Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दंतकथा

अ — अनन्त्_यात्री, Sat, 04/07/2018 - 13:35
गचपानात दडलेल्या फुटक्या बुरुजाखाली पोटार्थी गाईड सांगतोय : ही तेजतर्रार नावाची तोफ वापरून अमुक सैन्याने तमुक सैन्याच्या अमुक इतक्या सैनिकांना एका क्षणात घातले कंठस्नान वर्तमानाच्या विवंचना विसरून डोळे विस्फारलेल्या गर्दीला दिसू लागतंय गाईडने न गायलेल्या पवाड्यातल्या दंतकथेचं सोनेरी पान : (रण स्थंडिल हे धगधगते रणचंडी तांडव करिते उकळते रक्त जणू लाव्हा कळिकाळा घाम फुटावा टापांची उडते धूळ रणभेरी करी कल्लोळ तळपती वीज - समशेर गनिमाची नाही खैर विजयाचा अविरत डंका कानावर येतो, ऐका मृत्यूही थिजूनी जावा वीरांनो मुजरा घ्यावा धड धडाड गर्जे तोफ युद्धाचा चढता कैफ धड धडाड गर्जे तोफ युद्धाचा चढता कैफ) गर्दीचा चेहरा हरवतोय रोमारोमात भूतकाळ भिनून धूसरतोय गर्दीचा वर्तमान गारुड पडलेल्या आईबापांचा हात सोडून तोफेकडे एकटक बघताना त्या लहानग्याला मात्र दिसतायत फक्त तोफेच्या अवजड बत्तीझाकणावरची ओतीव पोलादात नजाकतीने घडविलेली दोन टवटवीत फुलं अन मधे एक कोवळं पान

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1969 views

💬 प्रतिसाद
स
सत्यजित... Sat, 04/14/2018 - 01:48 नवीन
क्लास,क्लास्संच!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 04/14/2018 - 19:08 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/15/2018 - 15:33 नवीन
सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rasputin... [ with Lyrics ] :- Boney M
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 04/16/2018 - 16:26 नवीन
वाह! अतीव सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 04/21/2018 - 09:50 नवीन
प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा