अधिजनुकशास्त्र - समारोप
मी आत्तापर्यंत जे काही किडुकमिडुक शिक्षण घेतले त्यात "असंबद्ध विचारांचा प्रतिवाद" या विषयाचा समावेश नव्हता त्यामुळे माझ्यामध्ये एक फार मोठे न्यून राहीले आहे याची मला जाणीव आहे.
माझे अनेक हितचिंतक व नातेवाईक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी कधीच मला माझ्या "delusions of grandeur " विषयी सांगितले नाही याचे मला आश्चर्य वाटते आणि आता तर राग आला आहे. त्यांच्यावर कोणत्या कायद्या अंतर्गत दावा दाखल करता येईल का, याचा शोध घेत आहे.
नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले. आता हे "सत्य" जर इथे किंवा भारतात कुठेही चर्चेला आले तर भारतीयांचा आय० क्यु० कमी का हा प्रश्न न विचारता, आय० क्यु० ही कल्पना कशी चूकीची किंवा भंकस आहे यावर भारतीय लोक रक्त आटवतील आणि निपचित पडतील.
सुमारे १९८४ च्या सुमारास पुण्याच्या गुडलक चौकात एक कम्युनिस्टांची सभा चालू होती. मी तिथून जवळून जात होतो तेव्हा एक वक्ता बेंबीच्या देठापासून संगणकाला शिव्या घालत होता. नंतर काय झाले हे इतिहासाला ज्ञात आहेच...
सध्या अधिजनुकशास्त्राला निकालात काढणारे सर्व विचारवंत नंतर कधीतरी "वेदातल्या मंत्रांमध्ये अधिजनुक बदल घडविण्याचे सामर्थ्य" असा संशोधन निबंध एखाद्या श्वेतकाय फिरंग्याने प्रसिद्ध केला की बाह्या सरसावून हेच भारतीय अधिजनुकशास्त्राला डोक्यावर घेतील, याची मला खात्री आहे.
त्यामुळे मिसळपाववरील सर्व वैयक्तिक हल्ले आणि इतर प्रतिक्रियांकडे मी बुद्धाच्या करूणामय दृष्टीने पाहतो, एव्ह्ढेच सांगून माझ्यासाठी हा विषय इथेच थांबवतो.
नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले.या ढोबळ विधानाला काही सबळ पुरावा आहे का ? असे गंभीर विधान करताना एखादा सबळ पुरावा असलेला दुवा देणे जास्त शास्त्रीय ठरले असते, नाही का ? असे ढोबळ विधान शास्त्रिय नसते याची नोंद घ्यावी. तसेच, रागाच्या भरात मनाचा तोल जाऊ देणे आणि असंबद्ध व उद्धट प्रतिक्रिया देणे शास्त्रिय प्रणालीत योग्य समजले जात नाही, याची आठवण करून द्याविशी वाटते. तुमच्या नावावरून तुमचे मूळ भारतिय आहे असे वाटते... म्हणजे वरचे विधान तुम्हालाही लागू होते किंवा कसे ? शिवाय, अनेक सहस्त्र वर्षे ज्या देशाने जगाला ज्ञान आणि बुद्धिवान माणसे पुरवली आहेत त्या आपल्या मायभूमीबद्दल असे विधान करणे कितपत समतोल विचार असून शकतो ? चला मी तुम्हाला एक जागतिक स्तरावरच्या IQ पाहणीचा दुवा देतो. त्यातले "भारताचे स्थान" आणि "शतकानुशतके जगभरातून बुद्धी आयात करण्यात अग्रगण्य असलेल्या यु एस ए चे स्थान" यांची तुलना करणे रोचक होईल. अर्थात, सर्व घटकांचा तौलनिक अभ्यास करून या दुव्यातील निरिक्षणांचा "स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स" समजून घेण्याइतपत तुमचे ज्ञान असल्याचा दावा तुमच्या लेखांमध्ये अनेकदा दिसला आहेच, तेव्हा ते काम मी करण्याचे धाडस न करता तुमच्यावरच सोपवत आहे. अजून काही उपयोगी दुवे...या फॉन्ट मधील विधाने श्री युयुत्सु यांची आहेत.अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान हे शीर्षक ( विज्ञान हे कधीच गैरसोयीचे नसते -सोय गैरसोय हा वैयक्तिक भाग असतो हि अतिशय मूलभूत बाब विसरून अभिनिवेश केला आहे) माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. हे सुरुवातीचे (पहिलेच) वाक्य. याचा अर्थ ""मलाच सत्य समजले आहे आणि बाकी कुणाला नाही"" असे म्हणणे आहे. तेंव्हा मी काय सांगतो आहे तेच सत्य आणि ते सांगण्याबद्दल मला सुळावर चढवले जाणार आहे हे समजूनही मी हे लिहिण्याचे धाडस करतो आहे म्हणजे मी किती हुच्च आहे असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे यानंतर या सगळ्या उपद्व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.) जन्माला येणार्या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. यात "गैरसोय कुणाची आणि का झाली" याचे कधीही स्पष्टीकरण नाही अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत. हे "भयजनक" वाक्य लिहिण्याचे कारण काय? आणि नंतर याचे विकृतीकरण हि करून झाले त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. वर श्री स्टीफन हॉकिंग यांचे उदाहरण दिले त्यांना स्वतःला साधा अधिजनुकीय नव्हे तर गंभीर जनुकीय आजार होता. पण उत्तम संतती होण्याकरता उपाय मुंबईसारख्या महानगरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलींशी लग्न न करणे प्रजननाचा हक्क सोडून द्यायचे आवाहन करायचे - बिजांडे लहान वयात गोठवून ठेवायचे तंत्रज्ञान विकसित करायचे.-- कुणी कसे आणि कधी? याबद्दल सोयीस्कर मौन डीएनए मॅचिंग --याची किंमत आज रुपये २५,००० आहे मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आहे यात १० लाख प्रजननक्षम जोडपी असतील तर डीएनए मॅचिंगचा खर्च अडीच हजार कोटी रुपये येईल हा खर्च कुणी करायचा? सरकारने कि लोकांनी? तुम्हाला ताजे प्रतिसाद पहाता अधिजनुकीय संक्रमण आणि जनुकीय संक्रमण यातला फरक तुम्हाला कळलेला नाही किंवा तो मान्य करायचा नाही असे दिसते, त्यामुळे मला आता तुमच्याशी युक्तीवाद करण्यात रस संपत आला आहे. तेव्हा मिसळपाववर हा विषय हाणून पाडायचा जरी कितीही प्रयत्न झाला तरी ते चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल याची मला खात्री आहे. मिसळपाव वर हा विषय हणून पडायचा कुणाचाही हेतू नाही पण श्री युयुत्सुंनी केलेले अतिरंजित आणि हास्यास्पद दावे बेफाट विधाने आणि भयजनक वाक्ये मात्र पुराव्यासकट खोडून काढायचा हेतू मात्र नक्की आहे इथल्या थयथयाटवीरांनी जिवाच्या आकांताने मी कसा चुकलो आहे हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला, पण त्यांना अधिजनुकशास्त्र काय कळलं आहे, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची! मला वैद्यकीय जगतात डॉक्टरांचे दोन प्रमुख प्रकार आढळले आहेत - १ला प्रकार लोकांना शहाणे करण्यासाठी झटतो. २र्या प्रकारातले डॉ. लोकं अडाणीच राहावेत याबाबत आग्रही असतात. तुम्ही मला या दूसर्या प्रकारातले दिसता. अधिजनुकशास्त्र बहुधा तुम्ही ऑप्शनला टाकले असावे. आम्ही "किडकी प्रजा" जन्माला घालायची का? हा प्रश्न लोकांनी व्यवस्थेला विचारायला हवा. पण लेखाच्या सुरुवातीला कबूल केल्या प्रमाणे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा उद्योग मी केला असल्याने मला सुळावर चढवले जाइल याची मला कल्पना होतीच. हे प्रतिसाद/ लिखाण पहिल्या भागातीलच आहे. यात दर्पोक्तीपूर्ण उद्गार, मलाच सगळं समजतं दुसरे मूर्ख आहेत असा अविर्भाव आणला नसता आणि सनसनाटी आणि भयगंड निर्माण करणारी वाक्ये लिहिली नसती तर लोकांनी लेख नक्कीच स्वीकारला असता. मी पाठवलेल्या बहुसंख्य दुव्यांना किंवा प्रश्नांना त्यांनी सोयीस्कर बगल दिली आहे. पुढच्या भागातील अतिशयोक्ती आणि विरोधाभास बद्दल नंतर सविस्तरपणे.