Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

थायलंड - ८ दिवस ट्रिप प्लान (स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाणार्यांसाठी)

ट
टवाळ कार्टा
Sat, 04/07/2018 - 21:29
💬 51
उपयुक्त साईट्स विमान बुकिंगसाठी - www.skyscanner.com हॉटेल बुकिंगसाठी - www.agoda.com हॉटेल रिव्ह्यूसाठी - www.tripadvisor.com या सग्ळ्या मी स्वतः वापरलेल्या आहेत :) रहाण्यासाठी जागा बँकॉक - खाओसान रोड फुकेत - बांग्ला रोडच्या जवळ (पण बांग्ला रोडवर नाही :D) क्राबी - मार्केटच्या जवळ ------------------------------------------------------------------------------------------------------------- पोहोचण्याचा दिवस (T day) बँकॉक ------------------------------------------------------------------------------------------------------------- शक्यतो संध्याकाळी ३:३० पर्यंत पोहोचणारे विमान निवडावे...विमानतळावरून बँकॉकला जाण्यासाठी मेट्रो आहे...विमानतळावर चौकशी खिडकीवर मेट्रोचे उतरण्याचे स्टेशन विचारावे हॉटेलला पोचून फ्रेश होऊन लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका मारावा आणि त्याचबरोबर लोकल टूर कंपनीकडे दुसर्या दिवशीसाठी (T+१ day) "टायगर टेंपल + फ़्लोटिंग मार्केट + बाकी" (ग्रँड पॅलेस नसलेली) अश्या "फक्त एकदिवसीय" टूरचे बुकिंग करून टाकावे (साधारण माणशी जास्तीत जास्त १२००-२००० दर असावा)...२-४ टूरवाल्यांकडे चौकशी केल्यावर टूरची नक्की किंमत समजतेच (आणि तसाही १००-२०० चाच फरक असतो)...टूरवाले सकाळी हॉटेलवर न्यायला येतात आणि नंतर आणून सोडतात (तरीसुध्धा ही सुविधा आहे की नाही ते नक्की करून घ्यावे) त्याच बरोबर (T+२ day) च्या संध्याकाळची / रात्रीची फुकेताला जाणार्या ट्रेनचे / बसचे तिकिट बुक करून ठेवावे...ट्रेन / बस दुसर्या दिवशी सकाळी फुकेतला पोचते. मुख्य सुचना - टूरला जाताना टायगर टेंपलसाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हे आठवणीने विचारावे ------------------------------------------------------------------------------------------------------------- १ ला दिवस (T+१ day) बँकॉक ------------------------------------------------------------------------------------------------------------- टूरवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे कटाक्षाने हलक्या रंगाचे कपडे घालावेत...लोकल टूर कंपनी कडून टायगर टेंपल + फ़्लोटिंग मार्केट + बाकी टायगर टेंपल हा Once in life time प्रकार आहे...वाघाला हात लावता येतो :) तिथे साधारण २००० रुपये भरले (ग्रुप साठी - जास्तीत जास्त ६ जण एका ग्रुप मध्ये) तर वाघाच्या बछड्याला मांडीवर घेऊन फ़ोटो काढता येतात...नैतर फक्त हात लावता येतो :) मुख्य सुचना - लहान मुले बरोबर असतील अथवा जरा ज्यादाच आगावू लोक बरोबर असतील तर त्यांना आधीच "शिस्तीत" समजावून टायगर टेंपलमधल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सुचना व्यवस्थित पाळायला बजावावे...वाघाला हात लावता येतो पण जर जास्त आगावूपणा केला तर वाघ "ए हा बघा ना मला त्रास देतोय" असे सांगत नाही...वाघ डायरेक्ट मान पकडणार नैतर पंजा मारणार...टायगर टेंपलमधल्या कार्यकर्त्यांचा वास वाघांना ओळखीचा असतो त्यामुळे त्यांना वाघ काही करत नाही परंतु आपण मात्र पहिल्यांदाच गेलेलो असतो...तस्मात काळजी घेणे जवळपास संध्याकाळचे ६:३०-७:०० होतात परतायला मग संध्याकाळी लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका कम शॉपिंग...खाओसान रोडला लागूनच खाउगल्ली आहे रात्र्र रात्री खाओसान रोडवर जीवाचे बँकॉक करावे :) ------------------------------------------------------------------------------------------------------------- २ रा दिवस (T+२ day) बँकॉक ------------------------------------------------------------------------------------------------------------- चालत चालत Grand Palace + Sleeping Golden Budhdhaa + जवळची ३-४ टेंपल...५-६ तासात आरामात होते पाहून (इतके चालणे नसेल जमत तर Grand Palace थोडा कमी फिरावा अथवा सरळ बँकॉक सिटी टूर बुक करावी)...सगळ्या जागा एकमेकांपासून चालत ५-१० मिनिटांच्या अंतरावर आहेत...सकाळी ८:३० ला निघून नाश्ता बाहेरच करून निघालेले उत्तम...संध्याकाळी लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका कम शॉपिंग...रात्री फुकेतला जाणार्या ट्रेन / बस मध्ये झोपून जावे. ट्रेनचे तिकिट भारतातून बुक करता येत असेल तर तसे करावे कारण तिकिटे फार लवकर संपतात. ------------------------------------------------------------------------------------------------------------- ३ रा + ४ था + ५ वा दिवस (T+३, T+४, T+५ day) फुकेत ------------------------------------------------------------------------------------------------------------- हा दिवस पुर्णपणे तुमचा...फुकेत पायी फिरा...पॅटाँग बीचला वोटरस्पोर्ट करा...बांग्ला रोड + मार्केट...सगळे अगदी लागून आहे...फुकेताला २ समुद्रकिनारे आहेत (२ विरुध्ध बाजूंना)...दोन्ही बाजूंसाठी वेगवेगळ्या Island hopping बोट टूर असतात...दोन्ही साठी बुकिंग करा :) क्राबीला जाणार असाल तर त्यासाठी सकाळी लवकरच्या बसचे बुकिंग करा...फक्त आणि फक्त सकाळची लवकरचीच बस घ्यावी...फुकेत ते क्राबी हा ३ तासांचा प्रवास अगदी गुळगुळीत रस्त्यांवरून आणि मुख्य म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणार्या रस्त्यावरून होतो :) फुकेत मध्ये एकाच Island hopping बोट टूर करणार असाल तर ज्या मध्ये "माया बे" आणि "Twin island" असतात ती टूर करा फुकेत मध्ये १ दिवस वाचवायचा असेल तर मग बँकॉकमधूनच फ़ुकेतच्या टूरचे बुकिंग करून ठेवा आणि ज्या दिवशी फुकेतला पोचाल त्या दिवशी एक Island hopping बोट टूर करा...पॅटाँग बीचला वॉटरस्पोर्ट त्याच दिवशी संध्याकाळी (उजेड असे पर्यंतच) करता येतील मुख्य सुचना - बांग्ला रोडवर लहान मुलांना बरोबर नेऊ नका ;) ------------------------------------------------------------------------------------------------------------- ६ वा दिवस (T+६ day) क्राबी ------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळी क्राबीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारे नजारे डोळ्यात साठवून घ्यावे...फ़ोटो काढायचे भान रहात नाही :)...क्राबी मध्ये पोचल्यावर फक्त आणि फक्त आराम...लोकल मार्केट मध्ये फिरावे :) क्राबीमध्ये चुकुनही Island hopping बोट टूर करू नये...फुकेत मधून आणि क्राबी मधून एकाच टैपच्या टूर असतात कारण फुकेत आणि क्राबी हे एकाच समुद्राच्या विरुध्ध बाजू आहेत :) क्राबी मध्ये बघण्यालायक टूर करावी ती एकाच "Ton Sai beach" (http://matadornetwork.com/trips/15-places-to-see-bioluminescence-pics/) फमिलीसाठी थायलंड इतकेच ;)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38202 views

💬 प्रतिसाद
ट
टवाळ कार्टा Fri, 04/13/2018 - 21:34 नवीन
अरेरे...मिपा परंपरेला धरून इथेही वैयक्तीक प्रतिसाद सुरु झाले...ज्जा तुम्हाला "तसल्या" थायलंडचा योगच नै येणार.......ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा