Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गणपत वाणी, सतत मागणी

श — शिव कन्या, Mon, 04/02/2018 - 14:28
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा! अरे बापरे, आई गं असं म्हणत गर्दी गोळा होईल. मग कवितेचा खप होईल. .....आणि तिचा खप झाल्याशिवाय तुला बिड्या कुठून मिळणार?' 'मालकाचं बरोबर होतं. मालकाचं नेहमीच बरोबर असतं... तर एकूण सगळं असं आहे......' मी विचारलं, 'ठिक गणू, पण काढून फेकलेले अलंकार परत का गोळा करतोयस?' काडीने दात कोरत हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला, 'काळ बदलेल, मालक बदलेल, सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील, तेव्हा, हा गणपत वाणी कविता झटकून अलंकार विकेल....' मी त्याच्याकडे पहात राहिले.... इतक्यात, 'आलो मालक' म्हणत गणपत वाणी कविता खांद्यावर टाकून निघून गेला. शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10150 views

💬 प्रतिसाद
न
नाखु Mon, 04/02/2018 - 16:35 नवीन
(धूर)काडीची कविता. कोपर्यावरचा वाचक नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 04/02/2018 - 16:59 नवीन
अलंकाराच्या शोधार्थ फिरणारे अनेक वेडे कवी निर्माण होवोत! आमेन! Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 04/02/2018 - 21:01 नवीन
रूपके आणि चेतनगुणोक्ती छान वापरले आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/09/2018 - 06:24 नवीन
वाह, मस्तच ! एका वेगळ्या प्रकारचा उपहास !
सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील,
हे भारीय !
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 04/10/2018 - 21:27 नवीन
खूप आवडली!!
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 04/11/2018 - 06:50 नवीन
तुमच्या कविता खूप वेगळ्या असतात, लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Wed, 04/11/2018 - 08:01 नवीन
मस्तच कविता आहे. खूप आवडली.
काडीने दात कोरत हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला, 'काळ बदलेल, मालक बदलेल, सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील, तेव्हा, हा गणपत वाणी कविता झटकून अलंकार विकेल....
आहा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/11/2018 - 17:21 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 04/14/2018 - 01:06 नवीन
ज ब र द स्त!
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 04/17/2018 - 04:22 नवीन
फारच सुंदर आणि मजेदार कविता आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/17/2018 - 11:29 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा