Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काळ्या पिशवीत पिशवीत

म — मूखदूर्बळ, Mon, 02/26/2018 - 17:23
काळ्या पिशवीत पिशवीत (श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून) काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते बॉटल हालते बॉटल हालते बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला तरतरी मना येते मती न्हाती धूती होते रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया तिथे उधार चालेना नगद लागते अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन तिथ डोलकर हालती जनू करती भजन जवा रंगीत पान्यात सोन चांदी लकाकते सोन चांदी लकाकते आस जिवाला लागते चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो काटा लागतो जिवाला स्वप्न पान्यात सांडत स्वप्न पान्यात सांडत दुकान अन्नाच चालत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3728 views

💬 प्रतिसाद
प
पैसा Mon, 02/26/2018 - 18:07 नवीन
डोलकरांचं गाणं! :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/27/2018 - 04:54 नवीन
वास्तवदर्शी, चित्रदर्शी, हृदयस्पर्शी गाणे आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 02/27/2018 - 05:55 नवीन
खत्तर्रनाक्! Sandy
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/27/2018 - 10:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Wed, 02/28/2018 - 21:09 नवीन
झकास जमले ! !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा