Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माझ्या महाराष्ट्राचं गाणं

अ — अनन्त्_यात्री, Mon, 04/30/2018 - 19:17
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न : =================== बेलाग कातळ कड्याची कपार त्यातून खुणवी गरुडाचे घर घाटाचे वेटोळे माळती डोंगर माडा पोफळीशी खेळतो सागर पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर घामाच्या खताने फुलते शिवार शेताच्या बांधाशी चटणी भाकर कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार भारूडा भुलवी लावणी शृंगार ओवीच्या अंतरी शांतीचा सागर अभंग झंकारे झेलून प्रहार भक्तीने भिजतो चंद्रभागातीर दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर पडघम ढोलाचा,लेझीम लयदार तडतड ताशाची, वाजंत्री सुस्वर मंजुळ सनई, चौघडा गंभीर कीर्तनाचे रंगी टाळांचा झंकार मेणाचे मार्दव, वज्रास टक्कर रांगडा, भावुक, उदात्त, गंभीर शौर्याचा डिंडिम अटकेच्या पार मानवी रत्नांचा अथांग सागर ...भारतवर्षाचा भक्कम आधार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1664 views

💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर Tue, 05/01/2018 - 02:02 नवीन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/01/2018 - 08:14 नवीन
क्या बात है...! मस्त गीत
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 05/02/2018 - 06:53 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा