Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

रानभेदी..!!

व — विशुमित, Fri, 04/13/2018 - 14:25

रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा..!!

परसात आली गाई
वासरू फोडते हंबराई
कुशीत घेते त्याला
कुशीत घेते त्याला
दूध पिण्या करते इशारा
रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा..1

झोप लागत नाही
सल काळजात बाई
दरवळली दारी जाई
दरवळली दारी जाई
मातीचा गंध बरा
रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा...2

दुःखाचा डोंगर
कळकटलेला पाझर
रीत-रिवाजाची वाघर
रीत-रिवाजाची वाघर
वरून नियतीचा मारा
रानभेदी वाहतो वारा
सांजवेळी सुन्न उंबरा...३
===================================


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2474 views

💬 प्रतिसाद
प
पुंबा Fri, 04/13/2018 - 14:30 नवीन
मनाला भिडली, आवडली म्हणवत नाही.. :(
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 04/14/2018 - 07:17 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/14/2018 - 09:22 नवीन
अर्थवाही शब्दकळा
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 04/16/2018 - 08:23 नवीन
खुपच खिन्न करणारी कविता आहे. तो मुड अचुक पकडलाय.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/03/2018 - 04:05 नवीन
दिसांनी अस्सल मराठी शब्द वाचले, शब्दकळा अचूक मांडले आहे नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 05/03/2018 - 05:14 नवीन
धन्यवाद नाखू जी...!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा