Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

हरवलेला डबा

म
मूखदूर्बळ
Tue, 04/17/2018 - 10:18
💬 12 प्रतिसाद
हरवलेला डबा फार नाही ३० वर्षा पूर्वीची गोष्ट असेल. मला माझ्या वस्तू हरवायची खुप सवय होती. आणि तेंव्हा माझ्या कड़े हरवणया सारख्या वस्तूही खुप होत्या. कधी पेन्सीळ, कधी कंपास तर कधी फक्त वही. पण त्यातल्या त्यात माझी आवडीची हरवायची वस्तू होती ती म्हणजे माझा खाऊचा डब्बा. हा मी एक दिवसा आड़ हरवायचोच. सुरुवातीला वेन्धळ ट पणा ने डबा हरवणारा मी नंतर नंतर सवयीने डबा हरवायला लागलो. माझ्या सोयीसकर डबा हरवणयालाही एक कारण होत. ते अस की माझा हरवलेला डबा शोधणयाच्या निमित्ताने माझी आई मला शाळेत सोडायला यायची आणि मग "हरवलेल्या वस्तूच्या " खोलीत आम्ही दोघ मिळून माझा डबा शोधायचो.तितका वेळ मला आईचा आणिक सहवास लाभायचा आणि खुप भारी वाटायच. परत दोस्त लोकात "आज माझी आई मला सोडायला आली होती" म्हणून मी भाव खायचा तो वेगळाच. हरवलेल्या वस्तूनच्या खोलीचा सर्वो सर्वा शिवगण शिपाई सुद्धा हे नेहेमीचच गिरहाईक आहे म्हणून आमच्या कड़े काणा डोळ करायचा. सांगायचं आस की हरवलेला डबा शोधण हे केवळ एक निमित्त होत. महत्वाचे होत ते आई मुलाचा अधिकचा सहवास. माझा हा कावा आईला नक्कीच कळला असणार पण तिला कळल आहे है तीनी मला कधी कळू दिल नाही.माझ्या बरोबर तीही हा खेळ आवडीने खेळत असावी. पुढे थोड़ा मोठा झाल्यावर डबे हरवेनासे झाले खेळ रंगेनासा झाला. अगदी परवा परवा पर्यन्त हा खेळ मी विसरुन सुद्धा गेलो होतो. तोच काल माझी पहिलीतली मुलगी येऊन मला सांगायला लागली पप्पूली आज माझा डबा हरवला आणि खर सांगायचं तर तेंव्हा मला माझा शाळेत हरवलेला डबा काल पुन्हा एकदा सापडला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4643 views

💬 प्रतिसाद (12)
अ
अंतरा आनंद Tue, 04/17/2018 - 11:08 नवीन
काल माझी पहिलीतली मुलगी येऊन मला सांगायला लागली पप्पूली आज माझा डबा हरवला आणि खर सांगायचं तर तेंव्हा मला माझा शाळेत हरवलेला डबा काल पुन्हा एकदा सापडला.
छान. अजून खुलवायची होतीत आठवण.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 04/17/2018 - 11:18 नवीन
:-) गोड!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 04/17/2018 - 12:43 नवीन
थोडक्यात पण थेट काळजाला भिडला लेख
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 04/17/2018 - 14:26 नवीन
+११
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/17/2018 - 13:07 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 04/17/2018 - 14:36 नवीन
आपली छटा पोरांत दिसते तो क्षणच भारी एकदम.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 04/17/2018 - 15:08 नवीन
+१ छान
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/17/2018 - 16:40 नवीन
वा. चांगलय. मी डबा हरवला तर आई दोन धपाटे द्यायची.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 04/17/2018 - 18:01 नवीन
हृद्य मनोगत ! शेवट काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 04/17/2018 - 22:17 नवीन
खूप छान :)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/18/2018 - 00:39 नवीन
गोड.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 04/18/2018 - 02:44 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 23 hours ago
  • सुंदर !!
    5 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा