Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

स्वैपाकघरातून पत्रे १

श
शिव कन्या
Sat, 05/19/2018 - 04:51
💬 14 प्रतिसाद
  • स्वैपाकघरातून पत्रे २
  • स्वैपाकघरातून पत्रे ३

Book traversal links for स्वैपाकघरातून पत्रे १

  • स्वैपाकघरातून पत्रे २ ›
अन्नपूर्णा, (तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.) आज म्हटलं तुला लिहावंच. अगं, जी कामं मी एकटी करायची, ती करण्यासाठी तू हा केवढा महागाचा सुऱ्यांचा सेट घेऊन आलीस! छोटी, मध्यम, मोठी. एक हे कापायला, एक ते चिरायला, एक बारीक बारीक तुकडे करायला! कम्माल आहे बाई तुम्हा आत्ताच्या बायांची! आमच्या जमान्यात अस्सं नव्हतं हो! एकदा का तुझ्या सासूने मला एका मांडीखाली घेतलं कि सगळं सगळं चिरून व्हायचं! खोबरं खोवून, मिरची बारीक चिरून, कांदा तर पाहिजे तसल्या आकारात, मऊ टोमाटो, वाळलेल्या खोबऱ्याचे अवघड तुकडे, झालंच तर गूळसुद्धा चिरून व्हायचा पुरणासाठी! पण आता काय, एकीचे काम चार जणी थांब, अशी गत. तू नवी नवरी. हौसेने आलीस स्वैपाकघरात. सासूला म्हणालीस, ‘काय मदत करू? कांदा चिरू?’ तुझी सासू म्हणजे देवमाणूस, म्हणाली, ‘कांद्याने डोळ्यात पाणी येईल गं बाई! त्यापेक्षा या चार हिरव्या मिरच्या चिरून दे,’ त्यावेळी तुझी माझी पहिली भेट झाली. तू घेतलेस मला तुझ्या नवख्या मांडीखाली. पण तुला ना मला नीट धरून ठेवता आले, ना माझ्यावर सडपातळ मिरच्यांचे बारीक काप करता आले! ....आणि वैतागून तू ते वाक्य म्हणालीस, ‘अहो आई, या विळीचा स्क्रू ढिला झालाय.’ मला अस्सा राग आला होता तुझा.... तुझं बोटच चिरायच्या विचारात होते मी! पण तुझ्या सासूकडे पाहून माझ्या पात्याची धार मनात ठेवून गप्प बसले. पण काळ थांबतो का? तुझी सासू गेली. सत्ता तुझ्या हातात आली आणि तू मला तडक ही कोपऱ्यातली जागा दाखवलीस. असू दे. माझा स्क्रू ढिलाच झालाय ना! असू दे.... पण तुझ्या या डझनावारी सूऱ्या आहेत ना... यांचीही धार बोथट होईल, मूठ निसटेल .... मग बघशील माझ्याकडे एकदा. पण नाही हो, ढिम्म हलायची नाही मी तेव्हा.... ..... तसा राग नाही गं.... जुने जाऊन नवे येणारच. पण जुन्याचा स्क्रू ढिला का होतो, याचा विचारच कुणी करत नाही, म्हणून हे पत्र लिहावे लागले. बाकी तू समजशीलच. तीच तुझ्या सासूच्या जमान्यातील, विळी. शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16006 views

💬 प्रतिसाद (14)
प
पलाश Sat, 05/19/2018 - 06:35 नवीन
भारीच आवडलं. पूर्णपणे पटलं! मला पण या विळी च्या भविष्याची चिंता लागलेली असते. " माझ्यामाघारी हिचं काय होणार??" :) :D
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 05/19/2018 - 09:55 नवीन
:)))
  • Log in or register to post comments
श
शाली Sat, 05/19/2018 - 08:07 नवीन
मुळात ही कल्पनाच फार मस्त आहे. आवडले पत्र. (या अगोदरही अशी पत्रे लिहिलीत का फेबूवर? वाचनात आल्यासारखे वाटतेय. फोटोसहीत होते.)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 05/19/2018 - 08:39 नवीन
हो, फेसबुकवर वाचलेय. कल्पना सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 05/19/2018 - 09:58 नवीन
होय, ही पत्रमालिका आहे. आपल्या स्वैपाकघरातील विविध भांडी अन्नपूर्णेला पत्र लिहितात, अशी ही एकंदर कल्पना आहे. ही पत्रे, फेसबुकला माझ्या wall वर होती, आणि 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेज साठीही ही दिली होती. आपल्या चौफेर वाचनाला आणखी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/19/2018 - 09:12 नवीन
शालेय निबंध? स्वगत छान.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 05/19/2018 - 10:00 नवीन
वयाने मोठे झाल्यावर परत शालेय निबंध जमतो का बघायचे. :-) वाचत असल्या बद्दल आभार.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/19/2018 - 13:33 नवीन
मस्तच लिहिलय हो
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sat, 05/19/2018 - 14:51 नवीन
छान लेख आहे !! विळी - स्वयंपाकघरातली ईळी - कडब्याच्या पेंढ्या कापायची आणि विळत - चाबकाच्या तुटाटीला वसन काढायला वापरायची.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 05/20/2018 - 18:28 नवीन
अरे वा! हे माहिती नव्हतं. नवी माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 05/19/2018 - 18:41 नवीन
छान लिहीलयं. बाकीचे अवजारे यांच्या उ द्या. :-)
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 05/20/2018 - 18:29 नवीन
होय, बाकीची पण अवजारे येणार हळूहळू. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 05/21/2018 - 03:30 नवीन
छान. पुढील भागात आणखी कोण कोण येणार याची प्रतिक्षा आहे. विळीला 'पावशी' पण म्हणतात (बहुतेक अमरावतीकडील भागात). Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 05/25/2018 - 06:26 नवीन
इतकी माहितीपूर्ण चित्रे इथे डकवल्या बद्दल आभार. हे शब्द माझ्या साठी नवे.... आवडले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा