Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

लेक...

व — विशाल कुलकर्णी, Mon, 04/02/2018 - 18:08
सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी वृत्त : लवंगलता ( मात्रा : 8 8 8 4 ) © विशाल कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3933 views

💬 प्रतिसाद
र
रातराणी Tue, 04/10/2018 - 21:20 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 04/11/2018 - 06:54 नवीन
तुमच्या परी सारखीच गोड कविता. असाच तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा :)
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 04/11/2018 - 08:42 नवीन
खुपच सुरेथ गुंफलीय कविता
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/11/2018 - 17:22 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 04/12/2018 - 07:15 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/12/2018 - 10:57 नवीन
अरे ही गोडूली कविता वाचायची कशी काय राहिली? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 04/12/2018 - 13:08 नवीन
अनुभुती कन्येशिवाय अपूर्ण आहे सुरेख नाखु
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 04/12/2018 - 13:32 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/12/2018 - 16:32 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा