Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

य
युयुत्सु
Mon, 03/19/2018 - 10:53
💬 151 प्रतिसाद
माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील. आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो. पशुपालनात जास्तीतजास्त दूध देणार्‍या गाईम्हशी, कुक्कुटपालनासाठी जास्तीत जास्त अंडी देणार्‍या कोंबड्या मिळाव्यात यासाठी सर्व जनुकीय तंत्रज्ञान पणाला लावतो. नुकतेच एका प्रसिद्ध दुग्ध उत्पादकाच्या जाहिर मुलाखतीत असे कळले की म्हशीला हमखास म्हैसच होईल असे (म्हणजे लिंगनिश्चितीचे) तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. या सगळ्या उपद्‍व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.) मला जे गैरसोईचे सत्य सांगायचे आहे, ते समजण्यासाठी प्राथमिक जीवशास्त्राची उजळणी आवश्यक आहे. सर्व लैंगिक प्रजोत्पादन करणार्‍या जीवांमध्ये जेव्हा मादी गर्भ धारण करते तेव्हा अर्धी गुणसुत्रे (केंद्रकाम्ले) नराकडून शुक्रजंतुच्या मार्फत आणि अर्धी गुणसूत्रे स्त्रीकडून बीजांडाच्यामार्फत येतात आणि गर्भधारणेच्या वेळेला संयोग पावून गर्भ वाढायला सुरुवात होते. यात महत्त्वाचा आणि धक्कादायक पुढे आहे. सध्याच्या काळात शिकून नोकरी करणार्‍या स्त्रिचे लग्नाच्या वेळी सरासरी वय २८-३० असते. म्हणजे आज जन्माला आलेल्या मुलाचे बीजांड त्याच्या आईचा गर्भ तयार होत असताना (तिच्या आजीच्या गर्भधारणेच्या वेळी) तयार झालेले असते. म्हणजे आईकडून मिळणारा जनुकीय वारसा सुमारे ३०वर्षे या जगात अस्तित्वात असतो. त्यात मुंबई, कलकत्ता सारख्या बकाल शहरांमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या आईच्या पोटातील बीजांडांवर तेथील प्रदूषण आणि जगण्याचा संघर्ष यामुळे केंद्रकाम्लावर घातक परिणाम होण्यास सुरुवात होते आणि अत्यंत संथपणे बीजांडे किडायला सुरुवात होते आणि सदोष संततीसाठी कारणीभूत ठरते. गर्भधारणेपूर्वी आईला धूम्रपान आणि मद्यपान यांचे व्यसन असल्यास याची गंभीरता अधिक वाढते. यातील काही सदोष संतती नैसर्गिक गर्भपाताच्या रुपाने बाहेर टाकली जाते. पण ते जन्माला येणार्‍या सर्वच जीवांच्या बाबतीत होत नाही आणि काही व्याधी किंवा दोष जन्मत:च घेऊन बाळ जन्माला येते किंवा काही दोष पुढे उत्तर आयुष्यात व्याधींना जन्म देतात. जन्माला येणार्‍या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. शुक्रजंतूवर पण ताण आणि प्रदूषणाचे परिणाम होतच असतात आणि प्रजननाची समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे अधुनमधुन वाचायला मिळणार्‍या बातम्यांमुळे कळते. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत... सजीवांच्या पेशीतील केंद्रकाम्लाचा शोध १९५३ मध्ये लागला, त्यानंतर पेशीविज्ञानात अधिकाधिक प्रगतीच होत राहीली. संपूर्ण मानवी जनुकसंचाचे तसे़च पेशीकेंद्रकाच्या अंतर्रचनेचे रहस्य शास्त्रज्ञानी आता उलगडले आहे. पेशीच्या केंद्रकामध्ये केंद्रकाम्लाच्या लडी तयार झालेल्या असतात. हिस्टोन या प्रथिनांभोवती एखाद्या रिळाप्रमाणे केंद्रकाम्लाचे वेढे बसलेले असतात. हे वेढे बसण्याची कारणे गमतीदार आहेत - पेशीतील केंद्रकाम्लाची जर नुसती साखळी उलगडली (जिला इंग्लिश्मध्ये क्रोमॅटिन म्हणतात) आणि तिची लांबी मोजली तर ती सुमारे २ मीटर इतकी भरते. आता इतकी मोठी साखळी एका पेशीच्या सूक्ष्म केंद्रकामध्ये बसवण्याचे काम निसर्ग मोठ्या हुशारीने करतो. हिस्टोन हे धनभारित अल्कली गुणधर्माचे प्रथिन असते तर केंद्र्काम्ल ऋणभारित असते. हीस्टोन प्रथिनांना शेपट्या असतात. केंद्रकाम्लातील जनुक, हिस्टोनच्या शेपट्याना कोणते रेणू चिकटतात यावर ते सक्रिय होणे अथवा निष्क्रीय होणे अवलंबून असते. हिस्टोनच्या शेपट्याना सहसा मेथिल, ऍसिटील आणि फोस्फोरिल रेणू चिकटतात. या प्रथिनांभोवती गुंडाळले गेल्यामुळे केंद्रकाम्लाची लांबी आपोआप बरीच कमी होते आणि ते पेशीच्या केंद्रकात व्यवस्थित बसते. हीस्टोन प्रथिनांचे चार मुख्य प्रकार आहेत. ते h1, h2 h3 आणि h4 या सांकेतिक नावांनी ओळखले जातात. हिस्टोनच्या शेपट्याना कार्बन आणि नायट्रोजन यातील एका बाजुला कार्बनचा अणु आणि दूसर्‍या बाजुला नायट्रोजनचा अणु असतो. नायट्रोजनचा अणु असलेली शेपटी जरा लांब असल्याने ती केंद्रकाम्लाच्या हिस्टोनभोवती तयार झालेल्या गुंडाळीतून बाहेर डोकावते. ही हिस्टोन प्रथिने एखाद्या कळीप्रमाणे (स्वीच) जनुकांना सक्रिय, निष्क्रिय करण्याचे काम करतात. गर्भधारणेच्यावेळी आद्य पेशीमध्ये जेव्हा मातेचे आणि पित्याचे केंद्रकाम्ल संयोग पावते तेव्हा या लडीं हिस्टोनसह नवीन जिवामध्ये संक्रमित झालेल्या असतात. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पित्याकडुन फक्त केंद्रकाम्लाची अर्धी साखळी शुक्रजंतू वाहून आणतात. हिस्टोनची देणगी मात्र आईकडूनच मिळते. पित्याकडून जेमेतेम १०% हिस्टोन मिळतात. आपले पर्यावरण, अन्न आणि जगण्याचा संघर्ष जनुकीय पातळीवर दूरगामी बदल घडवून आणतात, हे सांगणार्‍या अधिजनुकशास्त्राची मुहूर्तमेढ कोनरॅड वॅडींग्टनच्या संशोधनातून 1942 मध्ये रोवली गेली. तेव्हापासून या शाखेची वाढ वेगाने होत असून दरवर्षी प्रसिद्ध होणार्‍या संशोधन निबंधांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. आईवडिलांच्या आणि आईच्या आईच्या जीवनशैलीचे संततीवर जनुकांमार्फत कायमस्वरूपाचे दूरगामी परिणाम होतात, हा अधिजनुकशास्त्राचा महत्त्वाचा संदेश आहे. त्याच बरोबर आपले पर्यावरण, जीवनशैली आपल्या जनुकांना अधिजनुकीय बदलांद्वारे नियंत्रित करते. शारीरिक व्यंगापासून कर्करोगासारख्या गंभीर व्याधीपर्यंत अधिजनुकीय बदलांचा प्रभाव कारणीभूत ठरतो. नुकतेच दिवंगत झालेले विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग आणि अनेक विद्वान मानवजातीच्या भवितव्यबद्दल धोक्याचे इशारे देत आहे आणि अधिजनुकशास्त्रातील संशोधन या इशार्‍यांना पुष्टी देत आहे. विज्ञानप्रसाराला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती आणि संघटना याबाबत मूग गिळून गप्प आहेत. आपले जनुक आपल्या कर्तृत्वाचे कारण आपण आजवर मानत आलो आहोत. पण हे जनुक कार्यान्वित होणे अथवा निष्क्रिय होणे हे आपली जीवनशैली आणि पर्यावरण यावर अवलंबून असेल. त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 48698 views

💬 प्रतिसाद (151)
स
सुबोध खरे Wed, 03/21/2018 - 15:27 नवीन
@युयुत्सु पूर्वग्रह --या सगळ्या उपद्‍व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.) स्त्री भ्रूण हत्येसाठी एवढा कायदा करावा लागला आहे. मुलगाच हवा म्हणून गर्भ लिंग तपासणी साठी हवे असलेले अनेक उपाय योजल्यामुळे भारतात १००० मुलांच्या मागे ८५० मुली आहेत. एकांगी दृष्टिकोन --- मलाच हा विषय समजला आहे. बाकी कुणाला समजला नाही आणि जे प्रतिवाद करतील त्यांना हा विषय मुळातच समजलेला नाही उदा . मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. जन्माला येणार्‍या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. हा फक्त इतकाच भाग आपण लिहिला आहे याची दुसरी बाजू पण पाहून घ्या. Children inherit new mutations when they build up in the father’s sperm and the mother’s eggs. Men pass on more mutations than women because they make sperm throughout their lives, using a process that is not perfect at copying DNA. And so, as the man ages, his sperm accumulate more and more mutations. Women pass on fewer mutations because they tend to be born with their full complement of eggs. Researchers studied 14,000 Icelanders and found that men passed on one new mutation for every eight months of age, compared with women who passed on a new mutation for every three years of age. The figures mean that a child born to 30-year-old parents would, on average, inherit 11 new mutations from the mother, but 45 from the father. https://www.theguardian.com/science/2017/sep/20/fathers-pass-on-four-times-as-many-new-genetic-mutations-as-mothers-study
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 03/23/2018 - 11:06 नवीन
मलाच हा विषय समजला आहे. बाकी कुणाला समजला नाही आणि जे प्रतिवाद करतील त्यांना हा विषय मुळातच समजलेला नाही
असं मी कधी केव्हा आणि कुठे म्हटले?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/21/2018 - 15:49 नवीन
प्रथम माझ्या मूळ मुद्याला बगल देऊन तपशीलात दूरुस्ती केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत. हे आपलेच वाक्य आहे ना? युयुत्सु साहेब हा युक्तिवाद आपल्याला वाटतो तितका हास्यास्पद नाही. उकळत्या पाण्यात नियमितपणे जगणारे जिवाणू आहेत आणि त्यासाठी बदलाभिमुखता (ADAPTABILITY) त्यांनी आत्मसात केली आहे. हे मी लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/21/2018 - 15:53 नवीन
काही आघातांचे (ट्रॉमा) परिणाम पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात. याला काही आधार? का आपलं असंच? बाकी ४८ पिढ्या(३० वर्षाची एक पिढी) सुंता करूनही मुसलमानांची पुढची त्वचा अजूनही येतेच आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 03/22/2018 - 04:27 नवीन
याला काही आधार? का आपलं असंच? "Results suggest that traumatic stress is associated with advanced epigenetic age and raise the possibility that cells integral to immune system maintenance and responsivity play a role in this. This study highlights the need for additional research into the biological mechanisms linking traumatic stress to accelerated DNA methylation age and the importance of furthering our understanding of the neurobiological and health consequences of PTSD." https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/29452766
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 04:52 नवीन
काय पण डोंगर पोखरून उंदीर काढलाय? PTSD म्हणजे posttraumatic stress disorder मुळे पेशींचे वार्धक्य जवळ येते यावरील हे अतिशय प्राथमिक असे संशोधन आहे. त्यातून PTSD म्हणजे posttraumatic stress disorder असणारे लोक सामान्य नव्हेत तर युद्ध, यादवी, नैसर्गिक आपत्ती यातून गेलेल्या लोकांना होणाऱ्या अति मानसिक तणावातून निर्माण झालेली परिस्थिती. अशी परिस्थिती काही मुंबई आणि कलकत्ता या शहरात नाही. ( तशी ती आहेच असा तुमचा आग्रह असेल तर गोष्टच वेगळी आहे) PTSD म्हणजे posttraumatic stress disorder याचा गुणसूत्रांवरील प्रभाव आणि ते पुढच्या पिढीत संक्रमित होण्याबद्दल एक अवाक्षरहि नाही त्यातून एकदा त्या माणसाने पुनरुत्पादन केले (त्याला/ तिला मुले झाली असली) कि डी एन ए वर होणारा प्रभाव हा भावी पिढीसाठी नगण्य/शून्य असतो. शोधायचा म्हटलं तरी संबंध सापडत नाहीये
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Wed, 03/21/2018 - 19:33 नवीन
@युयुत्सु यावर सविस्तर उत्तर उद्या देतो वेट
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/21/2018 - 12:56 नवीन
एक मिन.. लेखात पहिल्याच मुद्द्यावर ठेचकाळले.. उत्तर कुणाही डॉकटर ने द्यावं अशी इच्छा आहे. जसं आम्हाला शिकवलं आहे (आणि मी विकिपीडियावर पण एकदा वाचलं परत) , दर महिन्यात नवे बीजांड तयार होते आणि गर्भाशयात येते, ह्यास ओव्ह्यूलेशन म्हणतात. पुढे ते फर्टिलाईज न झाल्यास ते नष्ट होऊन पाळी येते. ह्या प्रत्येक फेजला नावे आहेत आणि विशिष्ट हार्मोन्स मुळे हे घडते. जर हे योग्य असेल तर आजीचे बीजांड कुठून आले आता? आणि जर हे योग्य नसेल तर योग्य त्या संदर्भा सहित लेखकाने नक्की काय होते हे समजावून सांगावे.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 03/21/2018 - 13:24 नवीन
स्त्रीगर्भ जन्माला येतानाच काही हजार (किंवा लाख) बीजांडे ओवरीजमध्ये घेऊन येतो. ती सर्व अपरिपक्व असतात. मुलगी 'मोठी' झाल्यावर दर महिन्याला एक बीजांड परिपक्व होऊन फॅलोपिअन ट्यूबच्या मुखापाशी येते. जर योग्य कालावधीत त्याचा शुक्राणूंशी सयोग झाला तर ते फलित होऊन गर्भाशयाच्या भिंतीवर रुजते आणि पुढे काही अडथळा न आल्यास वाढून मूल जन्माला येते. म्हणजे बीजांडे ही स्त्रीगर्भात आधीच तयार असतात.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 03/21/2018 - 13:37 नवीन
ही बीजांडे फॉलिकल्समध्ये असतात. योग्य वेळी मेंदूतून काही रासायनिक क्रियांद्वारे मिळालेल्या संदेशांनुसार त्या क्रियांमुळे एक बीजांड (फॉलिकल रप्चर होऊन) पेरिटोनिअल कॅविटीमध्ये निसटते. फॅलोपिअन ट्यूबमध्ये शिरून युटेरसमध्ये पोचते आणि फलित झाल्यास रुजते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/21/2018 - 13:43 नवीन
अच्छा! हे खरं तर फार पूर्वी वाचलं होतं कुठे तरी असं वाटतंय! पण मी बीजंडा मधून जनुकीय दोष येतात तसे शुक्राणू मधून येऊ शकत नाहीत का? भले त्यातल्या त्यात सर्वोत्तम शुक्राणू पुढे जात असला तरी तो दोषी जनुके पुढे नेऊ शकतोच ना? (म्हणजे सगळ्याच शुक्राणू मध्ये दोष असेलच असे) तसेही आपण मागच्या सात पिढ्यांमधले गुण दोष मुलात येतात असे म्हणतोच ना. ते दोन्ही बाजूने अपेक्षित असेल असे मला वाटते. बाकी सदृढ पिढी जन्माला यावी ही इच्छा योग्य असली तरी "किडकी" प्रजा वगैरे शब्द आवडले नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 03/21/2018 - 14:30 नवीन
पिरा,
हे खरं तर फार पूर्वी वाचलं होतं कुठे तरी असं वाटतंय!
माबोवर डॉक्टर सातींच्या लेखात असेल : https://www.maayboli.com/node/34504 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 03/21/2018 - 17:25 नवीन
ही माहिती अगदी बेसिक आहे. ' सजीवांमधील पुनरुत्पादन' शिकवताना मानवी पुनरुत्पादनसुद्धा माध्यमिक शाळांत वरच्या इयत्तांत शिकवले जाते. विज्ञानशाखेच्या पहिल्या वर्षात तर नक्कीच असते. अर्थात सातीआक्कांनी वैद्यकसंबंधी अनेक विषयांवर उत्तम असे माहितीपूर्ण लिखाण केले आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 03/21/2018 - 13:51 नवीन
‘आधी करिअर मग मूल’ हे वाक्य आजच्या प्रगत युगाच्या स्रियांच्या तोंडून ऐकायला मिळतं. स्वावलंबी, प्रगत असणं ही उत्तम बाब असली तरी आपल्या प्रगत जीवनशैलीचा आपल्या प्रजनन क्षमतेवर काहीसा विपरीत परिणाम होत आहे. ज्यामुळे अनेक जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागतंय.
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/infertility/articleshow/54407323.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/21/2018 - 15:45 नवीन
‘आधी करिअर मग मूल’ याचा संबंध केवळ स्त्री पुरुषांच्या वयाशी आहे. पूर्वी (१०० वर्षपूर्वी) स्त्रीला किंमत नव्हतीच केवळ संतती जन्मास घालणे आणि तिला वाढवणे यातच तिची इतिकर्तव्यता होत असे. शेती आणि जोड धंदे हाच मूळ ( किंवा एकमेव व्यवसाय) असल्याने स्त्रीला अर्थार्जनाची सोय नव्हतीच. म्हणून मग ८ वर्षाच्या मुलीचे सुद्धा लग्न करून टाका ("अष्टवर्षात भवेतकन्या"). खायचे एक तोंड कमी होईल हि मनोवृत्ती होती. आजच्या आधुनिक काळामुळे स्त्रीला स्वत्वाची जाणीव होत आहे म्हणून प्रजनन हे थोडे लांबणीवर पडत आहे याचा तुमच्या जनुकशास्त्राशी आणि अधिजनुकशास्त्राशी थेट आणि स्पष्ट असा कुठे संबंध आला. आता वातावरणामुळे बीजांडावर परिणाम होतो त्यामुळे अमुक तमुक होतं असा लांबचा संबंध सांगता येतो. पण त्याचे जनुकशास्त्राशी आणि अधिजनुकशास्त्राशी संबंध लावणे जरा जास्तच होतंय. भारतात अजूनही पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळेस आई चे सरासरी वय २० वर्षेच आहे. In 1972, 22% of women in their early thirties delivered a child. In 2006, this proportion was less than 8%. With more educated women now having fewer children, women are having all their children much earlier. As a result, the trend has been for women to have their children and get sterilised, rather than postpone the birth of their first child and space their subsequent children, says Dr Ram. https://timesofindia.indiatimes.com/india/Fewer-women-having-kids-in-30s-Study/articleshow/10898196.cms हा दुवा पण काळजीपूर्वक वाचून पाहावा. म्हणजे लक्षात येईल कि भारतात सुशिक्षित स्त्रियांचे मूल होण्याचे सरासरी वय वाढण्याऐवजी कमीच झालेले आहे. यासाठीच मी लिहिले आहे कि आपला लेख हा एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 03/23/2018 - 11:21 नवीन
आता वातावरणामुळे बीजांडावर परिणाम होतो त्यामुळे अमुक तमुक होतं असा लांबचा संबंध सांगता येतो. पण त्याचे जनुकशास्त्राशी आणि अधिजनुकशास्त्राशी संबंध लावणे जरा जास्तच होतंय.
"We are presenting a paper (http://www.fertstert.org/article/S0015-0282(17)30588-5/fulltext) at the American Society of Reproductive Medicine that suggests that epigenetics can also explain semen quality. We examined the DNA methylation profiles of 480,000 CpG sites in semen in over 200 infertile men. When comparing semen samples with normal and low sperm counts, normal and low motilities and normal and abnormal shapes (morphology), we found large differences in epigenetic marks on sperm DNA in literally hundreds of genes. Furthermore, when we drilled down on the affected genes, many were found to have roles in infertile animal models, lending credence to the analysis. This is exciting because it means that epigenetics could explain a large chunk of male infertility that is currently unexplained. From a Lamarckian viewpoint, and even more thrilling to me, is that knowing the epigenetics of infertility may allow us to pinpoint exactly what environmental issues are influencing things. And that, my friends, could be a very good thing for a species that is threatened with falling sperm counts."
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 03/21/2018 - 15:14 नवीन
या धाग्यावर झाडू फिरला????
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/21/2018 - 16:13 नवीन
"फलित असलेले ७५ % गर्भ हे गर्भपात होऊन जातात." - श्री. खरे ७५% फेल्युअर रेट हा आकडा आपल्याला नॉर्मल वाटतो का आणि असे का? हा प्रश्न निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. याशिवाय आकडा कोणत्या सॅम्पल मधून आला. मुंबईसारख्या बकाल शहरात हा दर काय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला नसला तरी मला पडतो. माझ्या अंदाजानूसार मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी हा दर जास्त असायला हवा. भूछत्रांप्रमाणे उगवत असलेल्या प्रजनन/वंध्यत्व प्रयोगशाळा याचे पुरेसे निदर्शक आहेत. आंब्याच्या झाडाच्या बारीक बारीक कैऱ्या पडून जातात किंवा नारळाच्या झाडाचे बारीक बारीक नारळ पडून जातात तसेच मानवी फलित गर्भाच्या पैकी ७५ % गर्भ हे नष्ट होतात याला मी तुमच्या सोयीसाठी दुवा दिलेले आहे तो आपण वाचण्याची तसदी घ्यावी. बाकी हे सुबोध खरेंचे संशोधन नसून सर्वच्या सर्व वंध्यत्वाच्या पाठयपुस्तकात लिहिलेली मूलभूत माहिती आहे. मुंबईला बकाल म्हणणे हा तुमचा वैयक्तिक मुद्दा असू शकतो पण जगभर ७५ % फलित गर्भ नष्ट होतात याचा जनुक शास्त्र किंवा अधि जनुकशास्त्र यांच्याशी काहीही संबंध नाही. डी एन ए चे द्विभाजन होते ती प्रक्रिया निर्दोष नाही त्यात असलेल्या लक्षावधी डी एन ए पैकी काही महत्त्वाचे डी एन ए ची कॉपी जर सदोढ असेल तर तो गर्भ जन्माची कठीणप्रक्रिया पार पाडू शकत नाही संगणकाच्या भाषेत सांगायचं तर आपण सीडी कॉपी करतो तेंव्हा एखादी DLL फाईल नीट कॉपी झाली नाही तर ती सीडी नंतर चालत नाही तसाच हा प्रकार आहे. भूछत्रांप्रमाणे उगवत असलेल्या प्रजनन/वंध्यत्व प्रयोगशाळा याचे पुरेसे निदर्शक आहेत. जगभरात ५-६ % टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्व असते. याचा उपचार करण्यासाठी जर वंध्यत्व उपचार केंद्रे निघाली तर त्यात विशेष काय? भारताच्या १३० कोटी लोकसंख्येत २० कोटी जोडपी धरली तरी हा आकडा १ कोटी होतो. आता ढेंगळी पिंपळगाव मध्ये वंध्यत्व प्रयोगशाळा काढली तर डॉक्टरच्या आयुष्यभरात मुद्दल सोडाच पहिल्या महिन्यापासून व्याज तरी वसूल होईल का? १२५ वर्षपूर्वी "एक्स रे" क्लिनिक नव्हतीच आता ती गल्लोगल्ली झाली आहेत. हे किडलेल्या आरोग्याचे लक्षण आहे असे आपण मनात असाल तर धन्य आहे. बाकी डॉ. जगन्नाथ दीक्षितांच्या म्हणण्याचा इतका विपरीत अर्थ तुम्ही काढू शकलात याचे आश्चर्य आणि गम्मत वाटते आहे.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Wed, 03/21/2018 - 19:24 नवीन
हा लेखच मुळात एकांगी विचार करुन खिन्नमनाने लिहिलेला आहे असे वाटते. अपवादालाच प्रमाण मानुन सर्वाना लागु केले आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 03/21/2018 - 19:49 नवीन
पूर्वी मुलींची लग्ने खूपच कमी वयात होत. ऋतुप्राप्तीनंतर लगेच शरीरसंबंध प्रस्थस्पित होत. कोवळ्या वयातल्या आणि पाठोपाठच्या बाळंतपणातून निपजलेली मुले सुदृढ असण्याची शक्यता फारच कमी असे. पंधरासोळा अपत्यांपैकी सातआठ जेमतेम पन्नाशी गाठत . उरलेली जन्मत:च किंवा अध्येमध्ये गळून पडत. एकूणच जीवनसंघर्ष खडतर होता. त्यात स्त्रियांचे जगणे अधिकच कठिण. सदैव कोंदट अंधाऱ्या जागेत आणि कुपोषणातच आयुष्य संपे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानी स्त्रियांची लाइफ एक्स्पेक्टंसी अवघी तेवीस आणि पुरुषांची बेचाळीस होती असे कुठेसे वाचले आहे. कुठली सुदृढ प्रजा नि काय. यातून जगूनवाचून ज्यांनी सत्तरी ओलांडली त्यांचे आयुष्य जगाला दिसले आणि ' पूर्वीची पिढी कशी भक्कम, अस्सल दुधातुपावर पोसलेली' असे त्यांचे कौतुक झाले. जननदर अधिक होता तसा मृत्यूदरही अधिक होता. म्हणून लोकसंख्येचा स्फोट झाला नाही. भारतात (आणि तत्कालीन जगातही) दुष्काळ, अवर्षणे, अतिवर्षा, सततच्या युद्धांमध्ये जीवितहानी, कत्तली, पळवापळवी, जुलमी राजवटी यामुळे ज्ञात कालावधीपैकी बराचसा काळ सामान्य लोकांसाठी आणि मुख्यत: स्त्रियांसाठी तणावग्रस्ततेचाच राहिला आहे. खेडीसुद्धा बकालच होती. फक्त त्या बकालपणाची जाणीवच नव्हती इतकेच. रोगराई, पाण्याचे साठे दूषित होणे आणि त्यामुळे गावेच्या गावे उठून जाणे हेही नित्याचेच असे. तर किडक्या प्रजेची कारणे अगदी अल्पसंख्य शहरी महिलांच्या कपाळी मारणे काही पटले नाही. मुळात हल्ली किडकी प्रजा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे हेच पटले नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 04/04/2018 - 09:28 नवीन
गेल्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानी स्त्रियांची लाइफ एक्स्पेक्टंसी अवघी तेवीस
आणि
पंधरासोळा अपत्यांपैकी .........
च्यायला, सॉलिड पर्फॉमन्स आहे कि.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 05:05 नवीन
@युयुत्सु स्थूलपणा, मधुमेह, बालदमा इ० असंख्य विकार हे किडकेपणाचे निदर्शक नाहीत का? मग हे किडके बीज काढून टाकायला काय करायला पाहिजे? आणि आयुर्वेदात मधुमेह तर इसवीसनापूर्वी पासून( चरक संहितेत) सांगितलेला आहे. म्हणजे हे किडकं बीज तेंव्हा पासूनच आहे तर? मुंबई कलकत्ता हि शहरे तर तेंव्हा नव्हतीच. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकोबाराय लिहून गेले. तसे करायला हे किडकं बीज मुळातूनच नष्ट करून शुद्ध बीज निर्माण करायला पाहिजे म्हटले तर वंशविच्छेदच करायला लागेल. भारतात साधारण २० कोटी लोकांना मधुमेह आहे. त्यात साधारण एक कोटी दम्याचे रुग्ण आहेत. India Has Second Highest Number Of Obese Children In The World, Says New Study China with 15.3 million and India with 14.4 million had the highest numbers of obese children; https://www.huffingtonpost.in/2017/06/14/india-has-second-highest-number-of-obese-children-in-the-world_a_22191843/ अशा २२ कोटी लोकांना नष्टच करून टाकायला पाहिजे, नाही का?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 03/22/2018 - 05:33 नवीन
श्री सुबोध खरे तुम्हाला ताजे प्रतिसाद पहाता अधिजनुकीय संक्रमण आणि जनुकीय संक्रमण यातला फरक तुम्हाला कळलेला नाही किंवा तो मान्य करायचा नाही असे दिसते, त्यामुळे मला आता तुमच्याशी युक्तीवाद करण्यात रस संपत आला आहे. तरीही तुमच्या खालील युक्तीवादातील फोलपणा दाखवून दिल्या शिवाय राहवणार नाही. "Children inherit new mutations when they build up in the father’s sperm and the mother’s eggs. Men pass on more mutations than women because they make sperm throughout their lives, using a process that is not perfect at copying DNA. And so, as the man ages, his sperm accumulate more and more mutations. Women pass on fewer mutations because they tend to be born with their full complement of eggs." आपण क्षणभर असे मानुया की म्युटेशन्स फक्त पुरुषांमध्येच होतात आणि बीजांडात ती होत नाहीत. तरीही स्त्रीकडून बीजांडाद्वारे पुढे जाणारे केंद्रकाम्ल (डिएनए) हे अगोदरच्या पिढीतील पुरुषांकडून आले असल्याने त्यात म्युटेशन्स असू शकतात. अधिजनुकीय वारसा जास्तकरून स्त्रीकडुन येतो. हा जनुकीय वारशापेक्षा वेगळा असतो याकडे तुम्ही जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात. याशिवाय गर्भधारणा झाल्यावर म्युटेशन्स होत नाहीत किंवा गर्भ किडत नाही असे आपल्याला म्हणायचे का याचा खुलासा करावा व मी सर्वप्रथम दिलेला हा ताजा संदर्भ पहावा. Sheng Ren et al. Periconception Exposure to Air Pollution and Risk of Congenital Malformations, The Journal of Pediatrics (2017) http://www.jpeds.com/article/S0022-3476(17)31330-6/fulltext मला आता तुमच्या बरोबर युक्तीवादात रस उरलेला नाही!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 07:13 नवीन
मला आता तुमच्या बरोबर युक्तीवादात रस उरलेला नाही! हांगाश्शी आता कसं लायनीवर आलात. अगोदर पांढरी पाच मध्ये गायचं आणि मग सूर तालाचा मेळ बसत नाही समजल्यावर या मैफिलीत श्रोत्यांना गायनाचे अंगच नाही म्हणून शेपूट घालायची. जाता जाता --गायकाचा "सूर चुकला" हे समजण्यासाठी स्वतः कसलेला गायक असावं लागत नाही. तुमच्या हाताला एक सुंदर मोती लागला तर तोच जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे म्हणून डांगोरा कशाला पिटायचा. जगात इतर अनेक उत्तमोत्तम रत्ने आहेत आणि अनेक रत्नपारखीही आहेत. मीच हुशार म्हणण्याचा काय फायदा? खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते. उगाच काहींच्या काही याऐवजी जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र पेक्षा पर्यावरण आणि त्याचे संवर्धन याचे शास्त्र जर लोकप्रिय झाले तर पर्यावरणाच्या हानीमुळे होणारे जनुकीय परिणाम थांबवून समाजाचा जास्त फायदा होईल असे मी म्हणेन. उगाच "जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र" सारखे अतिशय किचकट विषय सर्वसामान्य माणसांमध्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करून तुम्ही काय उखाडणार आहात.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 03/22/2018 - 07:24 नवीन
+११११११११
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 07:23 नवीन
हायला http://www.jpeds.com/article/S0022-3476(17)31330-6/fulltext Increased exposure to PM2.5 in the periconception period is associated with some modest risk increases for congenital malformations. The most susceptible time of exposure appears to be the 1 month before and after conception. Although the increased risk with PM2.5 exposure is modest, the potential impact on a population basis is noteworthy because all pregnant women have some degree of exposure. हा दुवा तुम्ही स्वतः तरी नीट वाचला आहे का? मग मी दिलेला चुलीच्या धुरामुळे होणारे ग्रामीणस्त्रियांवरील दुवा Chulhas linked to 25% of pollution-related deaths in India https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollution-related-deaths/articleshow/62465884.cms वाचला का? नीट वाचा. The study found that the burning of biomass or solid fuel was the biggest source of PM 2.5 in both cities and villages.The situation could be worse as the study did not measure its indoor impact. त्यातून त्या अभ्यासाचं श्रेय मुंबई आय आय टी च्या संशोधकांकडे च जाते( आपलेच अल्मा मातेरं) उलट तुमच्या दुव्याचा आणि माझ्या दुव्याचा साकल्याने विचार केला तर २५ % ग्रामीण जनता किडलेली आहे असाच अर्थ निघतोय. याइतका सेल्फ गोल मिपाच्या इतिहासात झाला नसेल. आपली तारीफ करावी तितकी थोडीच.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 03/22/2018 - 07:49 नवीन
उलट तुमच्या दुव्याचा आणि माझ्या दुव्याचा साकल्याने विचार केला तर २५ % ग्रामीण जनता किडलेली आहे असाच अर्थ निघतोय. मी हसून-हसून पुरता बेजार झालो आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 12:35 नवीन
काय सांगताय? स्वतः लाच हसण्याची आपली खिलाडू वृत्ती आवडली,
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 03/22/2018 - 07:21 नवीन
इथे श्री गोदे यांनी उकळत्या तेलात हात घालुन जिलब्या तळणार्‍या माणसाचे उदाहरण दिले आहे. इथे ही त्यांचा गोंधळ उडाला आहे
मुळात उदाहरण कश्यासाठी दिले आहे हे समजुन घ्या. उगाच गोंधळ उडवुन घेवु नका स्वता: चा अडॉप्शन कसं सुरु होतं हे समुजुन घेण्यासाठीची ती उदाहरणं आहेत. तुम्हाला समजावे म्हणुन उचकटून सांगतो. Goat यातील बक-या बघा त्यांचे खुर हे विशिष्ट पध्द्तीचे आहेत सोबतच शरीर रचना ही खुल्या मैदानात सापडणा-या बकरी पेक्षा वेगळी आहे. आता विचार करा, ही बकरी ह्या पहाडी -खडकाळ भागात खुल्या मैदानातुन पहील्या वेळेस गेली असेल तेंव्हा निश्चितच तिचे खुर त्या भागात रहाण्यासाठी पुरक नसणार पण सतत पिढ्यान पिढ्या तेथे राहील्या मुळे पुरक जेनेटीक बदल झाले आहे. विषय निट समजुन घ्या प्रतिक्रीया द्यायची घाई करु नका, आणि एकदम सगळ्यांना उकळत्या पाण्यात टाकुन कस होतं अडॉप्शन हे पाहण्याच्या मानसिकतेतुन बाहेर या. लहानपणी किडुक-मिडुक तब्बेत असलेल्या लोकांनी मोठ्यापणी दमदार कार्य केले, अशी भरपुर उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/22/2018 - 08:21 नवीन
ते आई कडून जास्त वारसा जातो वालं वाक्य सोप्या शब्दात सांगा की उलगडून. फारच इंटरेस्टिंग वाक्य आहे. आई आणि बाबा दोघे समान क्रोमोझोम्स देतात (काही तरी X आणि Y वाला फंडा होता, त्यात मुलींकडे Y नसतोच, त्यामुळे उलट काही दोष येत नाहीत असे काही तरी खूप बेसिक पाठयपुस्तकात वगैरे वाचल्या सारखं वाटतंय.) तरीही आई कडून जास्त वारसा का आणि कसा येतो? तो केवळ दोषच पुढे देतो की इतर काही चांगल्या गोष्टी सुद्धा?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/22/2018 - 12:48 नवीन
अरे ह्या धाग्यावरच्या कुणीतरि अधिकारी, ज्ञानी, विचारवंतानी ह्यांना अपेक्षित असे उत्तर देउन टाका ना प्लीज.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/22/2018 - 13:32 नवीन
किडकी प्रजाचा कधी कधी एकदम अर्थ लागूनच जातो.. असो.. आयुष्यात थोडीशी बायोलॉजी शिकल्याने इंटरेस्ट आहे. लेकरं बाळं आहेत त्यामुळे आईकडून मुलांना खरंच काही दोष अधिक प्रमाणात जातात का हे जाणून घेण्याची इच्छा आहे.(असतात लोकांचे काही ज्येनुईन प्रश्न). ज्यांचे मेंदू ही इवलीशी गोष्ट समजू शकत नसतील त्यांनी ते किमान माझ्या प्रतिक्रियेवर लावू नयेत. मंडळ ऋणात राहील.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 03/22/2018 - 13:48 नवीन
श्री.अभ्या.., मी काही ज्ञानी,विचारवंत वगैरे नाही. तरीसुद्धा लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. ज्ञानी मोड ऑन : युयुत्सूंचे म्हणणे असे दिसते की (कां तर,)बीजांडे प्रत्यक्ष फलनापूर्वी प्रदीर्घकाळ (अगदी गर्भावस्थेपासून) स्त्रीशरीरात अस्तित्वात असतात आणि त्या मानाने शुक्रजंतू हे ताजे असतात; पर्यावरण, बदललेल्या जीवनपद्धतीचे ताणतणाव, खाणेपिणे वगैरेंचा परिणाम बाह्य शरीरावर आणि शरीरांतर्गतसुद्धा होत असतो; अशा स्थितीत बीजांडे प्रदीर्घकाळ शरीरात राहात असल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम शुक्रजंतूंपेक्षा अधिक प्रमाणात होत असतो. त्यातून अलीकडे (करीयर, नोकरी इ.मुळे- इति युयुत्सु) मुलींच्या लग्नाचे आणि प्रजोत्पत्तीचे वय वाढल्यामुळे बीजांडांना पूर्वीपेक्षा अधिक काळ अफलित राहावे लागते आणि तितका अधिक काळ अनिष्ट/प्रतिकूल बाबींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे फलनाच्या वेळी ती पूर्वीच्या काळापेक्षा अधिक प्रमाणात किडलेली असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा सध्या अधिक प्रमाणात किडकी प्रजा निपजते. माझे ज्ञान संपले. ज्ञानी मोड ऑफ.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/22/2018 - 15:22 नवीन
धन्यवाद राहीताई, समजले.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/22/2018 - 15:34 नवीन
हा मुद्दा कळलाय मला. पण हे तेव्हा खरं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दोषाबाबत बोलत आहात. म्हणजे वारसा सारखाच जातोय (quantitatively) , हां आता वरच्या थिअरी नुसार क्वालिटीवाईज आईकडून दोष पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे. पण दोन सुदृढ निरोगी माता पित्यांकडून सारख्या प्रमाणात जनुकीय वारसा जात आहे. तो वारसा दोषी आहे किंवा कसे हा वेगळा प्रश्न झाला. शिवाय खरे काकांनी काही तरी एक दुवा दिलेला दिसतोय ज्यात स्पर्म्स मधून असे दोष जाण्याची शक्यता आहे असे काहीसे लिहिलेले दिसते. ते एक वाचून बघतेय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/23/2018 - 08:38 नवीन
पि रा ताई आई कडून जास्त वारसा का आणि कसा येतो कोणत्याही पेशींमध्ये डी एन ए हे प्रामुख्याने केंद्रात असतात याशिवाय मायटोकाँड्रिया या पेशीद्रव्यात(cytoplasm) असलेल्या अंगात पण काही डी एन ए असतात. जेंव्हा स्त्री बीजाचे आणि शुक्राणूंचे मिलन होते तेंव्हा शुक्राणूंच्या केंद्रकातील गुणसूत्रे हि स्त्रीबीजाच्या गुणसूत्रांशी एकत्र होतात. परंतु शुक्राणूंच्या पेशीद्रव्यात असलेल्या मायटोकाँड्रियाचाआपोआप ऱ्हास होतो. त्यामुळे गर्भ तयार होतो तेंव्हा शुक्राणू आणि स्त्रीबीज याच्या केंद्रकातील डी एन ए यांचे प्रमाण सारखे असते पण स्त्रीबीजातील मायटोकाँड्रिया मधील डी एन ए गर्भात उतरतात. यामुळे गर्भाच्या डी एन ए मध्ये आईच्या डी एन ए चे प्रमाण अंशतः जास्त असते. कालच हा प्रतिसाद जास्त सविस्तर दिला होता पण तो का गंडला कारण माहिती नाही.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 03/23/2018 - 09:44 नवीन
अच्छा! आता समजले. अंशतः जास्त वारसा नक्की किती फरक पाडू शकतो? कारण युयुत्सु ज्या प्रकारे लिहीत आहेत, त्यावरून माझा असा समज झाला की आई बऱ्याच प्रमाणात गोष्टी कंट्रोल करते. मी तुम्हाला हे उत्सुकता म्हणून विचारते आहे. धाग्याकर्त्याचा उद्देश तर आता लक्षात आलाच आहे =))
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 03/23/2018 - 11:26 नवीन
https://www.youtube.com/watch?v=7YXm5j8qZaA
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 03/23/2018 - 10:03 नवीन
आयला असे पण असते...बाकी हि माहिती धागाकर्त्यांच्या पुस्तकातही असो अशी इच्छा ;)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 03/22/2018 - 14:30 नवीन
आपली जीवनशैली, अधिजनुकशास्त्र आणि आरोग्य या विषयाशी संबंधित डॉ० जगन्नाथ दीक्षित (एम०डी०, अमेरिका) आणि मी लिहीलेले पुस्तक लवकरच प्रसिध्द करायचा आमचा प्रयत्न चालु आहे. या पुस्तकातील काही भाग अमेरीकतील ’एकता’ या नियतकालिकात अगोदरच प्रसिध्द झाला आहे. तेव्हा मिसळपाववर हा विषय हाणून पाडायचा जरी कितीही प्रयत्न झाला तरी ते चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल याची मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 18:25 नवीन
हा विषय हाणून पाडण्याचा प्रश्नच नाही. कारण जी वस्तुस्थिती आहे ती आहेच पण तुम्ही जी हास्यास्पद आणि भंपक विधाने केली आहेत त्याला हा विरोध आहे. डॉ जगन्नाथ दीक्षित हे अत्यंत विद्वान डॉक्टर आहेत आणि त्यांची विधाने तुम्ही विपर्यस्त स्वरूपात मांडली आहेत एवढेच सांगणे आहे. खेड्यातील चुली तीलSpm 2.5 चा दुवा दिला आहे तोही तुम्ही नीट न वाचताच प्रतिसाद दिला आहे. अर्थात असे काही डॉ दीक्षित करणार नाहीत याची मला खात्री आहेच. आपल्या पुस्तकाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/22/2018 - 15:51 नवीन
जेनेटिक इंजिनिअरिंगने एपिजेनेटिकमधील दोष दुरुस्त करता येतात का?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 03/22/2018 - 15:55 नवीन
माझा जेनेटिक इंजिनिअरिंगचा अभ्यास नाही. त्यामुळे मी त्यावर काही बोलु शकणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/22/2018 - 16:05 नवीन
मग एपिजेनेटिकमधील दोष दूर कसे करतात?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 03/22/2018 - 16:30 नवीन
आमचे पुस्तक येई पर्यंत वाट पहा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 03/22/2018 - 20:57 नवीन
पुस्तकाचे प्रमोशन असेल तर मग इतका वळसा कशाला =))
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Fri, 03/23/2018 - 05:21 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 03/23/2018 - 03:36 नवीन
गूढ विज्ञान - विद्या ... Some pseudo science.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 03/23/2018 - 05:15 नवीन
https://books.google.co.in/books?id=HpbBCQAAQBAJ&lpg=PA429&ots=WpuzVs-dXk&dq=congenital%20anomalies%20epige&pg=PA419#v=onepage&q=congenital%20anomalies%20epige&f=false
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/23/2018 - 08:29 नवीन
अशी पुस्तकं लै आहेत हो. जो माणूस कर्करोगाच्या उपचारात काम करतो (मी त्यात ९ वर्षे काम केले आहे) त्याला या गोष्टी "अभ्यासक्रमातच शिकवल्या" जातात हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण यावरून मुंबई कलकत्ता सारखी शहरं बकाल आहेत आणि खेड्यातील हवा शुद्ध आहे अशा तर्हेचा भंपक दावा तुम्ही केला. तो खोडूनहि दाखवला आहे अशा अनेक भंपक दाव्यांबद्द्लच आमचे आक्षेप आहेत. तर तुम्ही म्हणताय कि एपिजेनेटिक्स तुम्हाला मान्य नाही म्हणून तुमचा "थयथयाट" चालू आहे. हे तुमचे अनुमानच "बिनबुडाचे आणि भंपक" आहे. बाकी असे सनसनाटी दावे जर तुम्ही पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी करत असाल तर तो प्रयत्न निम्न दर्जाचा आहे असेच खेदाने नमूद करावे लागेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 21 hours ago
  • सुंदर !!
    5 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा