Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

असं वाटतं !

श — श्वेता२४, Wed, 04/25/2018 - 07:49
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं............... निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं...................... गडबडीची सकाळ अन ठरलेलं रुटीन सोबत भाजी-पोळीने भरलेला टीफीन साडेआठची लोकल कधीच चुकवून चालत नाही इकडे तिकडे पाहायला मुळी वेळच मिळत नाही कशाला मग पहाटेची किलबिल ऐकू येईल? फुलणाऱ्या फुलांसोबत मनही फुलुन येईल? म्हणून वाटतं पहाट बनून आपणच उजळून यावं................... असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................ तीचतीच तोंडे तेचतेच काम मशीन बनवून टाकते ऑफीसच्या चार भिंतीत जग बंदीस्त होऊन जाते मग वाटतं घडयाळाचा काटाच उपटून घ्यावा बॉसचा हळूच डोळा चूकवून चक्क पळ काढावा मग मला खुल्या हवेत श्वास घेता येईल? रानामधलं गवत बनून मंद डोलता येईल? वाटतं झऱ्याचं पाणी बनून खळखळ वाहत जावं..................... असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ........................ कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं वागू गरमगरम शिऱ्यामध्ये सॉस घालून खाऊ किंवा सगळेच सरळ चालतात आपण उलटे चालू निरर्थक..., अकारण...., उगीच भटकत राहू मनसोक्त भटकून मात्र थेट घरी येईन आईच्या मांडीवर गाढ झोपून जाईन तेवढ्या काळापुरतं माझं बालपण मला मिळावं................... असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................ - श्वेता

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6203 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Wed, 04/25/2018 - 10:04 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 04/25/2018 - 10:07 नवीन
मस्त कल्पनाविलास.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 04/25/2018 - 10:12 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 04/25/2018 - 11:48 नवीन
मन वढाय वढाय... छान कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 04/25/2018 - 14:57 नवीन
बालपण देगा देवा मुंगी साखरचा रवा आपण पुढे व्हा आम्ही येतोय मागून हे बघा आलोच सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/25/2018 - 16:19 नवीन
छान ! लहान झाल्यासारखं वाटलं !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 04/25/2018 - 16:57 नवीन
प्रतिसाद देणार्यया सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 04/26/2018 - 15:22 नवीन
खुप सुंदर कविता.. आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 04/27/2018 - 07:54 नवीन
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Wed, 07/18/2018 - 08:45 नवीन
खूप छान..
  • Log in or register to post comments
व
विनोदपुनेकर गुरुवार, 07/25/2019 - 11:52 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments
इ
इरामयी गुरुवार, 07/25/2019 - 19:39 नवीन
बंधमुक्त जगावंसं वाटतं. खूप खूप छान!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 07/26/2019 - 12:49 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 07/26/2019 - 14:43 नवीन
कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं वागू गरमगरम शिऱ्यामध्ये सॉस घालून खाऊ
:-)) :-)) :-)) आमच्या हापिसातली एक महिला सहकारी नुसत्या भातात सफरचंद आणि अननसाच्या फोडी घालून खाते ते आठवलं एकदम :-)) छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 07/27/2019 - 20:01 नवीन
भातात सफरचंद आणि अननसाच्या फोडी वगैरे काश्मिरी पुलावात पण घालतात :).
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 07/26/2019 - 16:34 नवीन
:)))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा