घुंगरू
पायातल्या घुंगरानी मला विचारले ….
“खरे खरे सांगशील? ...तू नाचतेस की मी नाचतो ?
तूच नाचतेस तर माझी जरुरी काय ?
जर मीच नाचतो तर तुझा उपयोग काय ?
केव्हा केव्हा अशीच श्रांत उगाचच बसलेली असतेस …
माझ्याकडे नजर जाताच …
सारी सारी फुलून येतेस !
माझ्यासवे तू आणि तुझ्यासवे मी ..
मग नाचच नाच होतो …
तू तू नसतेस ..मी मी नसतो …..”
प्रश्न माझेच घुंगरानी विचारलेले ….
नाच होतो तेव्हा नेमके काय होते ?
मी आणि घुंगरू ...दोघे असतो ही आणि नसतो ही ..
दोघे मिसळून जातो …
एकच एक ….फक्त नाच जन्मतो .
सारे प्रश्न गळून जातात ..
उत्तरे मग असतच नाहीत .
असेच केव्हातरी मग मला समजते …घुंगरांच्या प्रश्नांचे उत्तर ...
नाचणारा आणि नाचवणारा खरे तर एकच असतो …
आरश्या पुढे ठेवलेला दुसरा आरसा ..
काहीच खरे नाही आणि काहीच खोटे नाही !
माझ्याशिवाय घुंगरू निर्जीव ...कोपऱ्यातील अडगळ ..
आणि घुंगरू नसतील तर माझ्या कलेचा अविष्कार नाही !
💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप
Mon, 04/02/2018 - 12:56
नवीन
शेवटच्या दोन ओळी नसत्या तरी चाललं असत असं माझं मत!
Sandy
- Log in or register to post comments
J
Jayant Naik
Tue, 04/03/2018 - 06:21
नवीन
लिहिताना लिहिल्या पण आता तुम्ही म्हणताय ते पटते आहे.
- Log in or register to post comments
S
Sanjay Uwach
Tue, 04/03/2018 - 08:57
नवीन
कविता आवडली
- Log in or register to post comments