Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पदराआडचे इतिहासकार

ग
गावठी फिलॉसॉफर
Tue, 05/01/2018 - 12:37
🗣 9 प्रतिसाद
स्थळ:- नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाजवळ, सिंहगड (स्मारकाची डागडुजी आणि नूतनीकरण चालू असते. दगड फोडून कोरीव काम करण्याचे काम चालू असल्याने वाटेत अडथळे येत असतात.) वैभव: गौरव व्यवस्थित चाल.... पुढे दगड कोरून ठेवले आहेत. गौरव: नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीचे दर्शन तुम्हा सर्वांअगोदर मीच घेणार. मीच पहिला नतमस्तक होणार!!! विक्रम: ok.... शेवटी तुम्ही बलकवडे घराण्याचे वंशज.... सरदार!!!!! (शेवटी आम्ही सगळे स्मरकाजवळ पोचतो. तिथे एक पस्तीशितील जोडपे सेल्फी घेत असते. आम्ही थोडा वेळ उभे असतो पण त्यांचे ते चाळे चालूच असतात.) प्रशांत: किती निर्लज्ज लोक आहेत..... समधी स्थळाजवळ चप्पल घालून वावरतात.... वरून जोडीने सेल्फी अशी खेचतात की त्यात स्मारक झाकली जाते. अकलेचे भाग आहे की नाही. हा त्या थोर महापुरुषांचा अपमान नाही का??? वरून तिथे येणाऱ्या शिवप्रेमींनी अडथळाssss गणेश: (रागाने)थांबा मीच बोलतो त्यांना!!! स्वप्निलभाऊ: जाऊदे गणेश!!!! कशाला काही बोलतो चालूदे त्यांचे. गणेश: (ऐकत नाही) ओ महाशय!!! आम्ही किती वेळ इथे थांबलोय... वेळ ही फार होतोय... तुम्ही आधीच चुकीच्या पद्धतीने फोटो काढताय.... आम्हला दर्शन घेऊद्यात..... मग तुम्हाला काय करायचे ते करा. महाशय: हो हो झालं एकच फोटो!!! (तरीही वेळ घेतोच) वैभव: झालं का होsss महाशयांची पत्नी: चला हो..... त्यांना अडथळा नको... ( डोळे वटारून) चलता की नाही!! विक्रम: वाघ निघाले मांजर बनून(हळू आवाजात) (शेवटी फोटो सेशण करून ते जोडपे निघण्याच्या तयारीत असते. ते महाशय म्हणजेच संभाषणातील कथित इतिहासकार. ते बाजूला सरत स्तोवर आम्ही स्वप्नील भाऊंबरोबर इतिहासावर गप्पा मारत असतो) गौरव: स्वप्नीलभौ हे दोन उभे दगड कशाचे असावेत??? स्वप्निलभाऊ: हे विरगळ आणि सतीशीळा असावीत. जयेश: यावर कलर दिल्याने काही समजत नाही. गौरव: सारखा कलर देऊन त्यातील कोरीव काम नाहीस होत चाललय. गणेश: किती हे इतिहासाचे विद्रुपीकरण.... सुंदर दिसावे म्हणून कलर मारून त्यातील कोरीव काम भरून गेलं आहे.... चाणाक्ष नजारा सोडल्या तर आपल्या सारख्याला ते काय आहे हे समजणे कठीण काम. गौरव: होना... कुठे कलर द्यावा याविषयी अगोदर माहिती घेऊन ठरवावे. गणेश: स्वप्नील सर ह्या उभ्या चौकोनाकृती दगडावर शिवलिंग आहे... कदाचित ही समाधी असावी... कारण समाधीवर शिवलिंग करण्याची पद्धत आहे. गौरव: हा... काही ठिकाणी तर पादुका कोरतात. जयेश: ते कशाला???? स्वप्निलभाऊ: जे शौवपंथीय योद्धा असेल तर शिवलिंग कोरतात, तर वैष्णवपंथीय मध्ये पादुका कोरतात.परंतु काही ठिकाणी अजून वेगळेपणा पाहायला मिळतो. (तितक्यात तिथे ऐतिहासिक शिल्पांचे फोटो काढत असलेला वैभव येतो, त्यासोबत प्रशांत, मनोजकुमार येतात) वैभव: जिरगे(स्वप्नील) सर आता काय बोललात??? सतीशीळा???? विरगळ?? स्वप्नीलभाऊ: सतीशीळा जयेश: काय असते ते???? (आमचे संभाषण चालूच असते. त्यातील सतीशीळा हा शब्द अजूनही तिथेच असलेल्या त्या महाशयांच्या म्हणजेच पादराआडच्या इतिहासकारांच्या कानावर आघात करतो. विजेच्या चपळाईने ते परत आमच्याकडे येतात. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा येतात.) इतिहासकार: काय बोललात तुम्ही??? विरगळ काय??? ( आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.) त्यांची पत्नी: चला ना!! इतिहासकार: थांब थोडं. (तरीही आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही त्या शिल्पांचे बारकाव्याने निरीक्षण करत असतो. शेवटी तो इतिहासकार: ऐ!!! इकडे बगा.... तुम्हाला काय हवंय??? काय माहिती पाहिजे असेल तर इकडे पहा!!! तिकडे काही नाही. मी सांगतोsss गौरव: बोला. गणेश: हे शिवलिंग या दगडावर का कोरले असावे??? इतिहासकार: त्याकडे बोललो ना दिर्लक्ष करा.... तिकडे काही नाही.... एक रचना म्हणून तो दगड तिथे आहे. त्याचे काहीच महत्व नाही. गौरव: असे थोडी!!! इतिहासकार: हो माझे एका त्याकडे पाहूच नका. गणेश: मग या शिल्पाविषयी बोला??? इतिहासकार: हा हे महत्वाचे आहे. ही सतीशीळा आहे..... यात ज्याची समाधी असते त्याचा आत्मा असतो... याला हात लावून दर्शन घ्यायला जायचे असते..... बाकी काही नाही.... हे जास्त महत्वाचे नाही... तुम्ही समाधी पहा.... हे नाही समजणार तुम्हाला!!! (यावर त्याच्या अज्ञानामुळे खूप हसायला आले होते आणि चुकीचा इतिहास पसरवत असल्याने रागही आला होता) स्वप्नीलभाऊ: बरं या समधीस्थळाविषयी सांगा(फिरकी घेण्याच्या अंदाजात स्मित हास्य करत) इतिहासकार: तुम्हाला हा इतिहास नाही कळणार sss. खूप वेगळा इतिहास आहे. गणेश: काय आहे सांगा जरा?? इतिहासकार: मी नाही इथे सांगत.... तुम्हाला राग येईल... मी तुम्हाला सतीशीळा आणि हा इतिहास सांगतो.... मला तुमचा no द्या. सर्वकाही डिटेल मध्ये सांगतो sss (यावर आणि त्यांच्या अज्ञानावर सर्वच खळखळून हसतात. हा प्रकार त्यांच्या पत्नीच्या लक्षात येतो. आपल्या नवऱ्याची खिल्ली उडतेय पाहून आणि होणार उशीर पाहून त्यांना राहवत नाही.) इतिहासकारांच्या पत्नी: ओ... ऐकलेत का... चला पटापट... किती वेळा बोलले( आता मात्र स्पष्ट रागात) इतिहासकार: हो चल( बायकोसमोर हातशवणे चालतात) आमच्या समूहात स्वप्नीलभाऊसारखे अभ्यासू मंडळी आणि चार दोन तर इतिहास प्रेमी मंडळी होती. आम्ही त्या शिल्पांची बारकाव्याने निहाळणी आणि चर्चा करताना विनाकारण आपल्या बायकोला इम्प्रेस करण्याकरता आलेला तो इतिहासकार म्हणजे पदराअडचा इतिहासकारच..... कारण आमच्या चर्चेतून जो सतीशीळा हा शब्द पडला तोच उचलून त्याने त्याचा प्रयोग विरगळीवर केला. वरून माहीत नसताना धडधडीत खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी शूरवीर असल्याचा बहाना करून आम्हाला इतिहास सांगताना स्वतःच्या बायकोने थोडं डोळे वटारून पाहिले की पळून गेला. हे असे पदराआडचे इतिहासकार चुकीचा इतिहास पासरवण्याचे दवंडीखोरच. (त्यानंतर आम्ही सर्वजण थोडीफार इतिहासावर चर्चा करून तिथून पुढच्या स्थळांकडे त्या प्रसंगाची आठवण आणि ऐकमेकांवर जोक करत खळखळून हसत चालते होतो. --------------------- प्रसंग संपला----------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3282 views

🗣 चर्चा (9)
द
दुर्गविहारी Tue, 05/01/2018 - 19:31 नवीन
हा हा हा ! पुन्हा एकदा ती आठवण ताजी झाली. तीन मि.पा. करांचा एकत्रित सिंहगडावरचा अनुभव. ;-)
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर Tue, 05/01/2018 - 19:51 नवीन
कधी बाजारात, कधी दुकानात, तर कधी चावडीवर एखादा पकावू माणूस बाता मारताना दिसला की त्या इतिहासकाराची आठवण येते
  • Log in or register to post comments
ग
गडमित्र Tue, 05/01/2018 - 19:59 नवीन
इतिहासाशी संबंधित एखादा पुरस्कार जाहीर करायला हवा होता तिथेच.....
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर Wed, 05/02/2018 - 04:45 नवीन
जी सरदार!!!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 05/02/2018 - 05:57 नवीन
ही सत्यकथा आहे? अवघड आहे एकंदरीत!!
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर Wed, 05/02/2018 - 08:42 नवीन
हो सत्य कथा आहे..... या मोहिमेमध्ये आम्ही 3 मिपाकर होतो
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 05/02/2018 - 08:49 नवीन
तानाजीच्या स्मारकाजवळ मावळ्याचा ड्रेस घालून एक वयस्क मनुष्य पोवाडा म्हणत असतो. तोही काही पण सांगत असतो. अफजलखान म्हणे ९ फुट उंच होता. तानाजी ७ फुट उंच होता .. :-)
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर Wed, 05/02/2018 - 18:28 नवीन
नवीन उदयास आलेली शिवाव्यख्याते नावाची जमात यापेक्षा वेगळी नाही...... इतिहासात काहीही काल्पनिक घुसवतात, मनोरंजनासाठी अतिशयोक्ती करतात आणि बक्कळ पैसे उखळतात..... आणि जणता तोच इतिहास समजून एखाद्या अभ्यासू माणसाला मूर्खात काढतात...... उदा व्हाट्सअप्प वर फिरत असलेले msg पहा.... काहीही लिहलेल असत, उदा दाखल बोलायच तर "धनाजी दिल्लीवरून 8 तासात घोडा पुण्यात आणत होते" हे बुलेट ट्रेन ला तरी शक्य आहे का???? काहीही बोलतात
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 05/02/2018 - 19:09 नवीन
इतिहास करता येईल असं काही नसलं कि नवइतिहास सागण्याचा धोपट मार्ग "हाफ टर्मरिक मार्तंड" नक्कीच निवडतात. बाकीचा साक्षीदार नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 6 hours ago
  • सुंदर !!
    3 days 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा