Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हे ही खरंय !

फ — फिझा, Fri, 04/06/2018 - 14:33
हे ही खरंय ! मनात नेहमी तीच हुरहूर काहूर करून टाकणारी ! तीच आठवण मन व्यापून टाकणारी , रोज आठवण काढायलाच हवी ....... असं नाहीये खरं तर पण रोज आठवण येते ..... हे ही खरंय ! पाण्याने वाहतं असलं पाहिजे त्याने सगळं पुसलं गेलं पाहिजे डोळे, मन, अंगण, आभाळ ते नेहमी भरून वाहीलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर पण रोज आसवे भिजवून जातात ..... हे ही खरंय ! विरह विसरता आला पाहिजे, नवा डाव मांडता आला पाहिजे, आचारात, विचारात, वागण्यात, जगण्यात, नेहमी हसणं जमलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर पण रोज हसून फक्त क्षण साधायचे ...... हे ही खरंय ! प्रत्येक कविता रेखाटली पाहिजे , तुझ्या आठवणीने ती शहारली पाहिजे, वहीमध्ये कागदावर, ओळींवरच्या शब्दांवर नेहमी तू असलाच पाहिजेस ..... असंही नाहीये खरं तर पण तुझ्याशिवाय कविता अपूर्ण असते ... ...... हे ही खरंय ! बरीच वर्ष उलटून गेलीत .......असं आहे खरं तर आठवांचे क्षण पुसट झालेत ..... असंही आहे खरं तर तो आता वहीमध्ये बंद आहे ...... असंही आहे खरं तर पण वहीवर धूळ साचली तरी ........ वहीतली गोष्ट बदलत नाही ..... हे ही खरंय !! ------------फिझा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2091 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Fri, 04/06/2018 - 18:09 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्‍या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 04/06/2018 - 19:44 नवीन
चांगली आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/08/2018 - 10:23 नवीन
अह्ह्ह्ह्ह, सुरेख लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 04/08/2018 - 11:50 नवीन
दर्जेदार...
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 04/11/2018 - 10:31 नवीन
फिजा तूमची कविता म्हणजे मला माझा मनोगतच वाटतंय. सगळ्यांनी कविता वाचली असेल पण मी अनुभवली आणि छान वाटलं. अजुन नव्या कवितांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 04/14/2018 - 00:52 नवीन
>>>प्रत्येक कविता रेखाटली पाहिजे , तुझ्या आठवणीने ती शहारली पाहिजे, वहीमध्ये कागदावर, ओळींवरच्या शब्दांवर नेहमी तू असलाच पाहिजेस ..... असंही नाहीये खरं तर पण तुझ्याशिवाय कविता अपूर्ण असते ... ...... हे ही खरंय !>>> क्या ब्बात! कविता आवडलीच!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा