Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मेथी पिठले

श
श्वेता२४
Sun, 04/29/2018 - 17:17
साहित्य - १वाटी बेसन २मीरची चीरून १०-१२ लसूण ठेचुन १०-१२ पाने कढीपत्ता २ चमचे कांदा लसूण मसाला मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे साहित्य बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा फोडणी आता त्यात मेथीची पाने घालावी मेथी घाला आता थोडी हळद घालून बेसनाचे पाणी घालावे व झाकण ठेऊन मंद आचेवर १०-१२ मी शिजत ठेवावे. दुसरिकडे तडक्ययाची तयारी करावी बेसन ८-९ चमचे तेल घेऊन त्ययात जीरे मोहरि हिंग कढीपत्ता लसूण घालून चरचरित फोडणी करावी. सर्ववात शेवटी कांदालसुण मसाला घालावा तडका लगेच तयार पिठल्ययावर पसरावे मेथी पिठल मेथी पिठलं तयार आहे घ्या की खायला!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10090 views

💬 प्रतिसाद
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 04:19 नवीन
छान
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II गुरुवार, 05/03/2018 - 07:02 नवीन
सोपी आणि सरळ पाकृ .... मस्त
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 05/03/2018 - 07:28 नवीन
मंगू आणि पेशवे आपण आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 05/03/2018 - 07:54 नवीन
हे थोडे वेगळेच आहे . मी मेथी- बेसन म्हणजे कोरडे पिठले करते. वाटली डाळ असते तसे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 05/03/2018 - 10:05 नवीन
हे पिठले थोडे पातळसर नेहमीच्या पिठल्यासारखेच असले तरी त्यातील मेथीची भाजी व तडक्यामुळे अप्रतीम चव येते. हे पिठले भाकरी व भात दोघांसोबतही चालते त्यामुळे हे पीठले केले की वेगळी भाजी किंवा आमटी करावी लागत नाही
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 05/03/2018 - 11:10 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 05/03/2018 - 11:10 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
श
शाली गुरुवार, 05/03/2018 - 13:57 नवीन
मी कधी खाल्ले नाही. करुन पहायला हवे एकदा. शेवग्याच्या शेंगा टाकतो आम्ही बरेचदा.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Tue, 05/08/2018 - 20:34 नवीन
सोपी आणि अनोखी पाकृ. कांदा लसूण मसाला नसल्यामुळे नेहमीचा गोडा मसाला घालून बघेन.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/09/2018 - 06:30 नवीन
गोडा मसाला नको कोल्हापुरी चटणी किंवा एव्हरेस्ट / अंबारी चा कांदा लसूण मसाला मिळतो तोच घालावा अगदीच नसेल तर फक्त मिरची पावडर पण चालेल
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 05/09/2018 - 00:30 नवीन
मेथी किती घ्यायची? साहित्यात मेथी राहिली. वेगळी पाककृती. नेहमी असे कोरडे पिठले पाहिले आहे. त्यात चिवळ नावाची भाजी टाकतात. मेथी घालून पाहायला हवी.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/09/2018 - 06:35 नवीन
मी एक मोठा बाउल मेथी घेतली आहे आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करता येईल
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/09/2018 - 05:56 नवीन
१)आम्ही पातळ पिठले करताना पीठ पाण्यात मिसळून फोडणीत टाकत नाही. २) लाल मिरच्या लसुणच्या फोडणीवर चार वाट्या पाणी टाकतो, उकळल्यावर मीठ अंदाजे घालून ( पाणी अर्धे होणार या हिशोबाने) मग त्यावर कोरडे पीठ थोडेथोडे भुरभुरत ढवळत लिहायचे. उकळत असतानाचा पीठ टाकून हलवायचे. दहा मिनीटे शिजेल एवढे पाणी असतानाच पीठ टाकणे थांबवायचे. शेवटी शिजूनही थोडे पातळ सैलसर राहावे. गुठळी होऊ न देणे सवयीने जमते. ३)मग गॅस बंद करून कोथिंबीर टाकून न हालवता टाकून झाकायचे दहा मिनिटे. लसुण कोथिंबिर स्वाद आणि मिरचीचा तिखटपणा छान जमतो. ४) कोथिंबिरऐवजी मेथीपाने टाकता येतील. शेवटी टाकल्याने स्वाद येईल पण कडू होणार नाही. ५) पातळ पिठल्यात कांदा अजिबात घालायचा नसतो. ते झणझणीत न होता गोडसर होते. ६) घट्ट पिठले उर्फ झुणक्यामध्ये पीठ,कांदा,मिरच्या, मीठ, हळद भिजवून( जेमतेम पाणी) फोडणीवर ओतल्यास घट्ट झुणका होतो. फोटो छान आले आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/09/2018 - 05:57 नवीन
थोड्या टंकण चुका झाल्यात.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/09/2018 - 06:43 नवीन
मला मराठी टाईप करायची सवय नाहीय . हळूहळू जमेल तोपर्यंत सांभाळून घेणे बाकी हा पदार्थ लग्नाआधी मी व माझे अहो यांनी पुण्यात एस पी कॉलेज जवळ गिरिजा नावाचे हॉटेल आहे तिथे खाल्ला होता. त्यानंतर खास हे पिठलं भाकरी खायला आम्ही जात असू पुणे सोडल तसं यांनी मला हे घरीच ट्राय करायला सांगितलं. मी हि कल्पनेने अंदाज करून केलं आणि चक्क जमलं! आता नेहमीच यांची हे पिठलं करण्याची फर्माईश असते. त्यामुळे मिपावर हि रेसिपी टाकली
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/09/2018 - 08:32 नवीन
माझ्या खरडीत चुका.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 24 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा