Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

॥ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही ॥

ख — खिलजि, Mon, 02/26/2018 - 11:49
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही मस्त आलिशान घर होतं दिमतीला गाडी न नोकर होते अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥ लग्नही असंच पळून केलं पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं जिथे चूल होती तिथेच मोरी होती आपल्याच घरात मुतायची चोरी होती चहा झाला कि हात लांब करून दिला जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥ जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर घर पार भरून जायचं प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ? ॥ सकाळी शौचास तर हि गर्दी उसळलेली ते पाहून तर मी खालीच कोसळली ह्या भल्यामोठ्या लागल्या होत्या रांगा आत्ता प्रेमात अजून काय काय करायचं असतं ते सांगा ॥ मी देखील घेऊन उभी होती लोटा पोटातून खाली सरकत होता हळूहळू गोळा मोठा करू लागले मी देवाचा धावा मनोमन वाटू लागले आपल्या घरीपण संडास असावा ॥ आधी कधी वाटली नव्हती एव्हढी त्याची थोरवी पण आता मात्र वाटत होते कि हि जी आलीय ती संडासातच व्हावी बाप माझा वाटू लागला मला परमेश्वर ज्याने एवढं सुखात ठेवलं होतं अन दिलं होतं आलिशान घर ॥ सिद्धेश्वर विलास पाटणकर ( पूर्वप्रकाशित पण समयोचित कविता )

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1563 views

💬 प्रतिसाद
ज
जव्हेरगंज Mon, 02/26/2018 - 17:18 नवीन
:D पुन्हा वाचायला तेवढीच मजा आली....!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 02/26/2018 - 17:59 नवीन
सांभाळा स्वत:ला हा न मागता दिलेला सल्ला आहे माझा. किमान पंधरा वर्ष तरी या संस्थळावर राहायचय असं तुमच्याच अन्य एका धाग्यात म्हटलेय तुम्ही.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 03/01/2018 - 08:44 नवीन
धन्यवाद जव्हेरगंज साहेब आणि अवलिया .. जरूर मी लक्षात ठेवेन आणि प्रामाणिक प्रयत्न पण करेन..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 03/01/2018 - 08:44 नवीन
धन्यवाद जव्हेरगंज साहेब आणि अवलिया .. जरूर मी लक्षात ठेवेन आणि प्रामाणिक प्रयत्न पण करेन..
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 09:33 नवीन
॥ माझ्यासारखी दारु कुणी पिलीच नाही ॥
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा