Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

साहित्यिकांची संघटना

फ
फुंटी
Fri, 05/04/2018 - 19:59
🗣 9 प्रतिसाद
इतर व्यावसायिकांच्या संघटना ,घोळके असणे समजू शकतो.पण साहित्याकांच्या संघटनांची काय आवश्यकता असावी?? लिहिणाऱ्या हातांना ,विचारवंतांना व्यासपीठ मिळावं इतपत संघटन ठीक आहे पण त्यापुढे जाऊन कंपूबाजी सुरू होते तेथे प्रतिभा नाहीशी होते असे वाटत नाही का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2638 views

🗣 चर्चा (9)
ए
एस Fri, 05/04/2018 - 21:24 नवीन
मग साहित्य संमेलन दुसरे काय असते?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 21:44 नवीन
प्रतिभा नाहीशी कशी होईल? सिने व टी.व्ही.आर्टिस्ट असोसियेशन आहेच की. सिने-संगीत्कारांची पण असोसियेशन आहे. गरज आहे की नाही माहित नाही. सहसा दबाव गट म्हणून अशा संस्था स्थापन केल्या जातात. क्वचित दुरुपयोगही केला जातो.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/04/2018 - 22:05 नवीन
कंपूबाजी सुरू होते तेथे प्रतिभा नाहीशी होते
अरे फुंट्या, खरे प्रतिभावंत कंपूबाज नसतात, असे 'ह्यांचे' मत. -- बाईसाहेब फुलसुंगंधीकर.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/04/2018 - 22:34 नवीन
माणसांच्या प्रतिभेचा हिशोब आपण ठेवत असणारच. तेव्हा आपले मतही कळू द्या. विचित्र्गुप्त
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 05/05/2018 - 00:36 नवीन
कंपूबाजी करून सरकारी मलिदा खाणे हे असल्या संघटनांचे मुख्य काम असते. गोव्यांत पहा अतिशय भिकार दर्जाचे कोंकणी लेखन अत्यंत भिकार दर्जाची पुस्तके लिहितात आणि सरकारी सबसिडी खाऊन मोकळे होतात. असल्या संघटनेमुळे खऱ्या प्रतिभावान लेखनाला प्रकाशक नजरअंदाज करतात.
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Sat, 05/05/2018 - 11:36 नवीन
खर तर असे अनेक राजहंस बदक बनून एखाद्या कळपात घुसून जाताना पाहिलं की वाईट वाटत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/05/2018 - 01:52 नवीन
सबसिडी नसेल तर संघटनाही होणार नाहीत, मिपावर कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Sat, 05/05/2018 - 11:34 नवीन
हल्ली असे कवी,लेखकांचे कंपू बरेच आढळतातआर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले हे लोक छोटेखानी कार्यक्रम ,कविसंमेलन वगैरे आयोजित करतात.एखादा नामवंत पाहुणा स्तुती करायला बोलवतात.लोकही सामाजिक दर्जाचं द्योतक म्हणून अशा कार्यक्रमाला हजेरी लावतात.एकमेकांची स्तुती करून,सर्वांच मिळून एखाद पुस्तकं प्रकाशित करून घरी येतात.फेसबुकवर फोटो अपलोड होतात,तेच लोक त्यावर कमेंट टाकतात.एकमेकांच्या आधाराने लेखक,कवयित्री,कलाकार म्हणून मिरवतात.त्या गृपच्या बाहेरच्या सदस्याला सादरीकरण करू देत नाहीत.वेगळा विचार त्यांना रुचत नाही.प्रेमाचं,निसर्गाच दळण तर इतक दळल गेलंयकी आता काही वाचवत नाही की काही लिहवत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 05/05/2018 - 12:39 नवीन
.
....त्या गृपच्या बाहेरच्या सदस्याला सादरीकरण करू देत नाहीत.
लिहिण्यासाठी मिपा आहे आणि सादरीकरण मिपा कट्ट्यावर करा , हाकानाका
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 6 hours ago
  • सुंदर !!
    3 days 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा