Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (२)

म
माहितगार
गुरुवार, 06/28/2018 - 11:33
🗣 70 प्रतिसाद
पहिल्या भागात हिंदू मुस्लिम धर्मांतर्गत विवाहाच्या सामाजिक-राजकीय पैलुंच्या इतिहासाचा अंशतः विचार केला. हिंदू परंपरावाद्यांनी आताच्या काळात १८ पेक्षा अधिकच्या वयोगटास थांबवणे आता त्यांच्या सहज बसची बात राहिलेली नाही . कोर्ट कचेरी १८+ वर्षे वयाच्या मुला मुलींची जी काही बाजू असेल ती घेणार . प्रतिष्ठेसाठी कायदा हातात घेणे ऑनर किलींग या तसेही आदर्श बाबी नाहीत आणि २१ व्या शतकात त्याला स्थान नाही. मिडिया, सोशल मिडिया चार दिवस चघळेल नंतर परिस्थिती तुमची तुम्हालाच हाताळावी लागणार . परिस्थितीच्या नावाने रडणार कि त्यातल्या त्यात रचनात्मक काय करता येईल हे पहाणार, हे ठरवले पाहीजे. हिंदू मुलींचे मुस्लिम मुलांशी लग्न झाले कि मुस्लिम मुलीही हिंदू मुलांशी लग्ने झाल्याची काही उदाहरणे पुरोगामींकडून दिली जातात, हि लोकसंख्या प्रोपोर्शनेट असती तर हिंदूंएवजी मुस्लिम समाज काळजीत पडला असता. मुस्लिम स्त्री अजूनही अंशतः पडद्यात आणि पारिवारीक विवाहात अडकलेली आहे. किंवा शिक्षण घेतले तरी सहसा उर्दू माध्यमातून घेतले गेल्यामुळे मेट्रोपॉलीतील कॉन्व्हेट शाळातून शिकणार्‍या काही मुली को एज्युकेशन मध्ये पोहोचतात तेवढाच काय तो सहसा हिंदू मुलांशी संपर्क येत असणार, हिंदू मुलांचीही मोठ्या प्रमाणावर अरेंज्ड मॅरेजेसच होतात मग मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असे विवाह-लव्ह मॅरेज त्याच प्रोपोर्शन मध्ये दिसत नाहीत. पण समजा एखाद्या हिंदू मुलास अथवा कुटूंबास मुस्लीम मुलीशी शोधून विवाह करुन सून म्हणून परिवारात स्विकारुन घ्यायचे असेल तर काय मार्ग असू शकतात अशा मुली उपलब्ध असू शकतात का ? कोणत्याही समाजातील लिबरल लोकांची एकुण संख्या किती ते शैक्षणिक, सामाजिक, राजकिय परिस्थितीवर अवलंबून असले तरी किमान १५% ते २० % लिबरल तुम्हाला कोणत्यही समाजात सापडावेत उर्वरीत ८५ पैकी केवळ १५ टक्के कट्टर असण्याची शक्यता असते मधला ७० टक्के वर्ग सहसा परंपरावाद्यांच्या बाजूने उभा असतो पण या ७० टक्क्यांना पालकांनी दिलेल्या बेसिक इंट्रो पलिकडे स्वतःच्या धर्माचाही अभ्यास नसतो तत्वज्ञानाची तात्विक भूमिका घेता येणे दूरची गोष्ट असते. म्हणजे तुम्ही स्विकारण्यास तयार असाल आणि तत्वज्ञानाचा अभ्यास तुमचा स्वतःचा पक्का असेल तर १५ टक्के समाजातील मुली सहज तर उर्वरीत ७० टक्के पैकी जराशा प्रयत्नाने विवाहास उप्लब्ध होऊ शकाव्यात. असे होईलच याची गॅरंटी नाही म्हणून चुभूदेघे . आता मुस्लिम मुलींशी संवाद वाढवण्याचे मार्ग कोणते असू शकतील ? -वृत्तपत्रिय जाहीराती विवाह पोर्टल हे सहज मार्ग असावेत. अर्थात जे काही कराल ते कायदेशीर मार्गाने मुलीच्या पालकांची आणि भावांची संमती घेऊन केले म्हणजे शांततेत पार पाडणे सोपे होऊ शकते - त्यांच्या कडचे अधिकतर विवाह परिवारात होतात त्यामुळे परिवारातले अथवा त्यांच्या जातीतले पर्यायी प्रोपोजल असेल तर जनुकीय दृष्ट्या परिवारीय अथवा जातीअंतर्गत विवाहापेक्षा आंतरधर्मीय विवाह श्रेयस्कर असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. एक तर महिलांसाठी १/३ आरक्षणाचे समर्थन करणे . हिंदू मुलांशी विवाह करणार्‍या मुस्लिम महिलांना खास करुन तलाक पिडीतांना नौकर्‍यात आणि उत्पादन कौशल्याचे ट्रेनिंग व फायनान्सला प्राधान्य देणे, विशेषतः खेळ, नाटय, अभिनय, नृत्य, संगित, साहित्य, काव्य, चित्र, मुर्तीकला अशा असंख्य कलातील कलात्मकता विकसित करण्यास हिंदू संसकृती इस्लामी संस्कृती पेक्षा नक्कीच अधिक मोकळीक अधिकृतपणे देऊ शकते या सकारात्मक बाजुस पुढे ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. आता दोन्ही बाजूने येणारी नेहमीची समस्या त्यांच्या मुलामुलींचे आणि पालक आणि नातेवाईकांचे मुर्ती पुजा अणि अनेकेश्वर पद्धत चुकीची असल्याचे रोज ब्रेन वॉशींग झालेले असते. इथे हिंदू धर्मातील तत्वज्ञानाची बाजू मजबूत आहे पण त्या बाबत भूमिका मांडणी अधिक व्यवस्थित जमली पाहिजे. पहिला प्रश्न मी कोणत्या जातीत येणार असा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो ईस्लाम-ख्रिश्चन मध्ये जाणारा प्रत्येक नवा ईस्लाम-ख्रिशचन मधील विशीष्ट जात पंथात लगेच जोडून घेत नसतो तसे गरजेचेही नसते , इतर धर्मात जाती नाहीत तसे हिंदू धर्मातही अधिकृतपणे कोणतीही जात अस्तित्वात नाही हे लक्षात आणून दिले पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी वर्ण स्विकारणे गरजेचे राहीलेले नाही पण तुम्हाला तुमच्या समाधानसाठी हवा असेल तो निवडायचा असल्यास निवडा. तुम्ही अमुकच का निवडला हे विचारण्यास कुणिही येऊ शकत नाही. दुसरी बाब त्यांच्या लक्ष्यात आणून दिली पाहिजे की ईश्वराच्या निर्गुण निराकार असण्या बद्दलच्या फेज मधून हिंदू धर्म केव्हाच पुढे येऊन त्याने नंतर ईतर विवीध पद्धतीने ईश्वरा शी जोडून घेण्यास प्रत्येकाला मोकळीक दिलेली आहे. तुम्ही भारत देशावर आई या रुपा एवजी समजा वेगळ्या नात्याने जोडून घेता तसेच काहीसे हिंदू धर्मात इश्वरीय शक्तीशी केवळ गुलाम नात्याने जोडून न घेता विवीध नात्यांनी जोडून घेता येते. 'हिंदू धर्मातील एक एक मुर्ती एक एक पुस्तकातील ईश्वरीय शक्तीचे स्मरण देते . ' हे वाक्य तुम्हाला समजले नाही तरी मुस्लिमांना समजण्यास सोपे जावे. कारण त्याच्यांत ईश्वराची जाणीव व्हावी म्हणून सुर्य चंद्रादी तार्‍यांची योजना केलेली आहे हे समजते- तशीच हि इश्वराची आठवण करण्याची मुर्तींची योजना आहे. हे ही पचनी पडेलच असे नाही आणि पचनी पडलेच पाहिजे असेही नाही हे त्यांच्या आधी लक्षात आणून दिले पाहीजे. अगदी ईश्वराचे नामःस्मरण करनारेअनेक स्पिकर लावून त्यांची मुर्ती बनवली तर मुर्ती पुजा विरोधक काय भूमिका घेतील माहित नाही पण पादुका पुजेच्या विरोधात भूमिका घेणे सर्वात कठीण असावे. पण एवढेही नको असेल तर कोणतीच मुर्ती नघेता कोणताही ग्रंथ घेऊन किंवा ग्रंथा शिवाय पण हिंदू रहाता येते आता तेही नकोय कुराण (किंवा बायबल किंवा अजुन कोणता आहे तो ) सांभाळायचा आहे तर हिंदू धर्म वस्तुतः धर्म ग्रंथ, प्रार्थना पद्धती सर्वाचेच स्वातंत्र्य देतो दुसर्‍यांच्या प्रार्थना आणि भक्ती पद्धतीचे स्वातंत्र्य हिरावू नका, स्वतःच्या देशावर प्रेम करा म्हणजे झाले. तिसरी बाब हि लक्षात आणून दिली पाहिजे की बर्‍याचदा धर्म आणि संस्कृतीची गल्लत केल्याने बरीच पंचाईत होते, हिंदू धर्मातील अनेक प्रथा परंपरा या सांस्कृतिक आहेत. हिंदू धर्मीय प्रत्येक गोष्टीत देव किंवा ईश्वरी शक्ती पहातो म्हणजे प्रत्येकाने पाहिले पाहिजे असे नाही किंवा म्हणून टाळले पाहिजे असे नाही. हिंदू धर्मीय प्रकाश स्त्रोतांना पाहूनही नमस्कार करता त म्हणून तुम्ही ते सगळे प्रकाश स्त्रोत वापरणे सोडू शकत नाही . रांगोळी सारख्या अनेक कला व्यक्ति चित्रांशिवाय काढणे शक्य आहे . एकुण सामाजिक-राजकीय सक्रीय हिंदूंनी स्वतःच्या मनातली असुरक्षीततेची भावना दूर करून घेण्यासाठी मंगलमय हिंदू संस्कृतीची कवाडे मुस्लिम महिलांना मनमोकळे पणाने उघडली पाहीजेत असे वाटते. * मुस्लिम महिलांनी मुस्लीमेतरांशी विवाहाबद्दल एका आमेरीकन लेखकाचा उदारपंथी दृष्टीकोण असलेला लेख * Why this deference towards Islam? सुनील शरण टाईम्स ऑफ ईंडिया २७ ऑगस्ट २०१८ * हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (३) * टिकटॉक एका खुपलेल्या विषयाची चर्चा हि जाहीरात, जाहिरात आहे अद्याप वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती असती तर जाहिरातीची जरुरी भासली नसती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28478 views

🗣 चर्चा (70)
म
मराठी कथालेखक Sun, 07/01/2018 - 09:37 नवीन
'xxx खतरे मे है' अस मानणार्‍या कोणत्याही xxx धर्माबद्दल बोलतोय असं समजून घ्या.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/29/2018 - 09:50 नवीन
असुरक्षिततेच्या भावनेच्या कारण मिमांसे च्या चर्चे साठी पूर्ण स्वतंत्र धागा हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, परस्पर अविश्वासाची कारण मिमांसा, विश्वास प्रक्रियेची पुढील दिशा असताना तिकडे चर्चा करावयाचे सोडून या धागाचर्चेत अवांतर करण्याचे प्रयोजन अनुषंगिक असले तरीही कळत नाही. असो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/28/2018 - 20:11 नवीन
लव जिहाद चा मुद्दा कोर्टाने ही मान्य केलाय
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 06/29/2018 - 17:15 नवीन
कारण हिंदु मुलींचे चेहरे पाहून त्या मुली आहे की म्हातार्‍या ते कळते. मुस्लीम मुली बुरख्यात असल्यामुळे ती मुलगी आहे, कि विवाहित आहे की म्हातारी काही कळत नसावे. असा अंदाज ! तस्मात मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा अशी जोडी हवी असल्यास बुरखा पद्धत बंद करावी लागेल. अवांतर : आपलं ठेवायचं झाकून दुसर्‍याचं पहायचं वाकून ही म्हण इथे वापरल्यास योग्य राहिल काय ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/30/2018 - 05:36 नवीन
...आपलं ठेवायचं झाकून दुसर्‍याचं पहायचं वाकून ही म्हण इथे वापरल्यास योग्य राहिल काय ?
अल्पश्या बदलाने होय, 'आपलं ठेवायचं झाकून, दुसर्‍याचं घ्यायचं अत्याग्रहाने मागून' नक्कीच लागू पडावी.
...तस्मात मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा अशी जोडी हवी असल्यास बुरखा पद्धत बंद करावी लागेल.
पडदा पद्धती हि एक समस्या आहेच, त्या शिवाय विवाह परिवारातल्या परिवारात करणे हि दुसरी सुद्धा समस्या आहे. दोन्ही विषयांवर अलिकडेच धागे काढून झालेत. त्या चर्चातही अवश्य सहभाग घ्यावा. त्या शिवाय सेक्युलर नॉन उर्दू को एड एज्युकेशन पासूनही मुस्लिम मुलींना दूर ठेवले जाते, हिंदू धर्माबाबत नसत्या ब्रेन वॉशींगची जबरदस्ती होते त्यामुळे मुस्लिम मुलींना हिंदू मुलांशी विवाहाच्या समान संधी पासून दूर रहावे लागते, समान न्यायाच्या तत्वाने हा मुद्दा नक्किच महत्वाचा आहे.
....मुस्लीम मुली बुरख्यात असल्यामुळे ती मुलगी आहे, कि विवाहित आहे की म्हातारी काही कळत नसावे. असा अंदाज !
मुस्लिम ते मुस्लिम विवाहातही कळण्यास काय मार्ग आहे ? आणि त्यांच्यातला पडदा आणि बुरख्यासहीत दाखवण्याचा कार्यक्रम कसा वर्क आऊट होतो ह्याची कल्पना नाही. पण एक मोठे प्रमाण ३० ते ४० टक्के तरी पारिवारीक विवाहाचे असते आणि बुरखा घालण्यास सुरवात होण्याच्या आधीच्या अगदी लहानपणच्या स्मृती आठवणीत असू शकणे काही मुलांसाठी शक्य असावे . पण सगळ्यांच्या लहानपणच्या स्मृती एवढ्या शार्प असतीलच असेही नसावे. त्यामुळे मुस्लिम मुले सहज दिसणार्‍या हिंदू मुलींच्या मागे पडत असण्याची आपण व्यक्त केलेली शक्यता अगदीच नाकारता येत नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/29/2018 - 19:06 नवीन
बोंबला , इतका वेळ चाललेल्या काथ्याकूट मध्ये बुरखा , तीन तलाक हे मुद्दे विसरलो होतो की राव ! पुढील वाक्य मराठी कथालेखक यांचेच आहे "धर्म ही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे असे मी म्हंटले त्याचे कारण व्याहवारिक आणि सामाजिक जीवनात धर्माची आवश्यकता फारशी उरली नाही. न्याय व न्यायव्यवस्था ही समाजाची एक सार्वत्रिक आणि सर्वकालिन गरज आहे. पुर्वी न्यायव्यवस्था या धर्मावर आधारित होत्या, राजाने चालवलेला राज्यकारभार धर्मतत्वांवर आधारीत असावा अशी अपेक्षा होती. समाजाला न्यायव्यवस्था पुरवण्याचे काम बहुतांशी धर्माने आणि धर्माने चालणार्‍या सत्तांनी केले. पण आता धर्माची जागा राज्यघटनेनी घेतली आहे. त्यामुळे धर्माची गरज फक्त आध्यात्मिक निकड भागवणे हीच बहुतांशि राहिली आहे... " मराठी कथालेखक यांच्या म्हणण्यानुसार जर धर्माची जागा राज्यघटनेनी घेतली आहे तर तीन तलाक हि पद्धत स्रियांसाठी अन्यायकारक असताना तीन तलाक कायद्या विरोधात मौलावी पुरस्कृत हजारो मुस्लिम स्रियां चे मोर्चे का काढले गेले ? आणी मुस्लिम समाजा कडून स्रियांना बुरख्यातून स्वातंत्र्य का भेटत नाही ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/30/2018 - 05:13 नवीन
ह्या मुद्द्या च्या वेगळ्या बाजूची चर्चा मी वर केली, त्यास बिरबलाची खिचडी शिजत आहे असे उत्तर आले. हिंदूंच्या समाज सुधारणेची खिचडी लगेच शिजली पाहीजे आणि इतरांबाबत चाहे सो समय लेलो संक्रमण अपना समय लेता है. आक्षेप पुरोगामीत्वाला नाही निरपेक्षतेच्या गोंडस नावा खाली लपवलेल्या सापेक्षतेला आहे. धर्मच काल बाह्य झाला तर धार्मीक अल्पसंख्यंकांसाठी वेगळ्या सोईंचे प्रयोजन उरत नाही. अशाच पद्धतीने भारतीय राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच, धार्मीक स्वातंत्र्याला मुलभूत आधिकाराचा दर्जा भारतीय राज्यघटनेत असण्यास प्रयोजन रहात नाही या मुद्द्यावर श्रीमान मराठी कथालेखक यांनी सहमत होऊन भूमिका स्पष्ट करावयास हवी.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 08:32 नवीन
मिपावरील तमाम पुरोगामी सभासदांना वाऱ्यावर सोडून लष्कर ए काँग्रेस च्या अध्यक्षा सारखे ' मराठी कथालेखक ' अचानक सुट्टीवर गेले आहेत , मला तर ते मंगुशेठ चा अवतार वाटत होते .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 07/01/2018 - 09:41 नवीन
"चर्चा करताना वैयक्तीक हल्ले करु नये, विचारांचे खंडन करावे. पण मिपाकरांवर लेबल्स लावू नये" अशी भाबडी आशा घेवून मी मिपावर वावरत होतो. असो... तुमचं चालू द्या..
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 06/30/2018 - 08:45 नवीन
मिपावर बालिशपणाच कळस चढवलात. अभिनंदन...!! आता मोठे होण्यासाठी तयारी करा. Grow up Champ...!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/30/2018 - 09:17 नवीन
मुद्दे मुद्यांनी खोडावेत. तर्कदोष असतील तर नजरेत आणावेत. त्या पलिकडे जाऊन मिपावर बालिशपणाच कळस चढवलात. मिपावर बालिशपणाच कळस चढवलात. अभिनंदन...!! आता मोठे होण्यासाठी तयारी करा. Grow up Champ...! हे सर्व व्यक्तीलक्ष्य तर्कदोषातच बसते. आम्ही बालीश तर तुम्ही बालीश आम्ही दहा बालीश तर तुम्ही हजार बालीश , आमचे परदादा बालीश तर तुमची पतवंड बालीश ! हा सगळा बालीशपणात तर्कदोष तर्कदोषच रहात असावेत.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 06/30/2018 - 10:57 नवीन
माहितगार जी हा प्रतिसाद तुमच्यासाठी नव्हता. मिपा पेजच्या लेआऊट मुळे तुम्हाला वाटले असेल कदाचीत. तर्कशास्त्री म्हणून मिपावर तुमचे खूप मोठं स्थान आहे. त्या बाबतीत आम्ही अंड्यात पण नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कृपया गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 09:28 नवीन
खूप लवकर विसरलात हो !!!! , बलिशपणा तुम्ही करत होतात . ऊठसूट संपादक , तालुका , मा . शरद पवार यांचे उल्लेख करून . त्यामुळे आता आता या वरच्या वर्गात .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 06/30/2018 - 11:21 नवीन
मी विसरलो नाही. सं.मं. बाबतीत मी मान्य केले होते. तुम्ही विसरलात आणि येथे त्याचा उल्लेख करून कोतेपणा केलात. असो...! === बाकी लोकांना मिपा व्यतिरिक्त ईतर ही कामे असतात. कोणी पळून जात नाही. काही बालीश किंवा आधीच चर्चा करून चोथा झालेल्या प्रतिसादांना लोक फाट्यावर पण मारतात. === मी वरच्या वर्गात कधीच आलोय. कदाचित दुसर्या तुकडीत असल्याने तुम्हाला दिसत नाही.असो..!! === मंगूंची जास्त आठवण येत असेल तर व्यनी करा.. दुसर्यांचे संबंध जोडण्याचा धंदा बंद करा.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 15:24 नवीन
विशुमित साहेब , अशी रफटफ भाषा वापरून तुम्ही मिपावरील सभासद कमी नका करू हो !! म्या सुद्धा तुम्हाला घाबरून मिपा सोडणार व्हतो पण आता बळबळ वुसण आवसान आनून बोलतोय . आणि कसं आसतंय की आपल शिक्षान , आणि आपला पत्ता आपल्या भाषेत दिसतो . कशाला उगीचच दुसऱ्याला इनाकारण टप्ल्या मारायच्या ? मराठी कथालेखक नीं दोनचार मुद्दे माझ्यावर फेकून नंतर ते दिसत नव्हते म्हणून मी त्यांना चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही मध्येच ........ चालायचंच . आणि मंगुशेठ ने माझ्या नावाचा अपभ्रंश करून , पातळी सोडून भरपूर केविलवाने विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण मी त्यांना शोधून चर्चेत आणायचा प्रयत्न करत होतो . असू द्या हार न मानता आपल्याला वादविवाद घालायचे आहेत .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 06/30/2018 - 16:18 नवीन
बरं ! लवकर बरे व्हा...!
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 16:37 नवीन
आसू द्या ! आसू द्या !! शेपूट कधीच सरळ व्हणार नाय वाटत ( कृ ह घ्या )
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 09:46 नवीन
खूप लवकर विसरलात हो !!!! , बलिशपणा तुम्ही करत होतात . ऊठसूट संपादक , तालुका , मा . शरद पवार यांचे उल्लेख करून . त्यामुळे आता आता या वरच्या वर्गात .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 06/30/2018 - 11:37 नवीन
Social Media Day च्या निमित्तानं निदा फाजलींच्या या दोन ओळी सांगाव्याशा वाटतात. दुश्मनी लाख सही, खत्म न किजे रिश्ता दिल मिले या ना मिले, हात मिलाते रहिये! योगेश मेहेंदळे यांचा लोकसत्तातील हा लेख वाचावा असे सुचवितो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 06/30/2018 - 16:19 नवीन
+1
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा