आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे : २
मागिल पान : आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे
२०१४ मध्ये बाळंतपणासाठी दीर्घ भेट दिल्यावर आमच्या त्या पाहुण्यांनी २०१५ मध्ये एक दोन दिवसांची धावती भेट दिली होती. तेव्हा काय बिनसले माहीत नाही, पण जास्त दिवस ते थांबले नाहीत. बहुतेक त्यांना जास्त चांगले घर मिळाले असावे. कारण, त्यानंतरची दोन वर्षे तर त्यांनी आमच्याकडे फिरकूनही बघितले नाही. त्यांचे जपून ठेवलेले घरटे बिनवापराने मोडकळीला आले आणि केव्हातरी साफसफाई करताना काढून टाकले गेले. जणू आमचे पाहुणे आम्हाला विसरून गेले आणि आम्हालाही "दृष्टीआडची सृष्टी" या न्यायाने त्यांच्या आठवणीने रुखरुख वाटणे बंद झाले होते :( आणि अचानक... एक आठवडाभर अगोदर गॅलरीत हालचाल दिसू लागली आहे. यावेळचे पाहूणे बुलबुल प्रकारातलेच आहेत पण तेच ते जुने पाहुणे नाहीत. जुने पाहुणे तांबड्या रंगांची जोरदार शायनिंग मारणारे होते. आताचे तेवढे रंगीबेरंगी नाहीत, मध्येच एखादा लालसर ठिपका सोडला तर अंगभर बहुतांश करड्या रंगांच्या छटा आहेत. पण, रंग दुय्यम महत्वाचा आहे... कोणीतरी पाहूणे परत आपल्याकडे वस्तीला आले याचाच अत्यानंद झालेला आहे ! हे नवीन पाहुणे तसे बर्यापैकी बेफिकीरच दिसत आहेत. त्यांनी स्वतंत्र घरटे बनवण्याची पण तसदी घेतलेली नाही. "एखाद्या कुंडीतल्या झुडुपाच्या पानांचा आडोसा पुरे झाला, चार पाच आठवड्यांसाठी उगा मस्त घर बनवणे व ते सजवणे, यासारख्या फुटकळ गोष्टींत वेळ आणि श्रम खर्च करणे व्यर्थ आहे" असा व्यवहारी विचार करणारे हे समजूतदार आधुनिक जोडपे आहे ! त्यामुळे, पूर्वीच्या जोडप्याने वापरलेल्या, "नराने घरटे बनवणे, मादीने त्यांत खोट काढून एखादा भाग उध्वस्त करत राहणे, नराने निमुटपणे मादीचे समाधान होईपर्यंत उस्कटलेला भाग परत बांधून काढणे", अश्या अनेक पायर्या या जोडप्याने गाळल्या आहेत. त्यांनी एकमताने, गॅलरीत टांगलेल्या एका स्पायडर प्लँटच्या कुंडीचा कब्जा घेऊन सरळ त्यातच अंडी घातली आहेत ! यावरून, यांचे 'सातजन्मिच्या आणाभाकांसह लग्न' झालेले नसून, केवळ एका विणीच्या हंगामाचा 'लिव्ह-इन' करार झाला असावा असा अंदाज आहे. पाहुणे फार बुजरे असल्याने आणि आम्हाला पक्षांची भाषा येत नसल्याने या अंदाजाची खात्री करून घेणे कठीण आहे... पण वर सांगितलेला (घरटे बांधण्याच्या पायर्या गाळणारा) "सबस्टॅन्शियल सर्कमस्टॅन्शिअयल एव्हिडन्स" आमच्या बाजून आहे, यात वाद नाही ! :) अंडी कुंडीत खोलवर असल्याने पाहुंण्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचे फोटो घेणे टाळले आहे. मात्र, त्यांच्या नकळत, दूरून घराच्या आतून त्यांच्या लगबगीचे फोटो घेणे जमले आहे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing part 2आता हा सोहळा परत परत पाहण्यात काही दिवस भूर्रकन उडून जातील ! अजून बाळांना कंठ फुटलेला नाही... ती कसर भरून निघाली की या सोहळ्याची मजा द्विगुणीत होते !