Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महाराष्ट्र दिन

अ
अभ्या..
Wed, 04/18/2018 - 15:10
💬 7 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, मी काय म्हणतो, महाराष्ट्र दिनानिमित्त एखादी सिंपल महाराष्टृ स्पेशल चारोळी स्पर्धा किंवा शेवटची एक लाईन देऊन आधीची कविता पूर्ण करण्याची स्पर्धा घेउयात काय? विषय सोपा आहे आणि चांगला प्रतिसाद मिळेल. जरा जास्त कंटेट पाहिजे असेल तर "महाराष्ट्रातला माझा महाजिल्हा" नामक लेख कलेक्शन घेऊ. आपापल्या जिल्ह्यातील एखाद्या विशेषावर किंवा पूर्ण जिल्ह्यावरच लिहितील सदस्य. स्पर्धा नाही. लेखमाला. कितीही दिवस चालू दे मग हि माला. काय म्हनता?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 500 views

💬 प्रतिसाद (7)
प
पद्मावति Wed, 04/18/2018 - 20:32 नवीन
माझ्या मते स्पर्धा नको. लेखामाला चांगली आयडीया आहे. फक्त लेखमाला उपक्रम करायचा असेल तर मात्र तातडीने धागा काढावा. अगदीच प्रतिसाद न आल्यास सास पैकी तरी कोणी एक दोन जणांनी लेख द्यावेत. थोडं स्पष्ट बोलते....आपला दिवाळी अंक सोडला तर मागच्या वर्षीपासून आपला कुठलाच उपक्रम दुर्दैवाने नीट झाला नाही :( कॉर्डिनेशन, टायमिंग, प्लॅनिंग कुठेतरी कमी पडलं. छायाचित्रण स्पर्धा हे अगदी अलीकडचं उदाहरण. थोडक्यात म्हणजे महाराष्ट्र दिनाचा उपक्रम खूप कल्पना छान आहे पण आपण नीट पार पाडू का याबाबतीत मी थोडी साशंक आहे कारण दिवस कमी आहेत आपल्याकडे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/19/2018 - 14:48 नवीन
वरील बहुतेक मुद्द्यांना अनुमोदन. लेखमाला केल्यास बरे राहील. फक्त दहा दिवस राहिलेत, हे पाहता अगदी आतापासून सुरुवात करूयात. बॅकअप म्हणून पुण्याच्या ग्रामीण भागाचा एक लेख मी तयार ठेवतो. कॉर्डिनेशन, टायमिंग, प्लॅनिंग कुठेतरी कमी पडलं. महाराष्ट्र दिनाच्या पुढे वर्षभरात जे साजरे करण्यासारखे दिवस आहेत व ज्यासाठी उपक्रम करता येईल, त्यांची यादी बनवल्यास 2 महिने आधी नियोजन सुरू करून 1 महिना आधी जाहीर करता येईल. उदा. गणेशोत्सव 13 सप्टेंबर ला सुरू होतोय तर श्रीगणेश लेखमालेचा नियोजन 10-15 जुलै दरम्यान सुरू व्हायला हवे आणि 15 ऑगस्टच्या आसपास मेन बोर्डावर जाहीर करायला हवे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/19/2018 - 16:22 नवीन
सहमत आहे. गेल्या काही दिवसात मी काहीच करु शकलो नाही ह्याचे वाईट वाटते आहेच. आता थोडेसे प्लानिंग करुन करुयात. थोडेसे सजेशन म्हणजे सर्वकाळ सर्वच साहित्यसंपादक उपल्ब्ध होणार नाहीत. इथेही संवादाला बर्‍याच मर्यादा आहेत. जितके उत्साही आणि इच्छुक असतील तितक्यांनी कामगिरी वाटून घेउयात. मला माहीतच नव्हते असे म्हनून काही उपयोग होणार नाही तेंव्हा एकदाची धाग्याची डेडलाईन ठरवू आणि प्रकाशित करुयात. कसे? मी आवाहनाचा मसुदा तयार करो आणि उद्या टाकतो इथे. काही बदल आणि सूचना घेऊन लगेच प्रकाशित करुयात.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 04/21/2018 - 10:58 नवीन
कुणाच्या काही सूचना? काहि अ‍ॅडिशन?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 04/21/2018 - 12:39 नवीन
येऊ द्या आता आवाहन. लेखमाला जिल्हानिहाय वैशिष्ट्यांचे लेख येतील तितके प्रकाशित करू. किमान सहा असावेत, 1 मे पासून 6 मे रविवार पर्यंत 1 मेला शक्यतो अखिल महाराष्ट्र टाईप हवा. उदा असं कोणी ज्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा चौफेर निवास केला असेल. माझ्याकडून काही मदत लागल्यास मी शक्यतो रात्री आठच्या पुढे उपलब्ध असेलच.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 04/21/2018 - 13:03 नवीन
ओके हिंदकेसरी
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 04/24/2018 - 02:42 नवीन
?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा