Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जालफ्रेझीची सोय

ख — खिलजि, Sat, 05/05/2018 - 11:29
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला अन बनल्या भोळी प्रजा शेपूला केला मंत्री त्याने पालक झाला प्रधान धुसफुसणारी भेंडी वझीर केली देउनी खास सन्मान कसेबसे ते राज्य उभारले कांदे बटाटे रुसले संख्येने ते जास्त म्हणोनि आरक्षण मागत सुटले कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता भोपळा झाला येडा पुरता डोकं झालं बधिर भेंडी देई आधार त्याला तर पालक देई धीर दोन घडीचा डाव मांडला सुरीबाईचा झाला हल्ला कापत सुटली दिसेल त्याला त्यातुन भोपळाही ना सुटला कसले राज्य नि काय राजासकट सारे कापून काढले कुणाचीही केली नाही गय केली जालफ्रेझीची सोय {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4221 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Sat, 05/05/2018 - 13:01 नवीन
त्यात मीठ,मीरची, मसाल्याचे प्रमाण तेवढे सांगायचे होते. बाकी माझ्या छोट्याला चाल लावून म्हणायला चांगली आहे. त्या निमित्ताने त्याला भाज्यांची नावे शिकवता येतील.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 05/07/2018 - 09:14 नवीन
धन्यवाद श्वेता ताई सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/19/2018 - 07:34 नवीन
अत्युत्तम पाकृ, एकच प्रतिसाद ? अन्याव, अन्याव !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा