Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दिलासा .....

फ — फिझा, गुरुवार, 05/31/2018 - 04:48
दिलासा ..... भरती असो कि ओहोटी सगळं काही वाहून न्यावं लागत कुणाला दिलासा देऊ ? त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही ! इंद्रधनू असेल सप्तरंगी क्षणभंगुरच राहावं लागतं त्याला कुणाला दिलासा देऊ ? त्या ढगांना, जे त्याचा निरोप घेऊन येतात कि त्या पावसाला, जो तिला कधीच भिजवू शकला नाही ! दिवस मग मागून रात्र सायंकाळ दोघांना पाहावी लागते कुणाला दिलासा देऊ ? त्या उन्हाला, जे त्याच्या आठवणी जाळू शकत नाही की त्या चांदण्यांना, ज्या त्याच्या आठवणींशिवाय दिसू शकत नाहीत ! काल ,आज मग उद्या, असे कितीक वर्ष ! रोज, हा नेमाने रोज येतो कुणाला दिलासा देऊ ? तिला? जी अजूनही फक्त त्याची वाट बघत आहे कि त्याला? जो आजसुद्धा भेटीचे वचनही देऊ शकत नाही ! .....फिझा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1715 views

💬 प्रतिसाद
च
चाणक्य गुरुवार, 05/31/2018 - 08:12 नवीन
मस्त. खूप दिवसांनी लिहिलंत.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 06/01/2018 - 10:31 नवीन
हो, बऱ्याच दिवसांनी पोस्ट केली कविता ! दखल घेतल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 05/31/2018 - 14:03 नवीन
सुंदर आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 06/01/2018 - 05:37 नवीन
वाह, जबरदस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 06/01/2018 - 10:31 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/01/2018 - 17:19 नवीन
ओघवती आणि रेखीव
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा