Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

II तिने पेन मागितलं, मी हात दिला II

ख — खिलजि, Tue, 04/03/2018 - 14:50
तिने पेन मागितलं मी हात दिला तिने शिवी घातली मी स्माईल दिली ती धावून आली मी मिठीत घेतली ती शांत झाली हळूच प्रेमात पडली आधी मी वेडा होतो आता ती पण झाली माझी गांधीगिरी प्रेमात कामी आली आता ती हात मागते मी पेन देतो मी शिवी घालतो ती स्माईल देते मी धावून जातो ती मिठीत घेते प्रेम हे असं गड्या हळूहळू होते सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5714 views

💬 प्रतिसाद
आ
आदूबाळ Tue, 04/03/2018 - 14:59 नवीन
विडंबन पोटेन्शियल अ‍ॅलर्ट!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/04/2018 - 16:43 नवीन
काही विशिष्ट आयडीच याला न्याय देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 04/03/2018 - 15:40 नवीन
II तिने पेन मागितलं, मी हात दिला II
. नशीब 'हातंच' दिला ...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/03/2018 - 16:02 नवीन
--------------------------- कुणीतरी पेन मागितलं मी हात दिला कुणीतरी लेखणी मागितली मी लेख दिला --------------------------- हाय रे कर्मा! -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/03/2018 - 18:57 नवीन
सुंदर कच्चा माल !
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 04/03/2018 - 19:24 नवीन
कविता टाकायची घाई करू नका. चांगले लिहाल.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 04/04/2018 - 10:15 नवीन
चला दिवस सार्थकी लागला .... मस्त मजेशीर अभिप्राय आलेले आहेत ... धन्यवाद मित्रानो .. मार्कस तुलापण धन्यवाद मित्रा ... या गरीबाची कविता वाचल्याबद्दल ... तू उगी उगी बोललास आणि गाढ झोपलो होतो बघ ... छान वाटलं ... अजून अभिप्राय आले तर अजून बरं वाटेल ... हे असे येणारे अभिप्राय मला माझ्या पुढील लेखनास सदैव उद्युक्त करत आले आहेत ... मित्रानो या गरिबाला जर शिरीमंत करायचे असेल तर अजून कशाची नाही पण अभिप्रायांची ( विखारी असले तरीही ) नितांत गरज आहे .. मला वाटत प्रत्येक कवीला ,, त्याने केलेल्या कल्पनेला तो दिलेला पुरस्कारच असतो ... धन्यवाद .... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/04/2018 - 22:35 नवीन
ढण्यवाड ढण्यवाड !! सूर म्हणतो साथ दे | दिवा म्हणतो वात दे | मिपावरच्या कवीराजांना| रोज नवा प्रतिसाद दे || =))))
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 04/05/2018 - 03:18 नवीन
ती म्हणते पेन दे | मी म्हणतो हात घे | देवा महाराजा सिद्धेश्वरा | रोज नवीन कविता दे ||
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 04/05/2018 - 06:30 नवीन
घडवलेल्या शिष्याला ( तिथी पेष्षल) बोलाविले पहिजे, याचं महाकाव्य निर्माण करण्यासाठी. कवी का काकवी या अनियतकालिकाच्या "रतीबाच्या सुरनळ्या" या अग्रलेखातून साभार
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 04/05/2018 - 07:10 नवीन
कोण हे मी (बि)घडवलेले शिष्य? तिथी पेष्पल?
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 04/05/2018 - 10:32 नवीन
योग्य, सगळ्या तिथी, वार लावूनच हजर असायच्या त्यांचे समोर मिपा वारकरी नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 04/05/2018 - 04:30 नवीन
तिने डिंक मागितले, मी भात दिला तिने कामटी तासली, माझा ताव खुला तिने सुत्तर बांधली, मी लेपटी लावली तिनं काच कुटली, मी सरस मुठीत घेतली ती गोत मारू लागली, मी रीळ सोडला लफ्फुगिरीचा लप, तिला पाहून मी हापसला ती मछली झाली, हळूच मौज दिली आधी गिड्डा होतो, नंतर माझी कंन्नी ढपला भोवऱ्यासारखं गिरक्या मारत, पतंग माझा कटला
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 04/05/2018 - 07:29 नवीन
मस्त बदवलात तुमचा पतंग :)
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 04/05/2018 - 10:11 नवीन
जबर्दस्त अभिप्राय ... धन्यवाद मित्रानो .....
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 04/05/2018 - 10:14 नवीन
कवी कोण म्हणाले ? दिसत नाही का तुमाले मी तर हात आधीच दिले ,,उडविण्यास पतंग ओंगळ भोंगळ दिसे तुम्हांसी कल्पनाच आम्ही करतो ऐसी दुसर्याची भावना चाळावयासी जेणे राहावे अभिप्रायांत सारे दंग लिहावे ऐसे कि वाचल्यावाचून कुणी न राहावे जे जे घडते,, ते रोज बघावे , रोज लिहावे का लिहावे वृत्तांतुनी ,, घेऊनि अलंकार सारे ? जाहलो गुणवंत ( मार्कस ) आम्ही ,, तुम्ही बिचारे... तुम्ही बिचारे घडवतो आम्ही ,, नाही शिष्य कुणाचे गुरु तोच बैसला एक, वर झळाळणारा , दास्यत्व फक्त त्या रामाचे कुणा रोम प्यारा,, तर कुणा अभिप्राय कुणी दास विडंबनाचा तर कुणी करे उद्युक्त ओढण्यास पाय हा सूड असे कि अजुन दुसरे काय ? सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/05/2018 - 22:32 नवीन
खिलजी, बाकी कायपण म्हणा, अखेरीस येणारं तुमचं नाव कवितेचाच एक भाग वाटतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/06/2018 - 14:57 नवीन
आ न गा पै ''' हे सोडा आत्ता,, नावासहित दुसरी कविता वाचा ... अभिप्रायाची वाट बघतोय .... बादवे चैत्र पौर्णिमेला काय केलेत ? हनुमंताचे दर्शन घेतलेत कि नाही .... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/06/2018 - 17:07 नवीन
अहो, मी नम्र माणूस आहे. कळायला नको का लोकांना? ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा