Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पूर्वा ( भाग १ ) ( सत्यकथेवर आधारित )

अ
अनाहूत
Sun, 06/03/2018 - 05:58
💬 4 प्रतिसाद
ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत . " ए सरे, अग कुठं चालली आहेस ? अग थांब . " पूर्वाने त्या गाडीवर जाणाऱ्या दोघांना पाहून आवाज दिला . " ए अग ती त्याच्याबरोबर चाललीय, गाडीवर आहे अन तुमि तिला हाक काय मारताय ? " रेखा घाबरूनच म्हणाली . " कोण ? " - पूर्वाने न कळल्यासारखं विचारलं . " ती " रेखा तिच्याकडे बोट दाखवून म्हणाली . " ती कोण ? " - पूर्वाला आता चेव आला होता . " अग ती सरी " - रेखा " अग कोण सरी " - पूर्वा " ती गेली ती " - रेखा " ती सरी आहे " - पूर्वा " अग तूच तर म्हणालीस कि " - रेखा " मी ओळखत नाही तिला " - पूर्वा " अग मग हाक कशी मारली ? " - रेखा " हाक मारायला काय ओळख लागते काय ? " - पूर्वा " ओळख ना पाळख तू अशीच बोलत होतीस तिला "- रेखा " अग ती त्याच्यासोबत होती, मग ओळखीची असती तरी नसत बघितलं तिनं वळून ." - पूर्वा " काय बाई तू पण " - रेखा " मग अग नुसती मजा करायची गं " - पूर्वा " हि बघ अजून एक येतेय चल मार हाक " " ए नाय " - रेखा " नाय काय नाय, मार म्हणतेय ना " - पूर्वा " अग नाव नाही माहित " - रेखा " अग बोल कायपण " - पूर्वा " पूजे म्हण " " अग म्हण लवकर " " ए पूजे, ए पूजे आग थांब तर " " अरे कोणीतरी ओळखीचं आहे , चल लवकर " ती बावरून त्यांच्याकडे पाहून आणि पटकन तोंड फिरवून घाबरलेल्या स्वरात म्हणाली . " अग खरंच पूजा निगाली कि ती " - पूर्वा " आपण सही नाव शोधलं ना " " अग नाय पूजाच होती ती , आमच्या आत्याच्या हिकडं राहती , सुरुवातीला नाही ओळखलं पण नंतर बरोबर कळली . पण हि इथं इतक्या लांब कशी ? " - रेखा " बघा पोरींनो घ्या आदर्श , पोरी दुसऱ्या गावातून इकडं फिरायला येतायत आणि तुमि राहा अश्याच " नंदा सांगत होती . तिला वाटायचं कि आपल्याला सगळ्यातलं सगळं कळत . " ए कायपण सांगते का तिला . कशाला पाहिजे ती नसती कटकट . आपण आहे तशा बऱ्या आहोत . " - पूर्वा " अग हो अशीच राहणारे का आयुष्यभर , तुला नको का कोणी हिरो ? " नंदा तिला आव्हान दिल्यासारखी म्हणाली . " ए ते तेव्हाच तेव्हा बघू आता आपला एन्जॉयमेंट हाच , ए ती बघ ती बघ .... " - पूर्वा किती हसायचे मी तेव्हा, अगदी डोळ्यात पाणी यायचं . आताही आहेच डोळ्यात पाणी पण सोबत हसू नाही . " ए काय ग काय म्हणत होतीस आता काय नको , आणि त्या राहुल्याबरोबर काय चाललय ग " " अग फ्रेंड आहे तो आपला त्याच तस काय नाय . " - पूर्वा " हं म्हणे फ्रेंड बगु कि " " हो बघ बघ, कुठे बघते पंचांगात ? " " पंचांगात कशाला इथंच कळलं कि काय आहे आणि काय नाही ते . " " कळेल ना मग कळल्यावर बघू . " " ए राहुल्या काय करतोय " - पूर्वाने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि विचारलं " काय नाही ग ते फीच थोडं टेन्शन होत " - राहुल " ए रडक्या, सारखा काय रडत असतो रे ? याच टेन्शन त्याच टेन्शन होईल रे काहीतरी तू टेन्शन नको घेऊ . " " टेन्शन कस नको घेऊ ते तर घ्यायलाच हवं कि . " तिनं त्याच्याकडं एकदा पाहिलं आणि म्हणाली, " बर चल फुगडी घालायला . " " अगं मी काय मुलगी आहे का ? " " नाहीस का ? मला वाटलं मुलगीच आहेस . रडूबाई ... " " ए पूर्वा थांब तुला आता मी " असं म्हणत तो तिच्यामागे धावला . तिही पुढे धावली . हे नेहमीचच होत दोघांनाही एकमेकांच्या खोड्या काढल्याशिवाय राहावायचं नाही . इतर कुणी मैत्रिणींपेक्षा त्याच्याबरोबरच तिचा वेळ छान जायचा . दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडायची पण आतातर दोघांना दुसरं काही सुचतच न्हवत . " ए येडू काय झालं पुन्हा का बसलाय चेहरा पाडून . तुला असं रडल्या शिवाय, तोंड पाडून बसल्याशिवाय जेवण पचत नाही का ? " याच्यावर नेहमीसारखं न चिडता तो तसाच बसून होता आणि तसाच विचारात होता . तिला काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं . " काय झालं असं का बसला आहेस ? " तो काहीच बोलला नाही . ती त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली, " मला सांगणार नाहीस का ? " त्याने तिच्याकडे वळून पाहिलं " अग आज लास्ट डेट आहे गं फी भरायची आणि माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत " " असं आहे का म्हणून तू इतका टेन्शन मध्ये आहेस तर . " " अगं पैसे नाही भरले तर वर्ष वाया तर जाणार नाही ना . " त्याच्या डोळ्यात पाणी होत . त्याने तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि तो रडू लागला . तिला फार विचित्र वाटत होत . काहीतरी करायला हवं . पण ती काय करू शकणार होती . एकाएकी तिला काहीतरी सुचलं आणि ती त्याला म्हणाली " ए रडूबाई रडायचं बंद कर आधी . आणि चल माझ्याबरोबर . " " अगं कुठं ? " " तू चल आधी " असं म्हणत तिने त्याच्या हाताला पकडून जवळपास ओढतच त्याला स्वतःच्या घरी घेऊन गेली . " तू बस इथेच मी आलेच . " थोड्याच वेळात ती आली . " हे घे " असं म्हणत तिने हात पुढे केला त्यात पैसे होते " अगं तुझ्याकडे कुठून आले पैसे ? " " होते रे तू घे जा भर तुझी फी . होईल ना याच्यात " " होईल म्हणजे थोडे जास्तच आहेत " " असू दे तुला लागतील ठेव सगळे " त्याने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला " तुझे आभार कसे मानू हे कळत नाही " मित्र म्हणून दंगा मस्ती करताना एकमेकांना स्पर्श व्हायचा पण असं कधी वाटायचं नाही पण आता असं का वाटतयं , मघाशी त्याने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं तेव्हा आणि आता त्याने माझा हात हातात घेतला तेव्हा . काही वेगळच वाटतंय . तोच तो . आणि तोच स्पर्श आज फारच वेगळा वाटतोय . असं का होतंय मला . ती तिच्या विचारताच होती आणि तो बोलतच होता . थोड्यावेळाने ती भानावर आली तिचे हात अजूनही त्याच्या हातातच होते . तिने ते सोडवून घेतले आणि म्हणाली " आभार प्रदर्शन झालं असल्यास या आपण . शेवटचा दिवस आहे जा फी भर . " तिनं ऑर्डर करून त्याला जवळपास ढकलुनच बाहेर पाठवलं . तो गेल्यावर तिला परत परत तेच आठवत होत आणि ते आठवून तिच्या ओठावर एक हलकिशी स्माईल आली . तेव्हढ्यात रेखा आली . " अगं काय एकटीच काय हसतेय वेड्यासारखी . बरी आहेस ना . काही तापबिप नाही ना चढला डोक्यात . " असं म्हणत तीन तिच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं . पुर्वाने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला सोबत घेऊन एक गिरकी घेतली " अगं काय चाललय काय ? " त्यानंतर एकदा रेखा तिच्याकडे आली होती . " अगं पुस्तक का घेतली नाहीस " " अगं घेईन गं . " " तू इतका वेळ थांबत नाहीस कधी आणि स्कॉलरशिपचे पैसे मिळाले ना . " " ए बाई हळू ? " " का गं ? " " आई ऐकेल ? " " का तू सांगितलं नाहीस . " " नाही सांगितलं . " " आणि काय केलंस पैशाचं ? " " काही नाही . " "आता सांगते का तुझ्या आईला सांगू ? " " ए थांब थांब . सांगते . " " हा सांग . " " राहुल आहे त्याला फी ला पैसे न्हवते . मगं मी दिले . " " स्कॉलरशीपचे ? " " हो . " " तुझ्याकडं काय झाड लागलाय का पैशाच ? आणि पुस्तक कशी घेणार आहेस . " " घेईन नंतर " " अगं मला तरी सांगितलं असत तर माझ्या सोबत केला असतास कि अभ्यास " " बघ तू आहेस मग मला कशाची फिकीर ? " " हं आता पुरे आणि आता असं करू नको परत " तिनं तिच्या स्माईलमध्ये पुढचे सगळे प्रश्न विरघळून टाकले . तीच स्माईल आजही बरेच प्रश्न आणि खूप सारे अश्रू विरघळवत आहे . क्या यही प्यार है ? हाँ यही प्यार है , हो दिल तेरे बिन कही लगता नही, वक्त गुजरता नही . क्या यही प्यार है रेडीओवर ते गाणं सुरु होत आणि तिच्या मनात येत होत खरंच क्या यही प्यार है तो आज खूप अडखळत बोलत होता . काहीतरी होत त्याच्या मनात , ते त्याला सांगायचं होत पण त्याला सांगता येत नव्हतं . " पुर्वा, एक विचारू ? "- राहुल " हो विचार ना " " विचारायचं म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचं होत " " नक्की काय ? विचारायचं कि सांगायचं होत . " " म्हणजे मला तुला ... " " ऐकतेय मी बोल तू " " माझं... माझं प्रेम आहे तुझ्यावर . काय तू हि... ? " एका दमात त्याने त्याला शक्य होत ते सगळं सांगितलं . " काय म्हणालास ? " पूर्वा थोडीशी रागातच म्हणाली . " काही नाही म्हणजे ते ... " तो अचानक बावरला . त्याला तस पाहून तिच्या ओठावर हलकीशी स्माईल आली आणि ती म्हणाली , " घाबरलास काय ? अरे माझही प्रेम आहे तुझ्यावर . कधी तुझ्या प्रेमात पडले कळलंच नाही रे " " तू मला होकार दिलास म्हणून मला किती सुटल्यासारखं वाटतंय काय सांगू पण कस होईल माझी परिस्थिती हि अशी . " " अरे होईल रे . आता आपण आहोत सोबत . " " पण एक सांग आजकाल तू इतकी शुद्ध कशी बोलू लागली आहेस ?" " कॉलेजसाठी गावातून बाहेर पडले , दुसऱ्याचं बोलणं आणि बरचस वाचन यांनी झाला असेल कदाचित हा बदल . " वा मस्त आहे " ......क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2043 views

💬 प्रतिसाद (4)
श
शलभ Sun, 06/03/2018 - 06:05 नवीन
छान सुरुवात.
  • Log in or register to post comments
अ
अनाहूत Sun, 06/03/2018 - 19:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 06/03/2018 - 13:08 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
अ
अनाहूत Sun, 06/03/2018 - 19:10 नवीन
पुढिल भाग उद्याच
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा