पाकिस्तानच्या अस्तीत्वाची चर्चा पुन्हा एकदा
नाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत . त्यांचे एक नवे म्हणजे एप्रिलात प्रकाशित झालेले पुस्तक सध्या Reimagining Pakistan: Transforming a Dysfunctional Nuclear State ईग्रजी वृत्त माध्यमातून थोडे फार चर्चेत आहे . गूगल बुक्सवर त्याची पहिली एकदोन प्रकरणे वाचता येतात आणि त्यांनी भारतीय माध्यमांना बर्या पैकी मुलाखती दिल्याने , उर्वरीत मांडणीची थोडी फार माहिती त्यातून मिळते.
त्यांचे मुख्य मुद्दे पाकीस्तानची समस्या हि तो देश आकारणीस येण्या पुर्वीच झाली , आपणही सर्व हेच मानतो पण हुसेन हक्कानींनी असे काही होईल असे प्रेडीक्ट करणारे तेव्हाच्या फाळणीच्या आधीच्या मुस्लीम आणि इतर लेखकांचे संदर्भ दिले आहेत ते रोचक आहे.
अगदी देशाच्या निर्मिती पासूनच देशाच्या आर्थीक क्षमते पेक्षा मोठी फौज इनहेरीटन्समध्ये ब्रिटीशांकडून मिळणे आणि मग फौजेचा खर्च चालवायचा तर पैशासाठी बाहेर मदत मागितली पाहिजे आणि त्यासाठी भारता सोबतच्या समस्या वाढवून दाखवल्या पाहिजेत . म्हणून भारता सोबत व्हिक्टीम कार्ड खेळले पाहीजे यात पुन्हा नवीन काही नाही फक्त त्यांच्याच देशातला माजी अमुक तमुक आकडेवारी देऊन संगतवार मांडतो .
पाकीस्तानातल्या आतंकवाद, आर्मी आय एस आय , आणि आयडियालॉजीकल प्रॉब्लेम स्विकारतो. तसेच पाकीस्तानने बेल्जियम प्रमाणे आयडीयालॉजीकल प्रॉब्लेम बाजूला ठेवावेत आणि केवळ टेरीटोरीअल स्टेट म्हणून रहावे, भारता सोबतच्या काश्मिर प्रश्नावर जसेच्या तसे स्थिती राहू देऊन व्यापार संबंध वाढवावेत अशी काहीशी थेअरी यातून दिसते. पाकीस्तानी लोक स्वतःच्या वेगळ्या ओळखीवर अजून तरी विश्वास ठेऊन आहेत तेव्हा पाकीस्तानला तोडण्याचा अथवा विसर्जीत केला जाण्याचा विचार करु नये असे त्यांचे मत आहे.
आता माझे मत, पाकिस्तानींनी त्यांचा देश फेल्यूअर आहे म्हणून स्विकारले तरी भारतीयांना हुरळून जाण्यासारखे काही नाही . पाकीस्तानच्या फेल्युअरच्या भिती ने नेमकी त्यांना कोणत्या न कोणत्या देशाची मदत मिळत रहाते . एक अण्वस्त्र सज्ज देश अगदीच टॉपच्या पूर्ण लेव्हलवरुन आपल्या गुप्तचर यंत्रणेला फोडता आला तरच त्यांच्या अण्वस्त्रांना निकामी करता येईल पण हे अगदी कमी शक्यता असलेली केस असेल. किंवा मग आपली युद्ध विषयक टेक्नॉलॉली अशा लेव्हल ला जावयास हवी कि त्यांची अण्वस्त्रे सहज निकामी करता येतील. पाकीस्तानपेक्षा भारत टेक्नॉलॉजीत पुढे असला तरी तेवढ्यावरच भारतीय समाधानी असतात अफलातून वेगळे काही करुन पाकीस्तानला पूर्ण नेस्तनाबूत करावे अशी पूर्ण क्षमतेचा ही अभाव आहे. अजूनही बर्याच मोठ्या वर्गास काँग्रेस सत्तेत होती म्हणून हे जमू शकले नाही असे वाटते , त्यामुळे भाजपास अजून पाच एक वर्षे मिळावयास हवीत म्हणजे पाकीस्तानला युद्धात एकतर्फी नेस्तनाबूत भाजपा सरकारांनाही करता आले नाही हे पटेल मगच त्यांच्या कडून इतर उपायांवर अधिक गंभीर विचार होऊ शकेल.
वस्तुतः १९४७ मध्ये-फाळणी नंतर हिंसेने माणसे मरायची तेवढीच मेली - पेक्षा एक पूर्ण नागरी यादवी होऊन जाऊ दिली असती आज ह्या अण्वस्त्रीय डोके दुखी शिल्लक राहील्या नसत्या . -आता कोणत्याही साईडने अण्वस्त्र वापरले तर जेवढी माणसे मरू शकतात त्यापेक्षा १९४७ मध्ये किती मोठी यादवी झाली असती तरी कमी माणसे मेली असती , हि प्रॅक्टीकल असली तरी पश्चात बुद्धी आहे आता ते शक्य नाही .
व्यापारी संबंध वाढवण्यात एकतर पाकीस्तानच हात मागे ठेवते , आणि व्यापारी संबंधानी बर्याचदा संघर्ष टोकाची पातळी गाठत नाहीत पण ह्याची पूर्ण गॅरंटी ही देता येत नसते. हजार वर्षाच्या सानिध्यात इस्लामिक आयडीयॉलॉजीचे तार्कीक खंडन भारतीयांना अशक्य नव्हते पण ते विवीध कारणांनी हजार वर्षे सोबत राहून केले /झाले नाही. खरे म्हणजे आजूनही पाकीस्तानातील शाळातून भारता विरोधी जे काही शिकवले जाते त्याचे मिडीयाच्या माध्यमातून व्यवस्थीत मुद्देसूद खंडन व्हावयास हवे होते. दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात त्यामुळे त्यांच्यातल्या कर्मठांचे अधिकच फावते असे वाटते असो.
* Reimagining Pakistan: Transforming a Dysfunctional Nuclear State
गूगल बुक्सवर
* मुलाखत १
* मुलाखत २
* मुलाखत ३
* दैनिक हिंदू मधील लेख
* इंडिया टूडेतील लेख
* जी पार्थसारथी यांचा लेख
* Husain Haqqani
इंग्रजी विकिपीडियातील लेख
💬 प्रतिसाद
(57)
प
पुंबा
गुरुवार, 05/10/2018 - 16:04
नवीन
मला वरील चारही मार्ग सुयोग्य वाटतात आणि भारताने पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी चारही मार्ग सुसुत्रपणे वापरत राहिले पाहिजेत. अर्थात बळाचा वापर स्वसंरक्षणासाठी करताना जनता युद्धखोर बनणे गरजेचे नाही. युद्धनितीची, आप्ल्या बलस्थानांची तसेच उणीवांची जाणीव लष्कर, शासन व सिव्हिल सोसायटी या तीनही घटकांना असायला हवी पण यापैकी कुणीच युद्धपिपासू असू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. पाकिस्तानची निर्मिती ही एकूणच मानवाच्या आधुनिकतेकडील प्रवासाच्या मार्गातील मोठी धोंड आहे. परंपरा, कला व संस्कृती, आपापसातील सहस्त्रकांपासूनचे सहजीवन आदी सर्व धागे तोडून एका भव्य समाजाला निव्वळ खुज्या धर्मवादाच्या आधारे फोडण्यात आले. आता, पाकिस्तान सुधारेपर्यंत आपणाला पाकिस्तानपासून सावधच रहायला लागणार आहे. सेक्युलरिझम, आधुनिकता, उदारमतवाद, लोकशाही यापैकी कुठल्याही तत्वाला मानणार्या शहाण्या व्यक्तिस पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून फेल गेले आहे यात शंका वाटणार नाही, हे राष्ट्र म्हणून इतक्या संकुचित पायावर उभे राहिले की तेच त्याचे भविष्य होते.
'सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग' म्हणाव्या इतक्या समर्थपणे वापरण्यात भारताला यश मिळाले नाही असे मलाही वाटते.
मागासाहेब, आपण ओळख करून दिल्याने पुस्तक घेतले आहे, वाचल्यास आणखी काही अॅड करावे वाटले तर करेन.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/10/2018 - 18:12
नवीन
नमस्कार,
पुस्तकाचा उर्वरीत भाग वाचल्या नंतर आम्हा मिपाकरांना अजून जराशी माहिती द्यावी हि विनंती. बाकी समतोल प्रतिसादासाठी अनेक आभार .
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 05/10/2018 - 15:30
नवीन
अरे हाय काय नि नाय काय
खरा पाकिस्तान कुणी पाहिलाय काय ?
इथली गंगा तिथे वहाते अन बनते सिन्धुमैय्या
का आपटता डोकं आपलं , सारा भुलभुलैय्या
सॅण्डीभाय सांगून गेला मागे सर्वात मोठी कविता
झोपण्यासाठी आपल्याला अशी किती लागते जागा ?
पाकिस्तानातून पक्ष्यावरती सारे पक्षी आले
संपादकही फळ्यावरती सूचना देउनी गेले
तरी उसळला आगडोंब तो, चाले त्यावर त्रागा
मन गाये उत्साद आपको , काय काढल्यात तुम्ही हा धागा ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/10/2018 - 15:47
नवीन
मिपा संपादक आम्हाला सेंसॉर करायचे तर जरुर करा त्या आधी , पोकळ वल्गना करणारे रलू रलु करु लागले एवढे वाक्य गालातल्या गालात हसून नोंदवावे . व्यक्ति लक्ष्य तर्कदोषाचे उत्तर व्यक्ति अल्क्ष्यतर्क दोषाने देण्याबद्दल क्षमस्व .
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 05/10/2018 - 17:29
नवीन
माहितगार,
कुठे म्हंटलंय असं मी?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/10/2018 - 18:04
नवीन
अच्छा आपण पण रस्त्याच्याकडेने ! अभिनंदन !! मग मोदींच्या साहाय्याने पाकिस्तानचे अस्तित्व मिटवण्याचा आपला तो अद्भूत मार्ग कोणता बरे ?
आपण मोदींचे नाव घेतले नव्हते असे रच्याकने बदलायचे असेल तर आमची ना नाही हां ;)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 05/10/2018 - 18:38
नवीन
माहितगार,
माझ्या आकलनानुसार हक्कानी म्हणताहेत की पाकिस्तान अंतर्गत लाथाळ्यांनी जर्जर होऊन फुटेल.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2