संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ?
संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ? या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा पुन्हा टिका करताना दिसतात. काय असतील या संघ विरोधामागची कारणे ?
इंग्रजांविरुद्ध मोठ्या लढाईला सुरुवात झाली ती 1857 मधे. त्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले आणि झाशीच्या राणीसारखे संस्थानिक त्यात सहभागी होते. पुढे वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र लढा दिला. सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, तीन चाफेकर बंधू फासावर चढले. सावरकरांनी इंग्लंडमधे राहून सशस्त्र क्रांतिकार्यासाठी मदत पुरवली. तो लढा अधिक प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला. पण सावरकरांचे योगदानही सतत नाकारण्याचा प्रयत्न होतो. एखाद्या टीकाकाराला विचारा की सावरकरांनी जर काहीच योगदान दिले नव्हते तर इंग्रजांनी त्यांना अंदमानच्या तुरुंगात का डांबले होते ? टीकाकारांकडे याचे उत्तर नसते.
लोकमान्य टिळकांचे योगदानही नाकारण्याचा प्रयत्न होतो. इथेही टिळक या व्यक्तीपेक्षा त्यांची जात अनेकांना सलते.
महाराष्ट्रात तरी इंग्रजांविरुद्ध लढण्यामधे ब्राह्मण समाज आघाडीवर होता. काँग्रेस पक्षावर या समाजाची पकड होती. गोपाळ कृष्ण गोखले कमी वयात काँग्रेसचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही जणांच्या असे लक्षात आले की आपल्याला सत्ता हस्तगत करायची असेल तर या जातीला बाजूला सारायला हवे. म्हणून ब्राह्मण जातीला त्यांनी बदनाम करायला सुरुवात केली.
<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>
संघाची स्थापना 1925 साली झाली. त्याला बाबाराव सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा आशीर्वाद होता. आपली स्वतःची संघटना त्यांनी संघामधे विलीन केली. स्वा. सावरकरांचेही संघाला आशीर्वाद होते. किंबहुना नानासाहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर यांचीच परंपरा सांगणारे लोक संघामधे सामील झाले. हुतात्मा राजगुरू यांचे सख्खे नातेवाईक आज संघाच्या कामात आहेत.
ब्राह्मण जातीचा असा शिक्का बसल्यामुळे संघाबाबत आकस असावा असे दिसते. आपल्याकडे थेटपणे जातीला नावे ठेवणे सुसंस्कृतपणाचे समजले जात नाही. पण अप्रत्यक्ष रीतीने दिलेल्या शिव्या मात्र खपून जातात. जिथे जिथे ब्राह्मण समाज दिसेल, तिथे तिथे त्याचे योगदान नाकारले जाते. टीकाकारांचा रोष संघावर नसून ब्राह्मण जातीवर आहे. उद्या संघावर ब्राह्मणांऐवजी इतर जातींचा पगडा आहे अशी प्रतिमा समाजामधे तयार झाली तर हेच टीकाकार संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे किती मोठा सहभाग होता, असे सांगायला सुरुवात करतील.
थोडक्यात काय तर नेणीवेमधे ब्राह्मण जातीबद्दल असलेला आकस संघ विरोधाच्या रूपाने जाणिवेत प्रगट होतो.
ashutoshjog@yahoo.com
संघाबाबत आकस काहा चर्चिलेला आहे. तो मुद्दा सोडू नका म्हणजे झाले. संघावर ब्राह्मणांचा असा शिक्का बसल्याने विरोध आहे.