Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आनंदाचं रोपटं

म
मूखदूर्बळ
Sun, 06/10/2018 - 10:19
💬 8 प्रतिसाद
आनंदाचं रोपटं आमच्या घराबाहेर एक कुठलं तरी रोपटं आलंय. नको नको म्हणून आलेलं अगदीच unwanted child म्हणा ना. पण ते झाड. झाड कसलं रोपटं म्हणा ना मला खूप खूप आनंदी वाटतंय. काल अचानक आलेला पाउस सोसाट्याचा वारा त्याने खूप enjoy केलंय. आजचा मळभ-उन्हाचा खेळ ते स्वत: खेळतंय. मला ते रोपटं मनापासून आवडलेय. शेजारी राहायला आलेलं एखादं गोंडस मूल आपल्याला कसं आवडतं ना तसेच ते मला आवडलंय. ते माझं गोड आनंदाचे रोपटं आहे. आज सकाळी आमच्या वॉचमनच्या मुलीसाठी मी चॉकलेट दिलेय. आज माझा दुपारचा जेवणाचा डबा मी सहकारी मित्रांबरोबर शेयर केलाय. घरी बायकोला फोन करून आजचं जेवण खूप सुंदर झालंय म्हणून सांगितले आहे. घरी जाताना मुद्दाम वाटेवरच्या देवळात जाऊन आलोय. बरोबर असलेले सफरचंद देवळाबाहेरच्या छोट्या मुलीला दिलेय. वाटेवर भेटलेल्या मित्रांबरोबर खूप गप्पा मारल्या आहेत. मुलीसाठी मुद्दाम चित्रकलेचं पुस्तक आणले आहे. तिच्याबरोबर तिच्या गंमतीच्या गोष्टी ऐकतोय. जेवणाची ताटं घेतली आहेत. पाट-पाणी घेतलंय. थोडक्यात आजचा दिवस खूप आनंदात परमोच्च सुखात गेलायं. आता रात्रीच्या काळोखात ते रोपटं आणिकही आनंदी दिसते आहे. कारण तसलंच एक आनंदी रोपटं आज माझ्या मनातही उमललंय आणि ते आनंदाचं रोपटं सृजनात्मक आनंदमुळे आणखी आनंदी झालंय.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2594 views

💬 प्रतिसाद (8)
M
manguu@mail.com Sun, 06/10/2018 - 13:13 नवीन
छान निसर्ग महान आहे
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 06/10/2018 - 14:03 नवीन
ते रोपटं प्रतिकात्मक असावं की पहील्या पावसात कोंब फुटलेले खरोखरचं रोपटं असावं याने लेखनाचा आशय बदलत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 06/10/2018 - 16:01 नवीन
तुमचा लेख हा दोन परिच्छेदांंत संपला याचा मला खूप आनंद झाला. अनुस्वार टाकून टाकून माझ्या कीबोर्डातले अनुस्वार संपत आले होते. ;-) बादवे, छान मनोगत.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 06/10/2018 - 17:19 नवीन
वृक्ष होवो.
  • Log in or register to post comments
श
शाली Sun, 06/10/2018 - 19:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१ Sun, 06/10/2018 - 20:44 नवीन
आयुष्य आनंदी करणाऱ्या गोष्टी किती छोट्या छोट्या असतात..
  • Log in or register to post comments
R
Ram ram Tue, 06/12/2018 - 09:42 नवीन
तिसरट प्रतिक्रिया देण्यात मिपाकरांचा पयला नंबर हय.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Tue, 06/12/2018 - 09:43 नवीन
तिरसट आसावं बहुतेक
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा