Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ये पावसा ...

व — विशाल कुलकर्णी, Sun, 05/27/2018 - 09:29
त्या वाहत्या झऱ्याचा, फेसाळल्या नभाचा श्वासास गंध यावा गंधाळल्या दिठीचा तू भेटशी नव्याने मी ही नवाच आहे नात्यास रंग यावा वेडावल्या जुईचा तू चुंबशील का रे वाऱ्यास धुंद ओल्या वर्षेस मोह व्हावा भेगाळल्या धरेचा तो शुष्क कोरडासा ओढा तसाच आहे त्याला विसर पडावा फेटाळल्या नदीचा ओला वसंत म्हणजे आमंत्रणे सुखांची आनंद मग पहावा मंदावल्या उन्हांचा मग तृप्त अंबराला हळवे उधाण यावे जलदास स्पर्श व्हावा धुन्दावल्या भुमीचा © विशाल कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2630 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Sun, 05/27/2018 - 15:20 नवीन
एक सुचवणी... "धुन्दावल्या भुमीचा" ऐवजी "धुन्दावल्या धरेचा" करून पहा. Sandy
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/27/2018 - 15:22 नवीन
"भेगाळल्या भूमीचा" Sandy
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/27/2018 - 15:20 नवीन
एक सुचवणी... "धुन्दावल्या भुमीचा" ऐवजी "धुन्दावल्या धरेचा" करून पहा. Sandy
  • Log in or register to post comments
श
शाली Sun, 05/27/2018 - 16:33 नवीन
मस्त आहे कविता. "धुन्दावल्या धरेचा" सुंदर लय साधते चांदणे संदीप.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 05/27/2018 - 18:28 नवीन
.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 05/28/2018 - 06:52 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 05/28/2018 - 07:43 नवीन
रे बाल्यकवी नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/13/2018 - 07:37 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 07/13/2018 - 11:31 नवीन
.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा