Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कल्लोळती रंगरेषा

अ — अनन्त्_यात्री, Wed, 03/07/2018 - 10:59
गूढ जांभळ्या कोन्यात क्लांत आदिम श्वापद माझ्या मातीच्या पायांची लाल, रांगडीशी याद कधी शुभ्र झळाळतो एक कोना आरस्पानी अद्भुताची निळी हाक मग गुंजतसे कानी कुतूहलास पारव्या केशरीशी ज्ञानफळे हिर्वळीस सर्जनाच्या किल्मिषांचे खत काळे कल्लोळती रंगरेषा अशा रात्रंदिन मनी इंद्रधनूची कमान शोधू कशाला गगनी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3517 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Wed, 03/07/2018 - 13:54 नवीन
केवळ क्लास्स!! कल्लोळती रंगरेषा हा शब्दही खुप आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/08/2018 - 03:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 03/07/2018 - 22:00 नवीन
ही रंगपंचमी-विशेष आवडली! >>>इंद्रधनूची कमान शोधू कशाला गगनी>>>आपण चितारलेल्या अक्षरचित्रांतील गूढ रंगसंगती कितीतरी मोहक आहे!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/08/2018 - 04:48 नवीन
सुरेखच फार म्हणजे फारच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 03/08/2018 - 16:32 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/10/2018 - 03:59 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 03/10/2018 - 14:51 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/10/2018 - 15:12 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 03/11/2018 - 07:19 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 03/12/2018 - 14:51 नवीन
अनंत यात्रींसाहेब ,, आपल्या बऱ्याच कविता खरंच खूप सुंदर असतात .. मी आज कविता वाचली आणि परत या सांजवेळी धुळवड अनुभवली .. तीही निसर्गाची ... छान अप्रतिम कल्पना ... सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 03/13/2018 - 09:50 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा