Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पिंपळपान

क — कहर, Tue, 05/29/2018 - 06:26
आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू मग फुलांनी केलेला अपमान शोधू दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची अन्यथा रामायणात अज्ञान शोधू सोसेना गलका सभोवती शांततेचा दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू बोलण्या आधीच सुरू होती लढाया ऐकूनी घेतील असले कान शोधू प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू आदेश हा कारागृहे खुली करण्याचा पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले नशिबातील एखादे समाधान शोधू खंत नको कालची वा तमा उद्याची खुल्या बाहूंनी जगू.. वर्तमान शोधू रात्र बाकी ये पुन्हा हरवून जावू पहाटे माझे तुझे देहभान शोधू अटळ प्रलय आहे हा विशाल तर अवघे विश्व तराया पिंपळपान शोधू -विशाल (२१/०५/२०१८)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5233 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Tue, 05/29/2018 - 10:13 नवीन
कहर! Sandy
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 05/29/2018 - 11:18 नवीन
सुरेख! हा विशाल कुलकर्णी यांचा आयडी आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 05/29/2018 - 11:21 नवीन
साॅरी, मी आत्ता माहिती बघितली.‌ दोन वेगळे आयडी आहेत. सॉरी.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 05/30/2018 - 04:47 नवीन
वा, जबरदस्त
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Wed, 05/30/2018 - 08:26 नवीन
छा गये
  • Log in or register to post comments
क
कहर Wed, 05/30/2018 - 09:48 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 05/30/2018 - 11:09 नवीन
आवडली! छान!! :-)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 05/30/2018 - 13:47 नवीन
उत्तम..
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 05/30/2018 - 14:28 नवीन
कविता आवडलीच आहे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 05/30/2018 - 20:01 नवीन
वा!!!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 05/31/2018 - 14:18 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा