Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दूर देशी गेला बाबा....विडंबन

O
OBAMA80
Sun, 05/20/2018 - 07:39
💬 7 प्रतिसाद
माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- गीतकार : संदीप खरे, गायक : सलील कुळकर्णी दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत परी घरी कुणी नाही कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला चार भिंतीत धावून दिसभरं दमवला आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही दार उघडून परि तिथे धावायचे नाही फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही ************************ विडंबन टुरवर गेला नवरा, नाही आली शांताबाई केर झालेत घरात परी काढायला कुणी नाही.... माझा कोमलसा जीव, कसाबसा रमवला फेबु-व्हॉटसप पाहून दिस मी संपवीला आता पुरे, logout होना कुणी म्हणतच नाही कामे साठली घरात परी करायला कुणी नाही.... कशासाठी कोण जाणे बाया या घेती सुट्टी न सांगता सवरता कशा मारतात बुट्टी कपडे भिजले बादलीत परी कामवाली नाही भांडी पडली मोरीत परी घासायला कुणी नाही.... दिसे खिडकीमधून मॉल, सेल काहीबाही तेथे जाऊन परि काही घ्यावयाचे नाही फार वाटे जावे परी कार्डात बॅलन्सच नाही बीले पडली थकीत परी भरायला कुणी नाही....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3417 views

💬 प्रतिसाद (7)
श
शाली Sun, 05/20/2018 - 08:38 नवीन
खास!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 05/20/2018 - 09:28 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/20/2018 - 11:23 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 05/20/2018 - 13:55 नवीन
अशी कशी केलीस दैना राजबिंडा लेक तो माझा बैल केलास त्याचा अशी कशी केलीस दैना
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 05/20/2018 - 15:29 नवीन
शेवटची ओळ "भिकारी केला, आधी होता राजा" अशी करा.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 05/21/2018 - 07:13 नवीन
मला वाटतं याला कविता सदरात हलवावं. मी लेख वाचायचा म्हणून उघडला. छान जमलंय विडंबन
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 05/21/2018 - 11:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा