Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

यारहो ...

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 03/15/2018 - 05:05
दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो जीव माझा आरशावर भाळलेला यारहो बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे? कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो ! हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो © विशाल वि. कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11006 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/15/2018 - 08:31 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/15/2018 - 10:24 नवीन
व्वाह,पढते पढते कव्वाली लगने लगी। मजा आया।
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 03/15/2018 - 11:51 नवीन
व्वा व्वा , आवडली
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 03/15/2018 - 14:58 नवीन
जबरदस्त!! बहोत खूब!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 03/16/2018 - 07:21 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/17/2018 - 09:16 नवीन
अप्रतिम...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 03/21/2018 - 05:45 नवीन
धन्यवाद मंडळी .
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/21/2018 - 11:32 नवीन
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो
वि कु.. क्या बात!!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/22/2018 - 06:09 नवीन
विकुशेठ, मस्त ग़ज़ल. इथे पहा:
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही मी कापलेला यारहो हा "मी" घातल्यास मीटरपूरक वाटेल का? आगाव सूचनेबद्दल क्षमस्व..
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/22/2018 - 06:13 नवीन
नाही. वेटेज बदलल्यास मूळ रचनेतही मीटर मेंटेन करता येतोय. उगीच वाटलं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/22/2018 - 06:13 नवीन
मीटर म्हणजे काय? ते कसे मोजतात?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/22/2018 - 06:16 नवीन
ओ तुम्ही लेणी पहायला जा पाहू..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/22/2018 - 06:25 नवीन
:(
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/22/2018 - 06:34 नवीन
जाहीर माफी मागत आहे. माझ्या म्हणण्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की नवनवीन लेण्याना भेटी देऊन अधिकाधिक नवनवे अभ्यासपूर्ण लेख वाचकांस मिळत राहावेत. आय अपोलोगाईझ. -ग.वि. केजरीवाल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/22/2018 - 13:30 नवीन
मीटर म्हणजे वृत्त रे ! इथे गालगागा गालगागा गालगागा गालगा हा मीटर आहे !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 03/23/2018 - 03:39 नवीन
धन्यवाद गवि ! तुम्ही सांगितलेला बदल केलास वृतभंग होइल, कारण मग दोन मात्रा वाढतील आणि अक्षरगणाची रचना बदलेल> एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो गालगागा गालगागा गालगागा गालगा यात अजुन एक मी जोडायचा म्हणजे 'गालगागा गालगागागा गालगागा गालगा' असे होइल, त्यामुळे वृत्तभंग होतो, लयही चुकते कारण मात्रा चुकताहेत. हवे तर असे करता येइल.. एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा स्वतः मी कापलेला यारहो मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 03/21/2018 - 18:27 नवीन
जबराट दोरायनी नाखु
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 03/21/2018 - 18:59 नवीन
अतिशय आवडली. सगळीच कडवी (शेर) मस्त आहेत त्यामुळे कुणा एकाचा उल्लेख करत नाही. सौ साल जियो!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 03/23/2018 - 03:41 नवीन
धन्यवाद नाखुशेठ आणि पिडांकाका _/|\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा