Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रायगडावरच्या अपरिचित जागा कोणत्या?

ह
हकु
गुरुवार, 03/01/2018 - 07:51
🗣 22 प्रतिसाद
रायगडावर अश्या कोणत्या जागा/कोणती ठिकाणं आहेत की जी सर्वसामान्यपणे अपरिचित असतात? रायगडाचा विस्तार फार मोठा आहे आणि संपूर्ण बघून व्हायला निदान आठवडा लागत असावा असा माझा अंदाज आहे. सामान्यतः आपण ज्या जागा बघतो त्या व्यतिरिक्त काही जागांची माहिती असल्यास कळवावी ही विनंती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7735 views

🗣 चर्चा (22)
प
प्रचेतस गुरुवार, 03/01/2018 - 09:16 नवीन
मिपाकर स्वच्छंदी मनोज हा रायगडाचा चालताबोलता कोष आहे. ही माहिती तोच सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
ह
हकु गुरुवार, 03/01/2018 - 11:02 नवीन
अच्छा, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 09:35 नवीन
जिथे अजून कुणीही गेले नाही अशा जागा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/01/2018 - 10:33 नवीन
कशाला? ट्रेझर ऑफ अनसीन रायगड......फीलींग आवसम..... असले स्टेटस झळकावयाला? भरपूर पुस्तके आहेत, अभ्यास करा, जमत नसल्यास प्रत्यक्ष जा, जमेल तितक्या वेळी जा, प्रत्येक वेळी रायगड नव्याने भेटतो.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 03/01/2018 - 11:12 नवीन
तू कितीवेळा गेलास बे? =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/01/2018 - 18:55 नवीन
चार.
  • Log in or register to post comments
व
वझेबुवा गुरुवार, 03/01/2018 - 13:57 नवीन
चांगला विषय घेतलात हकू... अनुभवी भटक्यांकडून अपरिचित ठिकाणे माहिती करून घेणे आवश्यक आहे. मला गोनीदांच्या 'शिवतीर्थ रायगड'मधून आडवाटेच्या ३ गुहांची माहिती मिळाली, ज्या मशीदमोर्च्याहून रुळलेली वाट सोडून पाहू शकतो. आणि मध्ये एफबी वरून 'निसाणीची गुहा' किंवा 'निसाणीचा पहारा' या बद्दल कळले, जेथे जाण्यासाठी महादारवाज्याच्या तटबंदीची वाट पकडावी लागते. वरील ठिकाणी प्रत्यक्ष गेलो नाहीये, जायची इच्छा आहे. माहितगारांनी अधिक प्रकाश टाकावा...
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 14:26 नवीन
माहितगारांनी अधिक प्रकाश टाकावा...
अगदी योग्य मिपाकरास विचारले आहे तुम्ही. माहितगारांनी अधिक प्रकाश टाकल्यावर तुम्हाला अपरिचित जागांच्या निसटत्या बाजूही दिसतील. ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 03/06/2018 - 05:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 03/02/2018 - 04:14 नवीन
इथे पहा. अजून एक होता विडिओ, सापडला तर देतो.
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 03/02/2018 - 04:15 नवीन
लिंक देताना गडबड झालेली दिसतेय. इथे आहे https://m.youtube.com/watch?v=SgMUTcU76-s
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/02/2018 - 10:33 नवीन
आपण स्वतः न पाहिलेली प्रत्येक जागा अपल्यासाठी अपरिचित असते.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 03/02/2018 - 13:36 नवीन
पण मला वाटले तु रायगडवरच्या तु पाहिलेल्या अनवट जागांबद्दल लिहिशील. त्यामुळे थोडी निराशा झाली धागा उघडल्यावर. असो.
  • Log in or register to post comments
ह
हकु Wed, 03/07/2018 - 19:20 नवीन
हाहा! धन्यवाद राजेंद्र दादा! पण अजून तरी तितकी माहिती गोळा करू शकलेलो नाही. पण जितकी जमेल तितकी मिळवत राहीन आणि सांगत राहीन.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/03/2018 - 06:05 नवीन
रायगडावर गुप्त खजिना आहे म्हणे कुठेतरी ! सुरतेतुन लुटुन आणलेल्या साधन सामग्रीपैकी काही अति मौल्यवान कला कुसरीच्या गोष्टी आणि हिरे माणके असावीत बहुतेक फार पुर्वी त्या शोधासाठी कोणातरी माणसाने समाधी उकरायला घेतली होती असे वाचनात आले आहे ! पण माझ्या वैयक्तिकमते खजिना प्रतापगडावर असावा . ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 03/03/2018 - 14:48 नवीन
गड किल्ला जेंव्हा वापरायचा बंद केला असेल तेंव्हा सगळी संपत्ती शेवटचे लोक घेऊन गेले असतील की.. ते कशाला तिथे झाकून ठेवतील ?
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/03/2018 - 15:11 नवीन
त्यांनी काही नर "रत्ने" मागेच सोडली आहेतच याचा प्रत्यय येतो आहे हे लक्ष्यात घेत असलेला नाखु वाचकांची ही पत्रेवाला
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Sun, 03/04/2018 - 14:50 नवीन
रायगडावर शिवाजी महाराजांनी आग्रहाने आपल्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांसाठी बांधवून घेतलेली मशीद आहे असा इतिहासकारांनी उल्लेख केला आहे , त्या मशिदीबद्दल अधिक माहिती कुणाला आहे का ?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 03/05/2018 - 01:05 नवीन
कुठल्या इतिहासकाराने हा उल्लेख केला आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 03/05/2018 - 18:46 नवीन
गुप्त असावी बहुधा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/06/2018 - 04:39 नवीन
शां. वि. आवळसकरांच्या 'रायगडाची जीवनकथा' ह्या पुस्तकात मशिदीचा कुठलाही उल्लेख नाहीये (हे पुस्तक रायगडाची इत्यंभूत माहिती देतं). मात्र नाणे (नाना)दरवाजातून वर येताना किंवा चित्त दरवाजातून चढून गेल्यावर वाळसुर्‍याची खिंड पार केल्यावर डाव्या बाजूला थोडे खालचे बाजूस मशिद मोर्चा नावाचे एक ठिकाण आहे, येथे पूर्वी एखादे मेट असावे. मशिद मोर्चा हे नावही बहुधा मूळच्या कागदपत्रांत नाही. रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर गडाचे नाव इस्लामगड झाले तेव्हा ह्या मेटाला मशिद मोर्चा नाव दिले गेले असावे. ह्याशिवाय जगदीश्वराच्या शिलालेखात देखील इतर सर्व बांधकामांचे उल्लेख असता लेखनिक मशिदीचा उल्लेख करत नाही हे विशेष.
  • Log in or register to post comments
म
मनो Sat, 03/10/2018 - 19:07 नवीन
हे वाचा. महाराजांनी कधीही कुठेही मशीद बांधलेली नाही. https://drive.google.com/file/d/0B_hbiN5lXt31amRIcFlmM09SZ3M/view
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 9 hours ago
  • सुंदर !!
    3 days 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा