Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पावसाची बॅटींग

D
dadabhau
गुरुवार, 06/07/2018 - 15:38
🗣 13 प्रतिसाद
पावसाळा सुरु झालाय.. मंडळी कोण काय ठरवते तर कोण काय... मी मात्र आता ३/४ महिने सगळ्या चॅनेल्स /पेपर मध्ये "पावसाची बॅटिंग " हा शब्द किती वेळेस उच्चारला/छापला जाईल याचा स्कोर मोजणार आहे... काय हे आजकाल पाऊस पडत /कोसळत नाही तर फक्त "बॅटिंग" च करतो ना.. म्हणून हा स्कोर मोजायचा उपक्रम !!! साधारणतः पावसाळा संपल्यावर ३० सप्टेंबर च्या जवळपास मिपावर ह्या स्कोर चे पद्धतशीर पणे विश्लेषण प्रसिध्द केले जाईल . ( म्हणजे .. छापील "बॅटिंग " किती वेळेस वाचला .... मराठी चॅनेल वाल्याने माझ्या प्रेझेन्स मध्ये किती वेळेस उच्चारला ....चॅनेल च्या खाली दिसणाऱ्या धावत्या पट्टीवर किती वेळी गरागरा फिरवला गेला ( माझ्या समजुती प्रमाणे एक माणूस स्टुडिओत कुठेतरी बसून "शेवया करतांना सोऱ्या जसा फिरवतात तसा " एक मशीन गरागरा फिरवून ती पट्टी फिरवत असतो ).

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5090 views

🗣 चर्चा (13)
म
मनिमौ Sat, 06/09/2018 - 18:03 नवीन
त्या यादीत मुंबई ची तुंबई, नालेसफाई, हिंदमाता हे शब्द पण जोडा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/10/2018 - 06:33 नवीन
खड्डे, तुंबापुरी,नालेसफाईतील भ्रष्टाचार, रेल्वे खोळंबली, हार्बर लाईन, हायवे जाम, दरड कोसळली, माळशेज इ इ इ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 06/10/2018 - 07:50 नवीन
नोकरदारांची कुचंबणा, दाणादाण उडवली, दैना, जनजीवन विस्कळीत, जलमय, बीएमसीचे दावे वाहून गेले, थैमान.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 06/10/2018 - 08:30 नवीन
जलप्रलय, चाकरमान्यांचे अतोनात हाल राहून गेले.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 06/10/2018 - 08:37 नवीन
मुंबईची झाली तुंबई मुंबापुरीची झाली तुंबापुरी मुंबईच्या महापौरांची विनोदी वाक्ये ( महापौर आणि वाक्ये बदलतात पण आशय तोच असतो !)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/12/2018 - 08:34 नवीन
मुंबई स्पिरिट हे शब्दपण घ्या लिस्टात
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/12/2018 - 09:58 नवीन
प्रगत तंत्रज्ञानाचे तीन तेरा कसे वाजवावे हे अजूनही तो वरचा ठरवतो . मॉन्सून यायच्या आधीच त्याबद्दल शुभवर्तमान करणारे आपले हवामान खाते , आता टोकाच्या शिव्या खाते आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 06/12/2018 - 12:17 नवीन
पावसाची "दडी"
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/12/2018 - 12:40 नवीन
आणि हवामान खात्याला छडी
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/12/2018 - 14:14 नवीन
आज पावसात अचानक मला ते जुने दिवस आठवले ते भळभळ वाहणारे नाक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी लीलया खेळणारा पिवळा धम्मक शेमबूड ती खाली घसरणारी तरीही हातात घट्ट धरून ठेवलेली चड्डी आणि फक्त डाव्या हाताने तुला दिलेला झोका ती निष्फळ ठरलेली पण मनापासून केलेली मेहेनत आणि तिने दिलेला धोका सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/14/2018 - 04:04 नवीन
हा शब्दच हद्दपार केला आहे, दाणादाण उडाली,असं काही ठिकाणी लिहीलं जाते बळीराजा चिंतेत, आकाशाकडे डोळे लावून बसले असल्याने स्टाकमधील (संग्रही) छायाचित्र हमखास दहा पंधरा तक्रारी, निराशाजनक बातम्या नंतर एखाद्या बंधारा भरल्याचे,नदी वाहती झाल्याच्या बातम्या मी हुडकत बसतोय भिजपावसातला नाखु
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 06/14/2018 - 05:03 नवीन
वैतरणा, भातसा, विहार यांमध्ये केवळ अमुक टक्के जलसाठा. तोंडचे पाणी पळाले. मोडकसागर दुथडी भरून वाहू लागला. तलावही दुथडी भरतात.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 06/16/2018 - 08:35 नवीन
"पावसाची बॅटिंग थांबली रे , तुझी माझी जोडी जमली रे " असा काहितरी नवीन शब्द काव्य प्रयोग रुढ होइल .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा