मुलांची हरवत चाललेली आई
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई
पण माझी तू फक्त आई आहेस
मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस
हवं नको ते सारं बघायचीस
मी कर्तासवरता झालो
नि तू दूर दूर गेलीस
इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही
मी ओरडतो, घशाला कोरड पडते
बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई "
तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस
एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस
प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस
पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस
देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस
तो आहे कि नाही? हे माहीत नाही
पण एकमात्र नक्की आहे या जगात
आणि ती म्हणजे " मुलांची हरवत चाललेली आई "
" यशस्वी बाई " हे नाव सोडून कधीतरी येशील आणि वेळ देशील
आणि परत बनशील ना आम्हाला हवी असलेली " आमची आई "
सिद्धेश्वर विलास पाटणकर
💬 प्रतिसाद
ज
जेम्स वांड
Sun, 03/04/2018 - 11:46
नवीन
कं लिवलंय कं लिवलंय कं लिवलंय

- Log in or register to post comments