019 - 11:54 नवीन
Sir, sadharan kiti expense zala including tickets, visa, stay, food, entry fees & site seeing
  • Log in or register to post comments
A
adya82 गुरुवार, 09/19/2019 - 12:02 नवीन
Tumacha contact number share karal ka?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 09/20/2019 - 06:33 नवीन
तुम्हाला व्यक्तिगत संदेश पाठवला आहे. शेवटच्या १२ व्या भागात माझा ईमेल आयडी. दिला आहे, त्यावर आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा