Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आणीबाणीतले अनुभव

म
मराठी कथालेखक
Wed, 06/27/2018 - 15:52
🗣 128 प्रतिसाद
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत. पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही). तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41615 views

🗣 चर्चा (128)
स
सुबोध खरे Fri, 07/06/2018 - 06:16 नवीन
आमचे कुटुंब आणि गोतावळा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरुक होता. घरी कडाक्याच्या चर्चा चालत. मीटिंगा असत, शेजारपाजारी, नातेवाईक जमत. अनुभवांची देवाणघेवाण होई. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने मला ते ऐकायला, त्यात भाग घ्यायला , स्वत:ची मते मांडायला आवडे. घरी खूप मोकळे वातावरण असे. तेव्हा सगळे अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कडाडून बोलत. आपल्या घरच्या चर्चेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणताय हे जितके हास्यास्पद आहे तितकेच त्या महिलेचे स्वतः च्या शारीरीक अनुभवावरून जगाबद्दल अनुमान काढणे हास्यास्पद आहे. माझे एक तरी म्हणणे आपल्याला पुराव्यानिशी खोडून काढता आले आहे का? श्रीमती इंदिरा गांधी यांनी पूर्ण बहुमताच्या आधारावर जितकी एकाधिकारशाही राबवली -- राज्याचे निवडून आलेले सरकार बरखास्त करण्यापासून मर्जीतील न्यायाधीशांना सर्वोचच न्यायालयातील सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती देण्यापासून विरोधकांना २१ महिने विनाचौकशी तुरुंगात डांबण्यापासून ते सर्व वृत्तपत्रांची वीज खंडित करण्यापर्यंत -- तितकी एखाद्या हुकूमशहाने हि केली नव्हती आणि तुम्ही म्हणताय

अभिव्यक्ती स्वातंत्र्य.

बढिया है
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 07/06/2018 - 08:15 नवीन
आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का? समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 07/09/2018 - 19:08 नवीन
आणिबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वसाधारणपणे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी बराच हात दिला असे दिसते. महाराष्ट्रात ४८ पैकी २० जागा काँग्रेसला मिळाल्या. २८ जागांचे विश्लेषण केले तर मुंबईतील सर्वांच्या सर्व जागा जनता पक्षाला मिळाल्या. इतरही ठिकाणी सर्वसाधारणपणे शहरी मतदारांनी काँग्रेसला नाकारले. या ठिकाणी शहरी विचारसरणीचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. सर्वसाधारणपणे सामाजिक प्रश्नांबद्दलची जागरूकता, प्रसारमाध्यमांकडून होणारी एका विशिष्ठ विचारसरणीची भलामण किंवा हेटाळणी याचा शहरी मतदारांवर सहज परिणाम होतो. आतातर प्रचार सोपा झाल्यामुळे शहरी मतदार सहजपणे सरसकटीकरण करतात जसे सहकार म्हणजे खाबुगिरीची कुरणे, काँग्रेस म्हणजे बेगडी धर्मनिरपेक्षता वगैरे. खेड्यात आणि त्यातही महाराष्ट्रातील खेड्यात गावपातळीवर रोजगार, लोकांच्या सहभागातून उद्योग आणि संपत्तीची निर्मिती यात काही गावांनी कमालीची आघाडी घेतली होती. आणि हि सर्व गावे नैसर्गिक दृष्ट्या संपन्न होती असेही नाही. याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा. आणि हि गावपातळीवरची प्रगती हे काँग्रेसचे निःसंशय असे यश होते. त्यामुळे शेतकरी सहसा काँग्रेसला नाकारत नाही. उत्तरेत एकूणच लोकांची मानसिकता सरंजामशाहीला अनुकूल अशी आहे. तेथे आजही सरकारी नोकरीचे कमालीचे आकर्षण असते. आणि या मानसिकतेमुळेच तेथे बर्याचवेळेला राजकारणी आणि नोकरशहा यांची भ्रष्ट एकी पाहायला मिळते. नसबंदीची सर्वात जास्त सक्ती आणि अत्याचार यामुळे काँग्रेसचा येथे गावपातळीवर देखील पराभव झाला परंतु जेथे असे प्रकार फारशे झाले नाहीत तेथे जनतेने काँग्रेसला हात दिला.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 07/09/2018 - 08:24 नवीन
मिपावर कोणीतरी शेतकरी सदस्य असेलच जो माझ्या वरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. मला उत्सुकता आहे, कारण इतका मोठा वर्ग आणीबाणीच्या विरोधात गेल्याशिवाय ते जुल्मी सरकार कोसळणे अशक्य होते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 07/09/2018 - 17:30 नवीन
आणीबाणीचा अनुभव नाही. अगदी दुपट्यात वगैरे असायचा पण संबंध नाही कारण आई बाबाच माध्यमिक मध्ये असतील! पण इथे वाचून अंदाज आला. मोदी आणि त्यांचे समर्थक कितीही मूर्खासारखे वागत असले (असं मानू एक मिनिट) तरी ही आणीबाणी नाहीच. कायदेशीर पद्धतीने सरकार ने नियंत्रण आणणे ही वेगळीच गोष्ट असणार. लोकांना दट्ट्या लागला की सुव्यवस्था आली असेलच, पण लोकशाही मध्ये ही स्वागतार्ह कशी असेल? चीन मध्ये पण लोक शिस्तीत वागत असतीलच. पण तसं जगायचं आहे का आपल्याला. जर्मनीत पण लोक शिस्तीत वागतात आणि त्यासाठी सरकार नीट यंत्रणा राबवते, आणीबाणी किंवा हुकूमशाही आणत नाही. म्हणून तेव्हा लोक धड वागत होते तस्मात आणीबाणी उत्तम हा तर्कच चुकीचा आहे. आणि वर मोदी सरकारशी त्याची तुलना करणं सुद्धा चूक आहे. मोदी पुष्कळ चुकत असतील, माझंही तेच मत होत चाललं आहे, तरी ही काही आणीबाणी नाही. कारण त्याविषयी मी दुनियाभर बोंबलू शकतेय.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 07/10/2018 - 09:31 नवीन
इथे धागालेखकाने खास करून आपले अनुभव प्रत्येकाने मांडावेत असे लिहिले होते म्हणून वैयक्तिक अनुभव लिहिले. हे अनुभव सार्वजनिक ठिकाणचे होते. बॅंक, रेल्वे, पोस्टऑफिस बंदर गोदी, बेस्ट बसेस, खाजगी गाड्या व त्यांचे चालक अशा थिकाणचे म्हणजे सामान्य माणसाला रोज सामोरे जावे लागणाच्या ठिकाणचे अनुभव अत्यंत म्हणजे आश्चर्यकारकरीत्या सुखद होते. हे लिहायचे होते ते लिहिले.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 07/10/2018 - 10:40 नवीन
माझ्या वडीलांनी नुकत्याच काही आठवणी मला सांगितल्यात माझे आजोबाचे अहमद्नगर जिल्ह्यातील एका काहीशा दुर्गम गावात किराणामालाचे दुकान होते. जोडीला ते काही प्रमाणात सावकारी करत. यात भांडी गहाण ठेवून पैसे कर्जाऊ दिले जात. काही लोकांना कर्ज फेडता न आल्याने अनेक भांडी आजोबांकडे जमा झाली होती. या भांड्यावर सहसा भांड्याच्या मूळ मालकाचे नाव कोरलेले असायचे. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा माझे वडील पुण्यात होते. ते तातडीने गावी गेलेत. आणि संभाव्य धोका लक्षात घेवून त्यांनी ही भांडी गोळा करुन शहरात आणून विकलीत. पुढे कधीतरी गावातून आजोबांच्या सावकारीबद्दल तक्रार केली गेली पण झडतीस आलेल्या अधिकार्‍यांना कसलाही पुरावा न मिळाल्याने कारवाई करता आली नाही. आणीबाणीच्या काळात माझ्या आई-वडीलांचा विवाह झाला. पण त्यात कसलीही अडचण आली नाही.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 07/10/2018 - 11:51 नवीन
मुंबईत एक भिकारी दिसत नव्हता. रस्ते, रेल्वे देवळे कुठेही भिकारी नव्हते. सगळ्या भिकाऱ्यांना पकडून दूर कुठेतरी रस्तेबांधणी वगैरेसारख्या कामाला लावले होते असे बोलले जाई. रेल्वेतले आणि बाहेरचे फेरीवालेसुद्धा नाहीसे झाले होते.रस्ते रोज प्रामाणिकपणे झाडले जात. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता गोठवला होता. गावोगावच्या खाजगी सावकारीवर गदा आली होती. राजकीय क्षेत्रात मात्र अस्वस्थता आणि नापसंती होती. सरकारविरोधी विचारांच्या लेखन भाषण प्रगटनावर सेंसॉरशिप होती. वृत्तपत्रांतला मजकूर सेंसॉर होई. कार्यकर्त्यांची धरपकड झाली. नसबंदीचा अतिरेक झाला हे माझ्यामते सामान्य जनांमध्ये सरकारविरोध तीव्र होण्याचे प्रमुख कारण होते. लोक चवताळले. यामध्ये सर्व थरांतले पुरुष होते. सरकारी वर्तमानपत्रे आणि आकाशवाणीदूरदर्शन यांमध्ये इंदिरा गांधी आणि वीस कलमी कार्यक्रम यांच्या जाहिराती आणि उदो उदो अगदी नकोसा झाला. एलीट वर्ग विरोधात गेला. असे खूपसे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 07/10/2018 - 15:35 नवीन
तुमचे ह्या धाग्यावरचे एकुणच सर्व प्रतिसाद वाचून असे दिसते की त्यावेळचा सरकारी कर्मचारी वर्ग, त्यांच्यावर आणिबाणी लादल्यावरच इमानदारीत काम करायला लागला, ऐरवी ते लोक कामाच्या ठिकाणी जाऊन फक्त पाट्या टाकत होते.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 07/10/2018 - 20:37 नवीन
सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेविषयी आजही लोकांमध्ये पुष्कळ नाराजी असते. तशीच ती तेव्हाही होती. सगळेच अप्रामाणिक आणि कामचुकार नसतात. पण जेव्हा या अप्रामाणिक आणि कामचुकारांची टक्केवारी घटते तेव्हा सुव्यवस्था आणि शिस्त निर्माण होते. आणीबाणीत ही टक्केवारी धाकाने म्हणा अथवा दपटशामुळे म्हणा, खूपच घटली होती. सर्वसामान्य जनजीवन आश्चर्यकारक रीत्या सुरळीत झाले होते. त्यानंतर आजतागायत इतकी सुव्यवस्था पाहायला मिळालेली नाही. आणीबाणी कळत्या वयात न पाहिलेल्यांचा यावर विश्वासही बसणार नाही. राजकीय क्षेत्रात नाराजी पसरली कारण सरकारविरोधी विचार प्रगटनावर बंदी आली. एलीट वर्गाचा रोष झाला. समाजवाद्यांनी भूमिगत राहून या गळचेपीचा प्रतिकार केला. त्यांना क्विट इंडिया चळवलीतल्यासारखे वलय प्राप्य झालें . हा काळ त्यांच्या लोकप्रियतेचा परमोच्च बिंदू होता. नसबंदीच्या अतिरेकामुळे आणीबाणीविरुद्ध खरा रोष निर्माण झाला. सर्व स्तरातल्या पुरुषांमध्ये मोठाच असंतोष पसरला.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 07/10/2018 - 20:39 नवीन
टंकनदोषांसाठी क्षमा प्रार्थनीय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/10/2018 - 15:12 नवीन
मुंबईतील सर्व धडधाकट भिकार्यांना पकडून जायकवाडी धरणावर "रोजगारासाठी" नेले होते.तेंव्हा त्यांना १२ रुपये रोजगारावर ठेवले होते आणि मुंबईत तेंव्हा भिकार्यांना साधारण ६० रुपये रोज मिळत आणि काही मोलाच्या ठिकाणी २५० रुपये रोज या भिकार्यांना काम करण्याची मुळीच सवय नव्हती. त्यामुळे ते एक एक करून पळून परत मुंबईत आले. तेंव्हा एक वर्ष भरात मुंबईत परत सर्वत्र भिकारी दिसू लागले.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 07/10/2018 - 18:46 नवीन
धरणाचे काम २४ फेब्रुवारी १९७६ संपले होते. 'काही काम राहिले तर नोंद करून ठेवा, ४ महिन्यात मी आणीबाणी लावतेच आहे' असे बाईंनी शंकरराव चव्हाण यांना सांगितले असल्यास गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 07/11/2018 - 06:49 नवीन
हा प्रतिसाद मुळीच कळला नाही
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/11/2018 - 06:59 नवीन
टोबी सर आणीबाणी २६ जून १९७५ रोजी लावली होती. हि नोंद घ्यावी अशी विनंती आहे. बाकी भिकाऱ्यांना जायकवाडी धरणाच्या कामावर पाठवले होते अशी पेपरात बातमी वाचल्याचे आठवते. मी काही जायकवाडीला पहायला गेलो नव्हतो. अगदी जायकवाडी नसेल फाळके वाडी नाही तर कोळके वाडी असेल काय फरक पडतो. भिकारी एक वर्ष नव्हते हि वस्तुस्थिती आहे. मी जरी आणीबाणीचा विरोधी असलो तरी फुकट्या लोकांना रोजगारावर धाडले हि चांगलीच गोष्ट होती हि वस्तुस्थिती बदलत नाही. जाता जाता -- आणीबाणी नंतर १९८०-८१ च्या सुमारास दादरच्या पुलावरील भिकाऱ्याने आपली मोक्याची जागा आपल्या जावयाला आंदण दिली आणि तो डोंबिवलीला भीक मागायला गेला अशी बातमी पण वाचली होती
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Wed, 07/11/2018 - 19:58 नवीन
माझ्या प्रतिसादात थोडी गफलत झाली पण बारकाईने विचार करता अजून काही प्रश्न मनात आले त्यांचा हा उहापोह. १९७५ च्या काळात ६० आणि २५० रुपये म्हणजे काय असावे याचे माझ्या माहितीप्रमाणे वर्णन करीत आहे. सत्तर ते नव्वदच्या दशकामध्ये महागाई वाढीचे प्रमाण बरेच जास्त होते. बऱ्याच वस्तू सहजच वार्षिक १०% वेगाने महाग होत असत. आता या ठिकाणी मी माझा १९८९ सालचा मुंबईतील खर्चाचा मर्यादित तपशील देतो. त्यावरून १९७५ सालच्या किमतीचा अंदाज यावा. मी ८९ साली मुंबईत असताना दररोजचा बाहेरचा खर्च २० रुपयाच्या आत होत असायचा. सहा रुपयात वाशी ते वरळी असा येऊन जाऊन प्रवास, दहा रुपयांपर्यंत बाहेरचे खाणे आणि मित्रांबरोबर दोन-एक वेळा चहा एवढे सर्व त्यात होत असे. सत्तरीच्या दशकात मला कुणाला भिक्षा देण्याचा प्रसंग आला नाही परंतु ८३ च्या दरम्यान मुंबईत सुट्या पैशांची प्रचंड चणचण होती. त्यावेळेला भिकारी १ रुपया दिल्यावर ९० पैसे खळखळ न करता देत असत. म्हणजे ७५ साली १० पैसे भिक्षा दिल्यावरही भिकारी आनंदाने तुमचा पाठलाग थांबवित असावेत असा अंदाज करायला हरकत नाही. म्हणजे ६० रुपये ज्याचे सरासरी उत्पन्न आहे त्याला ३ तासाच्या दोन 'शीफ्टमधे' ६०० लोक भिक्षा देत असावेत. पाच पैसे देणारे पण असतील पण आपल्या उदाहरणाच्या सुटसुटितपणासाठी आपण त्यांचा विचार करायला नको. तर ६ तासात ६०० तर तासाला १०० लोक भिक्षा देत असणार. म्हणजे एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी तासाला १२ वेळेला सिग्नल पडत असेल तर ८ जणांनी टॅक्सी अथवा बसमधून भिक्षेकऱ्यांना पैसे द्यायला हवे. भीक देण्याचे इतके 'आदर्श' प्रमाण आजही, जेंव्हा सर्वसाधारण मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती सुधारली आहे असे दिसते, त्या काळात दिसत नाहीये. आपले वरील उदाहरण ४ पटीने मोठे केले तर (२५० रुपये उत्पन्नासाठी) तर कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर तासाला ४०० लोक भिक्षा देण्यासाठी रांगा लावतायत असे दृश्य दिसले असते कि जे अतिशयोक्तीपूर्ण वाटते. एवढे करूनही असा एखादा हायली पेड भिक्षेकरी असेलच तर पांगुळगाड्यावरून साधारण ५ किलो चिल्लरचे बोचके घेऊन बंदे रुपये करण्यासाठी तो चालला आहे असे कोणीतरी पहिले असेलच.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 07/12/2018 - 11:42 नवीन
१९७२- ७५ या काळात मुंबईत सरकारी नोकरीतील लिपिकांचे सुरुवातीचे पगार २५० -३५० या रेंजमध्ये असत. राज्य सरकारचे कमी, केंद्र सरकारचे जास्त. गोदीमध्ये कमी. बॅंका एल आय सीमध्ये जास्त. सात रुपये, दहा रुपये अशा सुरुवातीच्या वार्षिक वेतनवाढी असत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/12/2018 - 17:03 नवीन
6 Professional Beggars In India Who Are Probably Richer Than You & I https://www.storypick.com/professional-beggars-in-india/ Mumbai's beggars earn Rs 180 cr a year http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1797524.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst let me introduce Bharat Jain who begs in Mumbai The 'Richest' beggar of the country, Bharat is the owner ... on an average a beggar can earn Rs. 1500 a day. https://www.quora.com/How-much-money-does-a-beggar-make-in-India सूज्ञांस सांगणे न लगे
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/11/2018 - 10:31 नवीन
https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/indira-gandhi-article-by-madhav-godbole-1652465/ ह्या लेखाच्या शेवटी आणीबाणी च्या काळातील प्रशासकीय सेवे बद्द्ल लिहले आहे .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/11/2018 - 12:37 नवीन
या लेखात आणीबाणीतल्या वस्तूस्थितीचे प्रामाणिक वर्णन आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 07/11/2018 - 16:54 नवीन
माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी कधी आणीबाणीचा विषय निघाला की तिचे जोरदार समर्थन करतात. गाय वासरु प्रेम इतके की दुसरे कुमार केतकरच. स्वातंत्र्य चळवळीत तुरूंगवास झाला असतानाही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेंशन घेतले नाही. आणीबाणीच्या काळात ते BMC मध्ये लिपिक होते. शिस्तबद्ध कामाची सवय असल्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही, परंतू त्यांचे सहकारी उजव्या विचारसरणीचे व भ्रष्टाचारी असल्यामुळे ते दडपणाखाली काम करत, त्यांना आजोबांची भीती वाटायची. आजोबांच्या मते प्रामाणीकपणे काम करणाऱ्याला काहिही त्रास झाला नाही. भिकाऱ्यांबद्दल मी त्याना विचारले. भिकारी पकडण्याकरता BMC ची वाहने वापरली होती. कुठल्याही धरण प्रकल्पासाठी त्यांना ठेवलं नसावे, कारण त्यांची निवासाची सोय आणि स्थानिकांचा रोजगार हिरावणे हे सरकारला शक्य नव्हते. माझे वडील आणीबाणीच्या काळात विदयार्थीदशेत होते. रेल्वे आणि बसेस वेळेवर धावत , ह्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही. आणीबाणीला जनतेने नाकारले हे सत्य आहे, परंतू आणीबाणीमुळे खरोखरच देशातील प्रत्येक वर्गाला झळ बसली असेल असं मला वाटत नाही. ठराविक वर्गाला झळ पोचली असेल व ते डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असावेत.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 07/12/2018 - 13:30 नवीन
परंतू आणीबाणीमुळे खरोखरच देशातील प्रत्येक वर्गाला झळ बसली असेल असं मला वाटत नाही. ठराविक वर्गाला झळ पोचली असेल व ते डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असावेत.
नाझी जर्मनीतपण प्रत्येक वर्गाला झळ नव्हती बसली. ज्यु लोक डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असं म्हणणार का?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/12/2018 - 18:25 नवीन
त्या काळी गरीब शहर किंवा खेडेगावातील जनतेचे प्रमाण खूपच असणार आणि त्या गरीब वर्गाला झळ बसली काँग्रेस निवडणुका हरली पण नंतर पुन्हा मुसंडी मारून जनता पार्टी ला चारीमुंड्या चित केले .
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Tue, 07/17/2018 - 14:04 नवीन
याच धर्तीवरचे खालील मुद्दे आठवतात - १. नोटाबंदीचा त्रास फक्त काळापैसावाल्यांनाच झाला. २. टॅक्सचोरच जीएसटी ला विरोध करतात, बाकीचे खुश आहेत. :)
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 07/12/2018 - 13:59 नवीन
चुकीची तुलना. आणीबाणी अत्याचार करणारे पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून आलेत, नाझींच्या बाबतीत तसे घडले का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 07/13/2018 - 05:41 नवीन
मुळात जनता पार्टी हि खिचडीच होती. त्यांची एकसंध अशी विचारसरणी नव्हती. ज्यात विचारसरणीने पार दोन टोकाचे असलेले पक्ष सुद्धा म्हणजे कम्युनिस्ट आणि जनसंघ हे एकत्र आले होते. त्यामुळे ती टिकणारी नव्हतीच. त्यांचा एकच मूळ हेतू होता तो म्हणजे लोकशाहीची पुनर्स्थापना आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीला विरोध. काँग्रेस त्या काळातही तळागाळाच्या लोकांमध्ये गांधीबाबाची काँग्रेस म्हणूनच प्रसिद्ध होती. सर्व दूर पसरलेल्या जनतेत इतर पक्षांचे तितके बस्तान बसलेले नव्हते. तेंव्हा काँग्रेस परत निवडून येणार यात कुणाल फारशी शंका नव्हती. एवढच होतं कि जनता पक्ष आपला ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल कि नाही. परंतु समाजवादी लोकांच्या मूळ विचारसरणीमुळे ( ज्यात नेते जास्त आणि अनुयायी कमी) तो तीन वर्षातच आटपला.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 07/22/2018 - 20:22 नवीन
वाचतोय. पण राजकीय धाग्यावर काही लिहायच धाडसच होत नाही.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/25/2018 - 02:38 नवीन
वैयक्तिक टीका टाळून करा सुरवात हळूहळू , स्वतः ला व्यक्त करण्यासाठी असल्या व्यासपीठाचा उपयोग होतो व्हाट्स ऍप तर पोरखेळ च झाला आहे .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा