मी तृषार्त भटकत असता
मी तृषार्त भटकत असता
मृगजळास भरते आले
मी मला गवसण्या आधी
वैफल्य विकटसे हसले
शब्दांच्या इमल्यापाशी
सावली शोधण्या गेलो
पण शब्दांचे केव्हाचे
धगधगते पलिते झाले
क्षण क्षणास जोडित जाता
वाटले काळ संपेल
पण वितान हे काळाचे
दशदिशा व्यापुनी उरले
💬 प्रतिसाद
ए
एस
Sat, 03/03/2018 - 13:48
नवीन
अहाहा! अतिशय आवडली कविता!
हे तर खासच!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sun, 03/04/2018 - 03:55
नवीन
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sun, 03/04/2018 - 04:01
नवीन
सुरेख नेहमीप्रमाणेच;
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Sun, 03/04/2018 - 06:40
नवीन
छानच !!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sun, 03/04/2018 - 15:33
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/05/2018 - 05:21
नवीन
आवडली...
बरेच दिवसांनी वितान हा शब्द भेटला.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 03/05/2018 - 06:09
नवीन
"तृषार्त" शब्दातून कोणी "प्रेरणा" "घेतली" तर ? :)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 03/06/2018 - 09:45
नवीन
मी तृषार्त ढोसत असता
मी तृषार्त ढोसत असता
मित्रांस भरते आले
मी काही बोलण्या आधी
सगळे विकटसे हसले
ताटलीच्या तळापाशी
मी दाणे शोधण्या गेलो
पण दाणेतर केव्हाचे
पोटात गायबसे झाले
पेग पेगास जोडित जाता
वाटले रात्र संपेल
पण मिसकॉल हे बायकोचे
दशदिशा दणाणत सुटले
(छोटा छत्री) पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 03/07/2018 - 04:01
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 03/05/2018 - 11:37
नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख!!
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Mon, 03/05/2018 - 11:53
नवीन
खूपच छान लिहलीय
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 03/05/2018 - 13:01
नवीन
सुरेख कविता
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 03/05/2018 - 19:02
नवीन
वितान मंजे काय?
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 03/06/2018 - 05:49
नवीन
पटल / canopy
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 03/06/2018 - 09:51
नवीन
मस्तच. सुरेख कविता.
पैजारबुवा =))
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 03/06/2018 - 17:56
नवीन
सुरेख...
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 03/07/2018 - 04:04
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments