Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माझ्या ब्लाॅगचा उदयास्त

अ — अनन्त्_यात्री, Mon, 05/07/2018 - 05:33
तेव्हा डोळ्यात लोलक होते समोर निळी स्वप्नं होती बोटाबोटात परीस होते ओठी अनवट गाणी होती आव्हानांची करंदकाळी धोंड वाट अडवायची लेखनलाट भिडून तिला नेस्तनाबूत करायची कीबोर्डावर माझी बोटं वीज लाजेलशी लहरायची उमटायची मग स्क्रीनवरती भळभळ शब्दापल्याडची पोटामागे आज धावतो वेगाने, पण विझली आग, धार विसरली बोथट छिन्नी, सरणावरती माझा ब्लाॅग अजून जेव्हा कुंद सकाळी माझा ब्लाॅग साद घालतो लाॅगिन करून सृजनचितेला मीच चुपचाप चूड लावतो

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1229 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Mon, 05/07/2018 - 12:25 नवीन
अजून जेव्हा कुंद सकाळी माझा ब्लाॅग साद घालतो लाॅगिन करून सृजनचितेला मीच चुपचाप चूड लावतो खास आहे
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 05/07/2018 - 13:35 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा