Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

अंड्याचा रस्सा

स
सस्नेह
Tue, 06/05/2018 - 08:38
चावट रश्श्याच्या धाग्यात बर्याच लोकांनी माझ्या आजीची ही रेसिपी देण्याचा आग्रह केला सो काल केला अंड्याचा रस्सा ! जमवाजमव एकदम सिंपल. हा एक झटपट रस्साच आहे म्हणा ना :) तर एक (च) अंडे, बोटाच्या पेराएवढं आलं, ४-५ लसूण पाकळ्या, ४-५ चमचे ओले खोबरे, १ चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे, एक मध्यम कांदा बारीक चिरून. कोथिंबीर बारीक चिरून. १ चमचा कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, आणि थोडी हळद. फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी. झाले साहित्य. सगळी मापे आजीच्या हिशेबाने दिलीत बरं ;) आता पहिले अंडं भरपूर फेसून ठेवायचं. मग आले, खोबरे तीळ आणि जिरं यांचं बारीक वाटण करून घ्यायचं. लसूण भरड ठेचून बाजूला ठेवायचा. वाटणात नाही घालायचा. नाही तर खमंगपणा जातो. मग भांड्यात अंमळ सढळ हाताने तेल सोडून ते तापल्यावर चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या यचा. मग ठेचलेला लसूण घालून लगेच हळद व वाटण घालून परतावे. मग कांदा-लसूण मसाला घालायचा, त्यातच चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दीड फुलपात्र भरुन पाणी घालायचं. पाण्याला उकळी आली की मीठ घालून झाकण ठेवून २ मिनिटे ठेवावे. मसाला मुरला की झाकण काढून फेसलेल्या अंड्याची बारीक धार एका हाताने त्यात सोडावी आणि दुसर्या हाताने एकसारखे ढवळत रहावे. पूर्ण अंडे घालून झाल्यावर ढवळणे बंद करून झाकण न ठेवता २ मिनिटे उकळू द्यावे. गरमागरम अंड्याचा रस्सा तय्यार आहे ! शक्यतो भाकरी बरोबरच खावा. संध्याकाळी गडबडीत केल्यामुळे स्टेपवाईज फोटो काढायला जमले नाही. या एकावरच समाधान मानून घ्यावे :D A

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23477 views

💬 प्रतिसाद
र
रातराणी Tue, 06/05/2018 - 08:48 नवीन
अंड कुणी बनवून दिलं तरच खाऊ शकते, त्यामुळं कुणाला तरी कामाला लावलं पाहिजे ;)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 06/05/2018 - 09:25 नवीन
बुकमार्कच करून ठिवलाय!. करणार लगीच जमल तवा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 06/05/2018 - 09:31 नवीन
झकास. धन्यवाद.. आणखी रस्से येऊदेत. रस्सा सीरीजची वाट पाहतोय जागुताईच्या मासे सीरिजप्रमाणे.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/05/2018 - 09:39 नवीन
अहो हे असं दुपारच्या वेळेला बघून पॉट खालीखाली वाटू लागत . पण रस्सा जरा कमी केला असं वाटत . भरपूर भूक लागली आहे आणि हे सुंदर चविष्ट चित्रण . एक काम करतो आज मंगळवार आहे , खाऊ शकत नाही तेव्हा याची झेरॉक्स काढतो आणि ती समोर ठेवून डोळे मिटून जेवतो . कसं ..
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 06/05/2018 - 09:42 नवीन
करून बघतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 06/05/2018 - 11:05 नवीन
आली का पाकृ? धन्यवाद. करून बघणार. २-३ अंडी घातली तरी चालेल नाही का? की जास्त दाट होईल? मसाल्याचे प्रमाण पण वाढवावे लागेल ना जरासे?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 06/05/2018 - 11:24 नवीन
एक अंड्याचा अदमासे तीन जणांना पुरतो. २ किंवा ३ घातली तर वाटण त्या प्र माणात वाढव. नीट ढवळता यावा म्हणून मी भांडे जरा मोठेच घेतले होते. त्यामुळे रस्सा कमी वाटतोय :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 06/05/2018 - 11:44 नवीन
ओके, करून सांगते.
  • Log in or register to post comments
श
शाली Tue, 06/05/2018 - 11:11 नवीन
चविष्ट दिसतय. भाताबरोबरही छान लागेल.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 06/05/2018 - 11:41 नवीन
बेसन पिठाचे केले जाईल
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 06/05/2018 - 12:20 नवीन
बाकी मीही काय घातले की चवसाधर्म्य राखले जाईल याचा विचार करतेय
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 06/06/2018 - 04:13 नवीन
गरम पाण्यात कच्च्या कुरड्या (थोडया चुरून) थोडावेळ भिजवून ह्या रश्यात घालून शिजवल्या तर कुरडईची भाजी मस्त जमेल, त्याशिवाय रश्यात धार सोडून शिजवलेल्या अंड्याशी 'टेक्सचर साधर्म्य' दिसेल ते वेगळेच.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/05/2018 - 12:28 नवीन
आमच्याकडे अंडाकरीत हाफ हाफ अंडी टाकतात. पिवळा बलक वाला एक भाग आणि पांढरा भाग असे वेगवेगळे होतात, त्या पेक्षा त्याला किसून टाकलं पाहिजे असं वाटतं. बाकी, पाकृ छान. अजुन येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 06/05/2018 - 12:48 नवीन
खायला कधी येऊ ते बोल. बाकी थोड्याफार फरकाने आमच्या घरी उकडलेल्या अंड्याची भाजी करतात.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 06/05/2018 - 15:43 नवीन
आज च करते! वाट च पाहत होते.
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 06/05/2018 - 15:46 नवीन
वाह छान ...ह्यातच उकडलेली अंडी टाकली कि एग रारा .... चिकन किंवा मटण रारा मध्ये चिकन/मटण खिम्यात चिकन /मटणाचे तुकडे शिजवले जातात... त्याच धर्तीवर एग रारा ... :-)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 06/05/2018 - 19:38 नवीन
विकेंडी नक्कीच करून बघतो!!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 06/06/2018 - 04:29 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 06/06/2018 - 06:55 नवीन
बुर्जी पेक्षा याचे टेक्स्चर व कन्सिस्टन्सी वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 06/06/2018 - 09:28 नवीन
कांदा लसूण तिखटाऐवजी जर मालवणी मसाला घातला तर चालेल का? (रंगाला वरतून काश्मिरी मिर्ची पावडर घालता येईल)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 06/06/2018 - 10:35 नवीन
मालवणी काभी अपना एक अलग टेस्ट रहेगा ना :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 06/06/2018 - 18:21 नवीन
बेस्ट. पाककृती आवडली. या विकेंडला करून बघणार. ते सावकाश बारीक धारेने ओतायचे जमायला हवे फक्त.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/07/2018 - 06:06 नवीन
ही पाकृ अंडे न घालता करता येईल का? महागाईच्या दिवसात परवडेल असा काही उपाय सांगा.... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 06/15/2018 - 11:15 नवीन
हे जबर !!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मीता Fri, 06/15/2018 - 13:55 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Fri, 06/15/2018 - 17:27 नवीन
जबऱ्या फोटू
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/15/2018 - 18:01 नवीन
लिटरभर लाळ गळली! (जुन्या मिपाटाइप प्रतिसाद).
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 06/15/2018 - 18:06 नवीन
वाव ! कलर भारी आलाय :)
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Fri, 06/15/2018 - 17:26 नवीन
मस्त पाककृती! उद्या ईद च्या मुहूर्तावर करून बघतो
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 06/15/2018 - 19:42 नवीन
मस्त,स्नेहांकिता,वेगळाच प्रकार,आतापर्यंतआंदो उकडून,किंवा कढत सोडून ,किंवा ऑम्लेट रश्श्यास्ट घालून रस्सा केला/खाल्ला होता,आता असाही करून/खाऊन पाहीन.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 06/15/2018 - 19:42 नवीन
अंडी, असे वाचावे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/11/2018 - 18:43 नवीन

लोखंडाच्या कढईत केल्याने चव अजून खुलून आली, ओले खोबरे नव्हते पण सुक्या खोबऱ्याचा किस घातला होता

Image removed.

भाकरी नव्हती म्हणून चपाती बरंच वरपला

Image removed.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 07/12/2018 - 11:03 नवीन
टेस्ट आवडली का ?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 07/13/2018 - 07:31 नवीन
मी मालवणी मसाला वापरला होता, कोल्हापुरी मसाला हाय घरी फुडं कधीतरी त्यो वापरून बघायला येईल करून. दुसरं म्हंजे मी अंडी रश्यात घालताना धार नीट बारीक नाय धरू शकलो, त्यामुळं थोडा जास्त सरबरीत झालता रसा पण टेस्ट लैच जबरदस्त.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 07/13/2018 - 07:33 नवीन
म्हणजे कच्चं अंडं फोडून रश्यात घालणे एक प्रकार झाला, जर अंडं फेटून कोरी बिना मसाला मीठ भुर्जी सरबरीत भाजून रश्यात घातली तर? जमेल का?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा