Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

'कविता'

स — सत्यजित..., Tue, 05/22/2018 - 01:28
दुःखाच्या डोहामधुनी करुणेची येते गाज कुठलेसे पान तरंगत लहरींना देते व्याज कलतात उन्हे सोनेरी रंगांची उधळत माया डोहावर पसरत जाती वृक्षांच्या काजळ छाया ती काठावरती बसते बुडवून स्वतःचे पाय अन् हा हा म्हणता येते पाण्यावर मोहक साय मी 'कविता',वाचत असता ती शांतच असते बहुधा जणु चंद्रसरींनी भिजते नित-निळी सावळी वसुधा! —सत्यजित

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6312 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/22/2018 - 06:03 नवीन
सुंदर कविता आणि कच्चामाल ! अवांतर : (सविता) असे अतिषय सुंदर विडंबन तत्काळ सुचले ! लिहायला घेतले होते पण लिहायला घेतल्यावर एस्पिशली ' शेवटच्या कडव्यावरील विडंबीत कडवे' लिहिल्यावर लक्षात आले की कविता ( आणि कदाचित आयडी देखील) संपादित होइल. तस्मात प्रकाशित करायचे टाळले आहे ;) बाकी ह्या निमित्ताने परत सविताची आठवण झाली हे ही नसे थोडके !
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/22/2018 - 06:15 नवीन
मम मी सविताच्या ऐवजी कविथा डोक्यात बनवत होतो =)) बाकी तू लिहिलेली क्विता व्यनीत नाहीतर कायप्पावर पाठव
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/22/2018 - 16:21 नवीन
हन्त हन्त तुला सविता भाभी सोडुन कविथा आठवावी . छ्या हेच का ते अच्छे दिन ! =))))
  • Log in or register to post comments
श
शाली Tue, 05/22/2018 - 06:45 नवीन
वा वाह! मस्तच! आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/22/2018 - 08:49 नवीन
कविता छान आहे. 'ग्रेस' ची आठवण आली. फक्त हे कडवं नीटसं समजलं नाही. कुठलेसे पान तरंगत लहरींना देते व्याज हा व्याज शब्द जरासा विसंगत वाटला एकूण कवितेशी. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले. कवीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/22/2018 - 09:01 नवीन
तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल. ;) किंबहुना झाडाने पाणी घेतले कर्जाऊ त्याची परतफेड म्हणून पान दिले असावे. आता ते डुबले तर पाण्याला वाईट वाटेल म्हणून तरंगत राहात व्याज देत असेल.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/22/2018 - 14:34 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/25/2018 - 10:47 नवीन
फ्लोटिंग इंटरेस्ट
=))
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 05/22/2018 - 13:25 नवीन
फार सुंदर रचना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/25/2018 - 06:57 नवीन
लिहित राहा. ती काठावरती बसते बुडवून स्वतःचे पाय अन् हा हा म्हणता येते पाण्यावर मोहक साय. लैच आवडल्या चार ओळी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 05/25/2018 - 07:02 नवीन
!! मस्त !!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/25/2018 - 10:51 नवीन
शेवटच्या चार ओळी खास ! पहिल्या चार ओळी अशा चालतील बहुधा : 'दुःखाच्या दर्यामधुनी करुणेची येते गाज कुठलेसे पान तरंगत लहरींना देते साज'
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/25/2018 - 16:51 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 05/26/2018 - 08:49 नवीन
सहसा ठरवून कविता लिहून होतंच नाही कधी! ती अशीच अवचित सुचून जाते कधीतरी! सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक खूप-खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 05/31/2018 - 14:26 नवीन
मस्तच ,, सुंदर विचारांची सलामी दिलीय काव्यदेवतेला . ह्या अश्या फैरी झडल्या मंचावर , कि सार्थक झाल्यासारखं वाटत . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/01/2018 - 16:12 नवीन
ही कविता कशी सुटली नजरेतून? फार सुरेख!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा