Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Fri, 05/18/2018 - 15:37
पेरणा बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप... सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप! अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप ! केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप ! शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?, मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप ! कुरकुरीत चुर्‍यावरी, पिठूर चूर्ण पांघरु... उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप! तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप ! पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप ! पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12607 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Fri, 05/18/2018 - 16:02 नवीन
:):):) किक वाली कविता.;)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 05/18/2018 - 16:42 नवीन
__________/\____________ हृदयाच्या अंमळ जवळ असलेल्या शौकाला असली दर्दी सलामी. मजेदार आहे राव.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/18/2018 - 16:54 नवीन
माताय.. =)) बाकी तुम्ही सह्यांचं विडंबन न करण्याचं भलतंच मनावर घेतलंत ब्वा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 05/18/2018 - 18:59 नवीन
जबराट ता क विडंबकाने ऑल आउट वापरण्यापेक्षा लक्ष्मण रेखा बाळगावी अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार टपाली दूरस्थ नाखु
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 05/19/2018 - 05:46 नवीन
काय जबरा प्रतिसाद ... या प्रतिसादासाठी तुम्हाला काटाकीरची मिसळ आणि दोन ग्लास मस्तानी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/19/2018 - 06:10 नवीन
जबराट... अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/18/2018 - 16:58 नवीन
खतरनाक विडंबन ! डबल आर घ्या पैजारबुवा =))))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/18/2018 - 17:05 नवीन
पैजारबुवा सुटलेत... नेहमीप्रमाणेच ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/18/2018 - 18:06 नवीन
हणतीज्यायला, जय हो मालपाणी सेठ, जय हो चत्त्यापट्टयांची चड्डी घालून गायीची धार काढणारा इसम. पण ती गाय जर्दा छाप असते बरका.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 05/19/2018 - 05:53 नवीन
Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 05/18/2018 - 22:31 नवीन
घ्या पुढचा विषय पैजारबुवा "सखे चखण्यासवेच, आज भर पेग" :) विडंबन फर्मास जमले आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 05/19/2018 - 07:08 नवीन
हा हा हा =)) , तेवढ्या रम्य काव्य कल्पनेकडुन अशा विडंबनावर पोहचू शकला याचीही कौतुकास्पद कमाल वाटते. :)) मिपा कविलोक हैकी मानते नही ! :)
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sat, 05/19/2018 - 07:53 नवीन
पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप या वाक्यासाठी कडाडून १५ मिनिटे टाळ्यांचा मान
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 05/19/2018 - 18:36 नवीन
हा हा हा ! आधी मुळ कविता वाचून ईथे आलो ते बरं झालं. नाही तर मुळ कविता वाचताना बरंच काही डोळ्यासमोर आले असते. ;-)
  • Log in or register to post comments
श
शाली Sun, 05/20/2018 - 13:35 नवीन
धमाल :)
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 05/22/2018 - 13:15 नवीन
पैबु काका नेहेमीप्रमाणे धमाल सादरीकरण . मज्जा आली .
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 05/24/2018 - 11:02 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा