Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माझे अपहरण

श
शिव कन्या
गुरुवार, 03/15/2018 - 02:00
💬 18 प्रतिसाद
माझे अपहरण ... मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे.. मी वाट पहात, दबा धरून बसलेय. मला माझेच अपहरण करायचे आहे.. कुत्रा माग काढणार नाही, भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही, गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही, शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही, नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही, कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही, ....... असे सगळे जुळून आले कि , मी माझेच अपहरण करेन .... स्वतःतून बाहेर पडून मी निर्धास्तपणे चालू लागले कि, झडप घालून मी माझ्यावर पोते टाकेन माझी झटापट झटापट होईल, पोत्याचे तोंड करकचून आवळले कि मी आपोआप गुदमरेन, हळूहळू माझी धडपड मंद होईल, मग मी मलाच उचलून खांद्यावर टाकेन..... मग मी मला लपवून ठेवेन. स्वतः कडेच खंडणी मागेन.... खंडणी दिली तर माझी सुटका करीन नाही केली तर जीवानिशी मारीन..... धमक्या देईन, वाट पाहीन. खंडणी देण्याची ऐपत नाही, पोत्यात बंदिस्त राहण्याची शक्ती नाही, असे एकंदर दिवस आले कि , माझी उलघाल होईल, डोके फुटून जाईल, हे पण अपहरण फसले असे वाटून उदास होईन, थोडे दिवस मी सगळ्यांना दोष देईन, माझ्या अपहरणात काय चूक राहिली? शोध घेईन..... पुढच्या वेळेस मी काळ्या काचेची कार, मास्क, पिस्तुल घेऊन तयारीत राहीन, मी बाहेर पडले कि पुन्हा नव्याने माझे अपहरण करेन... यंदा तरी माझे अपहरण यशस्वी होवो आणि मला माझ्यातली खंडणी मिळो. -शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9174 views

💬 प्रतिसाद (18)
त
तिमा गुरुवार, 03/15/2018 - 02:09 नवीन
शिव शिव शिव!!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/15/2018 - 02:31 नवीन
असं होतं कधीकधी. आपल्या मनात काहीतरी करण्याचं आहे पण ते तसं करता येतं नाही मग आपण नकळत दबा धरून बसतो पुढच्या संधीच्या शोधात. आपलेच अपहरण ही कल्पना कदाचित त्यातूनच आकारास येत असावी. तुम्हांला तुमच्यातली खंडणी लवकरात लवकर मिळो हीच त्या मिपावरच्या काळ्या मावशीकडे प्रार्थना! ;) Sandy
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 03/15/2018 - 03:25 नवीन
ईस्कटून सांगितल्याबद्दल धन्यवाद. एक कवीचं हे जाणू शकतो
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 03/15/2018 - 16:05 नवीन
इस्कटून सांगायचा मस्त प्रयत्न..... मला ही हे नव्याने उमगले. अनेक अर्थ असूच शकतात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 03/15/2018 - 08:37 नवीन
चमत्कृतीपूर्ण कल्पना. बादवे, आमेन! :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/15/2018 - 10:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 03/15/2018 - 11:24 नवीन
स्वतःकडे मागायची खंडणी आणि त्यामुळे होणारी सुटका दोन्ही एकच - मुक्ती, Freedom !
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 03/15/2018 - 11:25 नवीन
कविता समजण्यास वेळ लागला तरी बहुधा समजली (किंवा तसा माझा गैर समज असेल ) आणि पोचल्यासारखी वाटली. कवितेत अजून काही बाजू येण्याच्या शिल्लक नाही ना असे वाटून एखादी कविता पाडण्याची संधी आहे का वाटून गेले . बहुतेक एक कविता पाडावी म्हणतो योग केव्हा येईल माहित नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 03/16/2018 - 09:53 नवीन
इथे पण निसटत्या बाजू आहेतच का
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 03/16/2018 - 11:06 नवीन
एकदा स्वभाव छिद्रान्वेषी झाला की सगळीकडे सारखाच नै का :) बाकी निसटत्या आणि सुटलेल्या/राहीलेल्या/शिल्लक मध्ये अल्पसा फरक असावा असे वाटते
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 03/15/2018 - 16:06 नवीन
माहितगाराला पाडायला..... म्हणजे कविता पाडायला किती वेळ लागतो असा! घ्या पाडायला.... वाचू आम्ही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 03/16/2018 - 11:07 नवीन
एक नै रतीबाच्या दोन दोन जिलब्या झाल्या. प्रेर्ना आपल्याकडेच :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/15/2018 - 17:18 नवीन
मुक्तक आवडलं. स्वतःच स्वतःचं अपहरण करण्याची कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/15/2018 - 17:54 नवीन
मला लागलेला अर्थ काहितरी नवीन शिकण्याचा ध्यास व तळमळ म्हणजे अपहरण. आणि त्यासाठीचे करावे लागणारे कष्ट म्हणजे खंडणी. जर यश नाही मिळाले तर प्रयत्न वाढवावे लागणारच.....
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/15/2018 - 18:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/16/2018 - 05:26 नवीन
पहिली संदीपची.... आता रविवारी या दोन्ही कवितांवर "उतारा" घेणे आले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 03/16/2018 - 06:20 नवीन
मस्तच की!!
  • Log in or register to post comments
न
निशाचर Fri, 03/16/2018 - 12:05 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 19 hours ago
  • सुंदर !!
    5 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा