Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तहान..

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 03/11/2018 - 19:12
"हे राम शिव शंकरा..Sssss" होय मी धार्मिकच आहे. रोज निद्राधीन होताना मनाची कवाडं बंद करण्याआधी ही शब्दफुलं अंतरात्म्याला वहावीच लागतात मला. त्याशिवाय ह्या देव्हाऱ्यात रात्रीचा निरव येत देखील नाही. त्याचे कर्तव्य करायला. देहाची कुडी जन्माला आलो तेंव्हा अमुक एका धर्माचा ठसा घेऊन आली नव्हती.तो धर्मच नव्हे तिचा! हां., पण आधाराची गरज हा मात्र तिचा मूलभूत स्थायीभाव! ती तहान मात्र अत्यन्त नैसर्गिक,शाश्वत, अविनाशी! त्या तहानेला माझ्या मातापित्यांनी त्यांच्याही नकळत अत्यन्त सहजतेनी त्यांना तश्याच रीतीनी मिळालेल्या धर्मातल्या देवरूपांचा प्याला पुढे केला,त्या देवांच्या द्रव घटक नामांसहीत! आणि मग माझ्याही तहानेला नाव मिळालं. रंग ,रस,गन्ध मिळाला. नित्त्याच्या तडफडीचं सुलभीकरण झालं एका अर्थाने! पण असं वाटतं की झालं हे ठीकच झालं. अंतर्मन हे जर देवत्वाच्या तहानेनी व्याकुळ होणार असेल,तर त्याच्या तहान भागवणाऱ्या पणपोया माणसांच्या जगात जन्माला येतच असतात.ही माणुसपणाची कमालंही आहे,आणि मर्यादाही! प्याला रिता होतो तर तो पुन्हा भरला जाणं ही पण त्याची मर्यादाच! ह्हा!!! कसं सुखावलं हो मन आता.शांत वाटतय.पुन्हा तोच अनुभव येतोय,जन्माच्या वेळी असलेल्या कोऱ्या करकरीत मनाचा! काही काळ त्याच सहजतेनं निद्राधीन होतो आता...भेटू पुन्हा...असेच नव्या तहानेच्या शोधात. ================================================== *अतृप्त*

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3345 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 07:42 नवीन
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा..!!! तुमची तहान लवकरच भागो आणि तुम्हाला त्रुप्ती मिळो हीच त्या सत्यनारायण भगवानाकडे प्रार्थना.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/12/2018 - 18:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/13/2018 - 01:16 नवीन
मला नै का धन्यवाद अत्रुप्त आत्माजी?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/13/2018 - 02:27 नवीन
हे घे! दु दु आगोबा~खुर्चीमारातृप्त Image removed.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 03/12/2018 - 09:57 नवीन
छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/12/2018 - 11:03 नवीन
रोचक
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/12/2018 - 18:45 नवीन
@पद्मावती, माहितगार - धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा