Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जगणं कळेल तेव्हा ........

फ — फिझा, Sun, 02/25/2018 - 05:46
जगणं कळेल तेव्हा ... ........ रोजचा दिवस नव्याने उगवायचा पण जगायचं तसंच रोज रोज दिवसामागून दिवस अन कैक वर्ष कोरडेच पावसाळे अन बेचैन उन्हाळे कशासाठी ? जगण्यासाठी ? एक एक क्षण फक्त जगून निघालेला, प्रत्येक श्वास ओढून घेतलेला हा जगण्याचा अट्टहास तरी किती ? ना कुणी सखा ना कुणी सोबती एकट्याने चालायची ही अखंड वाट कशासाठी ? जगण्यासाठी ? उद्या कधी उगवूच नये अशी रात्र अंधार आत आहे कि बाहेर रुक्ष दुरून एखादं पाखरू कोलाहल करेल तर जिवंत आहोत असं जाणवेल त्या इवल्या जीवाचाही हेवा वाटावा कशासाठी ? जगण्यासाठी ? खोल खोल आतल्या जखमा आता सलतही नाहीत आणि सतावतही नाहीत मग मातीतून आलेलं सगळं मातीत जाणारे जाणून घ्यावं अन ओंजळीत भरलेलं आता सांडून द्यावं इतक्यात ती अलगद मायेची झुळूक, फुंकर घालून जाते काय अन वाळवंटात पुन्हा अंकुर फुटतो काय ………... मग रहाटगाडगं पुन्हा एकदा चालू करावं पाणी पुन्हा एकदा भरून सांडून द्यावं आता परत नवीन दिवस येतील, मागून रात्री येतील कोरडे आणि फुलपाखरी ऋतूही आणतील वर्षामागून वर्ष सरतील, “जगायचंय का ?” विचारतील ....... भरल्याशिवाय सांडता येत नाही , सांडल्याशिवाय वाहता येत नाही ....... वाहिल्याशिवाय जगता येत नाही , अन जगल्याशिवाय जगणं कळत नाही ......... जगणं कळेल तेव्हा …….. आपण मायेची फुंकर बनून, कुणाला तरी जगण्यासाठी आधार बनावं ........ ... -----------------------------------फिझा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 946 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Sun, 02/25/2018 - 18:38 नवीन
प्रचंड आवडली!! वाखूसाआ!! Sandy
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 21 hours ago
  • सुंदर !!
    2 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा