Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ए पावसा !

ल — लौंगी मिरची, Tue, 06/12/2018 - 16:24
ए पावसा ! थोडं थांबना .. मला जे सांगायचय ते तुला कळतय का सांगना ! सारखच काय ते बरसायचं सारखं आपलं भरायचं , आणि इथे येऊन सांडायचं तुला नाहि का वाटत , थोडा आराम करावासा,? आरामशीर ढगात बसुन खालचा हिरवा गालिचा पहावासा ? ए पावसा ! बास झालं बाबा आता , थोडं तरी ऐकना तुझ्या मनात नक्कि काय आहे ? एकदा तरी सांगना ! ऐकलीस का कुजबुज कधी , “ साला किचाट करतो पाऊस ह्याला कधीपण ढासळायची कसली ती भारी हौस ?? “ मला तु आवडतोस माझं काहिहि म्हणणं नै पण मला नै आवडत ब्वॉ तुला बोललेलं काइबाइ ! म्हणुन सांगते .. ऐकना थोडसं रिप रिप कर आणि थोडिशी विश्रांती घेना ! कळतो मला तुझा प्रॉब्लेम तु भरलेल्या ढगांमध्ये कितीवेळ राहणार मुंबैतल्या गर्दीसारखं तुलाहि तिथे दाटिवाटित रहायला लागत असणार अरे पण वेड्या म्हणुन का तिथुन निसटुन तु इथे जागा करणार ?? आधीच घामाचा वास त्यात तु सगळं ओलं ओलं करणार ! तु बघतोस ना किती पाणि साचतं रस्त्यावर ट्रेन सुद्धा वेळेवर येत नाहि फलाटावर संध्याकाळ झाली कि तुला भारी चेव येतो तु थोडीना घरी परतनार्‍यांची काळजी करतोस ए पावसा ! खरच थोडसं थांबना .. तो अजुन घरी नाहि आलाय , निदान त्याच्यासाठी तरी .. माझं ऐकना ! प्लिझ !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1745 views

💬 प्रतिसाद
स
सिरुसेरि Wed, 06/13/2018 - 10:28 नवीन
वर्षम आठवला
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 06/13/2018 - 11:06 नवीन
नाही पडला तरी चालेल पण तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या शेतात मात्र पडला पाहिजे
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 06/14/2018 - 09:04 नवीन
चल हॅट , मी न्हाय पडणार शिमेंटच जंगल मला काय अडवणार उंचच उंच डोंगर मला नेहेमी विनवयाचे झाडांचे हात पसरुनि गुदगुल्या करायचे गेली झाडे, डोंगर गेले, आता कोण खेळणार ? चल हॅट , मी न्हाय थांबणार ह्ये शिमेंटच जंगल मला काय अडवणार तंत्रज्ञान विज्ञान सारे खिशात घेऊन फिरतो पोटापुरते खातात जिथे, तिथेच म्या थांबतो भस्म्या झालाय साऱ्याना , खात सुटलेत सारे इथेच थांबुनी सोडतोय म्या फक्त मॉन्सूनाचे वारे उपग्रह देतात संदेश फक्त मॉन्सून आला रे आला बळीराजा अजूनही वाट पाहतोय , पाऊस कुठे बरं गेला ? सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा