Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सुवर्चला, ह्या कोणाच्या कोण बरे ?

म
माहितगार
Wed, 05/02/2018 - 09:38
💬 3 प्रतिसाद
मागच्या आठवड्यात नरसिंह जयंती निमीत्ताने एका मंदिरात जाणे झाले. मंदिराचे नाव लक्ष्मी- नरसिंह मंदिर होते , माझ्या सोबतच्या अलिकडील जनरेशनच्या एका नरसिंहभक्ताने लक्ष्मीचे नाव नरसिंहासोबत कसे ? हा प्रश्न विचारला ! बहुधा , नरसिंह हा वीष्णूचा अवतार म्हणून, असे त्रोटक उत्तर दिले कारण मलाही तेवढाच अंदाजा. सोबतच्या व्यक्ती तेवढ्यावर थांबली हे बरे झाले. 'अमूक हा तमूकचा अवतार म्हणून तमूकच्या पत्नीचे अमूक सोबत नाव जोडणे' असा काही अवघड प्रश्न त्याक्षणी नाही विचारला गेला हे नशीब कारण पुराणकारांप्रमाणे हजर जवाबी कथा तयार करण्याचे कौशल्य आपल्यात -म्हणजे माझ्यात- नाही. पण सध्या रामायण विषयक काही लिहितो आहे तेव्हा, माहितीसाठी आंजावर लक्ष आहे , तेव्हा अशीच एक गोष्ट समोर आली ती म्हणजे 'सुवर्चला' हे नाव हनुमाना सोबत जोडले जाण्याचे. हनुमाना सोबत आणखी कथाही जोडण्याचे प्रपंच झाले आहेत , या कथांसोबत लोकांचे विश्वासही तसे तसे तयार होतात. आपल्याला माहितच आहे की वाल्मिकी रामायणातील हनुमान हा कडक ब्रह्मचारी , यावरुन एकीकडे स्त्रीने हनुमान मुर्तीस शीवू नये पासून ते दुसरीकडे हनुमाना पासून भिती नाही उलट आशीर्वादच मिळतो म्हणून स्त्रीयांनी हनुमानाचा मुक्तपणे जलाभिषेकाच्याही प्रथा क्वचित दिसून येत. कोणत्याही साहित्यिकाचे कल्पनांचे पंख असे कोणत्याही दिशेला जाऊ शकतात तसे पौराणिक साहित्यिकांचेही जात असावेत . कुठे हनुमानाच्या घामाचा थेंबच कुणाला मिळतो आणि कोणती कथा बनते ते रावण संघर्षातील वेगवेगळ्या कथात देशी विदेशी पौराणिकांनी कैच्या कै कथा ब्रह्मचारी हनुमानजींना चिटकवल्या दिसतात, त्यातील काहींचे सज्जड संदर्भ हाती येण्या आधी उल्लेख टाळलेले बरे. पण अशीच संसंदर्भ पौराणिक कथाच नव्हे तर अशा एका कथेवर आधारीत सपत्निक ब्रह्मचारी हनुमानाचे मंदिर तेलंगाणातील खम्मम जिल्ह्यात आहे म्हणे. आता सपत्निक आणि ब्रह्मचारी कसे ? तर हनुमानजींना आकाशातील सूर्यदेवतेकडून काही विद्या शिकावयाच्या होत्या त्यातिल एक विद्या हनुमानजी अविवाहीत असल्यामुळे देणे शक्य नव्हते , हनुमानजींचे ब्रह्मचर्यही तोडायचे नाही आणि कामही झाले पाहीजे तर उपाय काय तर कायम ब्रह्मचारी कन्येशी विवाह ! आता त्या मंदिरातील हनुमानजींच्या पत्नी नावाचा तुम्ही गेस करु लागला असणार पण जरासे थांबा आपले पौराणिक पुर्वज व्यक्ती नामांची सॉलीड सरमिसळ करत त्यामुळे जे विरोधाभास वाचाल त्याने खूप आश्चर्य चकीत होऊ नका , जरासे हलकेच घ्या . तर ब्रह्मचारी हनुमानजींचा आपल्या कथेत विवाह लावून देणार्‍या पौराणिक महर्षिंना वाल्मिकी रामायणाच्या काही आवृत्त्यात 'सुवर्चला' हे नाव सूर्यपत्नी म्हणून आले आणि आपण हनुमान पत्निचे जे नाव लिहिणार त्याची २१व्या शतकातील भारतीय चिकित्सा करतील याची कल्पना नसणार त्यामुळे त्यांनी ते हनुमान पत्नी साठी वापरले एवढेच नाही तर सुवर्चला देवीस सूर्याची पुत्री दाखवले ! ( अर्थात वडील आणि मुलाची नावे पुर्वीच्या काळी समान असू शकत तर आईचे आणि मुलीचे का असू नये , आपण प्राचिन महर्षींना बेनिफीट ऑफ डाऊट देऊन ह्या समस्येतून मुक्त करू ) मग या प्राचिन महर्षींचे नाव काय ? तर पराशर त्यांच्या ग्रंथाचे नाव काय तर पराशर संहिता आता याचा संदर्भ कुठे पर्यंत खोल जातो ? दैनिक हिंदूतील बातमी नुसार डॉ. अन्नदाना चिदंबरा सास्त्री या पंडिताने या ग्रंथाचा मूळ ताडपत्री पर्यंत जाऊन शोध घेतला तर पराशर मुनींनी चिरंजीवी हनुमानाचे ९ अवतारांचे चरित्र १५० भागात लिहून त्यातील ६ व्या अवतारात सुवर्चला देवींशी हनूमान ज्येष्ठातील शुद्ध दशमिस विवाहाचे सूतोवाच केले आहे. (संदर्भ : Wedding bells toll for Lord Hanuman JANUARY 04, 2006 00:00 IST UPDATED: MARCH 26, 2012 16:43 IST हा लेख लिहिताना जसे दिसले.) पण सुवर्चला हे नाव फक्त इथेच जोडले गेले आहे का ? तर तसे नाही अनेक पुराणासुर/ संस्कृत ग्रंथात सुर्य पत्नी म्हणुन सुवर्चला चा उल्लेख येत नाही तर , सुवर्चला च्या उल्लेखांमध्ये सूर्यपत्नी असल्याचा उल्लेख अधिक ग्रंथातून म्हणजे वाल्मिकी रामायण (सुंदरकांड अध्याय २४) , महाभारत (अनुशासनपर्व ), मार्कंडेय पुराण आणि लिंग पूराण; सुवर्चला हि रूद्राची पत्नी आहे आणि सूर्य हे रुद्राचे रूप म्हणून सूर्य पत्नी आहे . वीष्णू पुराणही जवळपास अशाच पद्धतीने सुवर्चला सूर्य पत्नी असल्याचे दाखवते . (सम्दर्भ : हिंदूइझम स्टॅक एक्सचेंज .कॉम) तर मग सुवर्चला च्या मुलीचे नावही सुवर्चला असते तर ठिक पण ऑदरवाईज सुवर्चला सुर्य पूत्री करुन हनुमानाशी विवाहीत दाखवण्याचे प्रयोजन रहात नाही. तशीही काल्पनिक कथाच लिहायची तर पराशर मुनींना सुर्याच्या मुलीस अजून काही वेगळे नाव ठेवता आले असते . मला वाटणारी एक शक्यता अशी की हनुमान हा रुद्राचा अवतार म्हणवला जातो , म्हणून रुद्राच्या त्या हनुमानाच्या सहाव्या अवतारात सुवर्चला ही रुद्र पत्नी म्हणुन हनुमान पत्नी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला असावा . म्हणजे इतर संस्कृत पौराणिकांकडून सूर्य हा रुद्राचा अवतार दाखवला जाईल आणि सुवर्चला सूर्याची पत्नी म्हणून दाखवली जाईल आणि विरोधाभासाची निर्मिती होईल याची पराशरांना कल्पना नसेल असे शक्य आहे किंवा सूर्य हिच एंटीटी काल्पनिक असल्याने विरोधाभासा बद्दल त्यांनी गंभिरपणे विचार केला नसावा पण तरीही हनुमानास ज्ञानदेण्यासाठी सूर्य हिच देवता निवडण्या मागे पराशरांचे काही प्रयोजन असेल का ? याची कल्पना नाही . भारतीय पौराणिक कथातील प्रक्षिप्ततेचे गुंते जे सोडवण्यास घेतील त्यांना अनेक नावांची सरमिसळ सोडवायला लागेल -त्यात सुवर्चला ह्या नावाचा समावेश व्हावा- अन्यथा कथेतील विरोधाभास तर्कसुसंगत पणे एक्सप्लेन करणे जड जाणारे ठरते. विरोधाभासांना सामोरे जाण्याची पारंपारीक पद्धत विरोधाभास झाकण्यासाठी आणखी कथांची निर्मित असाही राहीला असावा तरी आणखी कथा म्हणजे आणखी गॅप आणि अधिक विरोधाभास . * संस्कृताच्या जाणकार मंडळींनी [ https://sa.wikisource.org/w/index.php?title=विशेषः:शोध&limit=50&offset=0&profile=default&search=सुवर्चला&searchToken=4ebx426op83whrv38bmmcr579 संस्कृत विकिस्रोतात] सुवर्चला चे आणखी ग्रंथातही संदर्भ दिसतात त्यावर प्रकाश टाकावा. किंवा उपरोक्त नमुद संदर्भात माहितीत काही त्रुटी असल्यास त्या दुर करण्यास योग्य माहिती ससंदर्भ तर्कसुसंगत देऊन करावी ही नम्र विनंती. चुकभूल देणे घेणे. * पौराणिक कथातील सरमिसळी आणि समस्या बद्दल आधीच्या धागा चर्चा १ , २

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2496 views

💬 प्रतिसाद (3)
क
कंजूस Wed, 05/02/2018 - 10:22 नवीन
आता तंजावुरच्या सरस्वतिमहालात जाऊनच शोध घ्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/02/2018 - 10:24 नवीन
तिथे बरीच हस्तलिखितं, पोथ्या आहेत पण त्या जालावर आल्या नसतील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 05/02/2018 - 16:31 नवीन
परंपरागत मंडळी संगणक तंत्रज्ञानापासून अजूनही फटकून आहेत , आणि नवीन पिढीला परंपरांबद्दलच्या आस्था मर्यादीत झाल्या आहेत. असो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा