Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अंतर्मुख!

द
दिनेश५७
Fri, 05/04/2018 - 06:10
💬 8 प्रतिसाद
अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या. गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली. म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले. फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते... अगदी साधे. बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे! त्यावर एक वाक्य होते- ‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’ ... मी त्या दोघांकडे पाहिलं. त्यांची दाद त्या चित्राला नव्हे, त्या वाक्याला होती हे लगेच लक्षात आलं! थोडंसं आश्वस्तही वाटलं!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3351 views

💬 प्रतिसाद (8)
प
प्रिया१ Fri, 05/04/2018 - 07:01 नवीन
नक्कीच ... .विचार करायला लावणारं वाक्य आहे .. देशाचे जवान सीमेवर आपल्यासाठी आणि देशासाठी लढतात आणि आपण एक नागरिक म्हणून बेसिक गोष्टी सुद्धा पाळत नाही ... भ्रष्टाचारी भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत ... सामान्य नागरिक आपल्या नोकरी व्यवसायात दंग आहेत ... आपण, आपला परिवार इथपर्यंतच आपण विचार करतो ... त्या पलीकडे जाऊन आपण कधी विचारच करत नाही ... जवानांनी आपल्यासाठी त्यांच्या प्राणांची बाजी लावावी असं आपण काहीतरी करतो का? उलट एखाद्या जवानाने देशासाठी आपले प्राण त्यागल्यावर त्याच्या परिवारालाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते... We treat our cricketors and film stars like god who actually live only for themselves (except few like Aamir Khan who knows social responsibility), who treat common people like nothing (there are exceptions for this too and I am not talking about them) ....पण ज्यांच्यामुळे आज आपण आपलं आयुष्य कोणत्याही भीतीशिवाय घालवू शकतो त्या जवानांची आठवण लोकांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच येते ... हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे ...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/04/2018 - 08:48 नवीन
मला असे प्रतिसाद फार्फार आवडतात. किस्साही आवडला.
  • Log in or register to post comments
श
शाली Fri, 05/04/2018 - 07:42 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 05/04/2018 - 08:37 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 05/04/2018 - 18:28 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 05/05/2018 - 08:25 नवीन
"एका माहीती अधिकार" कार्यकर्त्याचे बलीदान. अशा कार्यकर्त्यांचे कार्य सुध्दा उल्लेखनिय. http://epaper.loksatta.com/1624353/loksatta-mumbai/19-04-2018#page/2/2
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 05/06/2018 - 15:42 नवीन
छान
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 05/07/2018 - 06:56 नवीन
स्फुट, आटोपशीर आणि आशयघन नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा